उत्सव

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 February, 2013 - 09:27

मागे वळता दिसते जेव्हा
संसाराची चौकट हसरी
नकळत होते कशी अचानक
पापण्यांची या झालर भिजरी

आठवणी नव नवलाईच्या
लख्ख काही अन्‌ काही पुसटशा
काही गाफिल, सावध काही
चुकार अन्‌ लडीवाळ जराशा

कधी उतावीळ, कधी अनावर
शांत डोह कधी उगाच डचमळ
आवरतांना सावरतांना
सैरावैरा उठते मोहळ

आठवात त्या भिजतांना मग
काळ जरासा थांबून जातो
तुझ्यासवे या जगण्याचा मग
उत्सव होतो... उत्सव होतो.

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.... आवडली
समारोप छान केलात अगदी
या जगण्याचा मग मध्ये या हा शब्द खूप खूप महत्त्वाच वाटला एरव्ही गझलेत आम्ही लोक असे शब्द भरीचे मानतो Happy

व्वा ! सहजतेने मांडलंय..... छान.

आठवात त्या भिजतांना मग
काळ जरासा थांबून जातो
तुझ्यासवे या जगण्याचा मग
उत्सव होतो... उत्सव होतो. >>>> हे मस्तच.

खूपच सुंदर. आवडली.

(काही ठिकाणी शब्द र्‍हस्व हवेत का ? उदा. 'पापण्यांची या झालर भिजरी' --> पापण्यांचि)

मनापासून धन्यवाद दोस्तांनो Happy
ही कविता खास प्रेमदिनासाठीच होती...........माझ्या व्हॅलेन्टाईन साठी Wink