मराठी भाषा दिवस २०१३ - लहान मुलांसाठी कार्यक्रम - बोल बच्चन बोल!

Submitted by संयोजक on 12 February, 2013 - 06:39

BBB - 3.jpg

आपल्या बच्चूंचे बोल ऐकायला दरवर्षीप्रमाणे आम्ही उत्सुक आहोत. 'मराठी भाषा दिवस, २०१३'च्या निमित्ताने भरवूया आपल्या बच्चेकंपनीच्या बडबडगीतांची मैफल.

वयोगट : २ ते ६ वर्षे
आपल्या बाळाच्या आवाजातल्या मराठी बडबडगीताचे ध्वनिमुद्रण / चलचित्रण करा आणि आम्हांला पाठवा.

या उपक्रमाचे काही नियम :

१) या उपक्रमामध्ये केवळ मायबोलीकरांचेच पाल्य सहभाग घेऊ शकतील.
२) ध्वनिमुद्रण अथवा चलचित्रण युट्युबवर चढवून ते त्या पाल्याच्या मायबोली पालकाने sanyojak@maayboli.com या ईपत्त्यावर पाठवावे. विषयामध्ये 'बोल बच्चन बोल' असे नमूद करायचे आहे.
३) ईमेलमध्ये आपला मायबोली आयडी, आपले नाव, आपल्या पाल्याचे नाव आणि त्याचे वय लिहावे.
४) प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख आहे २४ फेब्रुवारी, २०१३.

तर मग बच्चन, बोल!!

रैना,

'पिशी मावशी आणि तिची भुतावळ' हा विंदा करंदीकरांच्या बालकवितांचा संग्रह पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. त्यातील कवितांना प्रताधिकार लागू होतात. तुम्ही योग्य प्रकारे परवानगी घेऊन त्यातील कविता आपल्या या मराठी भाषा दिवस २०१३च्या कार्यक्रमात सादर करू शकता Happy

तुम्ही योग्य प्रकारे परवानगी घेऊन त्यातील कविता आपल्या या मराठी भाषा दिवस २०१३च्या कार्यक्रमात सादर करू शकता <<< मुलांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगसाठीही हे करायला लागते, हे मला माहीत नव्हते. धन्यवाद. माहिती नसल्याने गणेशोत्सवात मी कवयत्रिची परवानगी न घेताच रेकॉर्ड केले होते.

वरच्या नियमावलीत प्रताधिकारासंबंधी नमूद करता येईल का?

संयोजक, १२ ते २० ह्या काळात, गाणे / बडबडगीत ठरवुन त्याचे प्रताधिकार घेउन ते पाठ करवुन पाठवणे हे थोडे कठिण नाही का वाटते? तेही आपल्याकडे लेखक / प्रकाशक आरामात प्रतिसाद देणे यावर विश्वास ठेवतात त्यासाठी.

सहज शंका आली म्हणुन विचारले. अर्थात संयोजकांनी या सर्व गोष्टींवर विचार केला असणारच.

धन्यवाद संयोजक. Happy
आमच्याकडची बरीचशी गाणी बाद आहेत या नियमामुळे. तरी यावर्षी म.भा.दि साठी काही पाठवू शकत नाही. क्षमस्व.

रैना,
पॉप्युलर प्रकाशनाकडून 'पिशीमावशी आणि तिची भुतावळ' यातील कविता सादर करण्याची परवानगी मायबोलीतर्फे मिळवता येऊ शकेल. तुम्ही चिनूक्स यांना कवितेचे नाव लिहून परवानगी घेण्याची विनंती करावी, चिनूक्स यांचा ईमेल आयडी - chinmay@maayboli.com

'बोल बच्चन बोल' कार्यक्रमासाठी प्रवेशिका पाठवताना मायबोलीकरांना प्रताधिकारांसंबंधी काही प्रश्न असतील तर त्यांनी कवितेचे, गाण्याचे तपशील इथे या बाफवर लिहावे. मायबोलीतर्फे आवश्यक ती परवानगी मिळवण्याचे प्रयत्न करता येऊ शकतील.

कुठल्या कविताना प्रताधिकार लागू होतील हे कसे कळणार?

आम्ही शेपटीवाल्या प्राण्यांची आणि भावले भावले डोल गं रेकॉर्ड केलंय.

संयोजक, sanyojak@maayaboli.com ह्या आयडीवर मेल केली तर जात नाहिए, काय करावे?

प्रताधिकार ???? काहीही. लहान मुलं बडबडगीतं म्हणणार आणि त्याला तुम्ही प्रताधिकार लावता ? निषेध! शिवाय घोषणा केली तेव्हाच हे सांगायला हवे होते. प्रताधिकारमुक्त गाण्यांची (आहेत का अशी गाणी?) यादी पण द्यायला हवी होती.

आम्ही आधीच रेकॉर्डिंग केले आहे. नुसते रेकॉर्ड नाही केले तर एक ओळ आमच्या सोयीने बदलून पण घेतली आहे. आहे ती प्रवेशिका पाठवणार. प्रकाशित करायची की नाही तुम्ही ठरवा.

बडबडगीतं खुपच पॉप्युलर असली आणि घराघरात ती म्हंटली जात असली तरी ती कोणी तरी लिहिलेलीच आहेत ना? कार्यक्रम घोषित केला तेव्हा प्रताधिकाराचा उल्लेख करायला पाहिजे होता हे समजू शकतं पण प्रताधिकार हा काही फक्त मायबोलीची जवाबदारी नाही. सगळ्यांचीच आहे.
उद्या मी एखादी कविता लेखकाची परवानगी न घेता सादर केली तर ती माझी चूक असेल, पुढे मायबोली नी ती प्रकाशित केली तर ती त्यांचीही चूक असेल. एखाद्या खाजगी कार्यक्रमात कविता सादर केली तर कोणाला कळणार नाही पण मायबोली सारख्या वेबसाईटवर काही प्रकाशित केली गेलं तर अर्थातच लेखक कायदेशिर कारवाई करु शकतात. थोडक्यात आपण कोणी एक व्यक्ती पेक्षा मायबोली जास्त वलनरेबल आहे अशा कारवाईकरता.
प्रताधिकार ह्या मुद्द्याची सद्ध्या सगळेच गंभीरपणे दखल घेत आहेत आणि मायबोली किंवा अन्य कुठल्याही वेबसाईट्सची (आऊटरिच जास्त असल्यमुळे) वर जवाबदारी वाढली आहे आणि खरंतर ताण पण वाढला आहे पण हे शेवटी चांगल्या करताच आहे. भारतात तरी खुप साहित्य प्रताधिकारासंदर्भात कायदे कच्चे असल्यामुळे, त्या साहित्याला ड्यु क्रेडिट न देता (नुसते पैसे नाही तर बिना पैशाचे फक्त क्रेडिट न देता) सादर केले जाते हे आपण सगळेच जाणतो.

विंदा करंदीकर, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर अशा कवींच्या बालकविता प्रताधिकारमुक्त नाहीत. अशा कवितांचं मायबोलीवरून प्रक्षेपण होणं, हे मायबोलीच्या वापराच्या / वावराच्या नियमांमध्ये बसत नाही. परवानगी न घेता केलेलं हे प्रक्षेपण प्रताधिकार कायद्याचा भंग आहे, हे वेगळंच. केवळ लहान मुलांनी म्हटली आहेत, म्हणून प्रताधिकार समाप्त होत नाही.

प्रताधिकार जपण्यासाठी परवानगी घेणं, हे उपक्रमाच्या संवर्धनासाठीच आहे. या उपक्रमाचं महत्त्व लक्षात घेऊन काही प्रकाशक विनामोबदला अशी परवानगी द्यायला तयारही आहेत. मात्र त्यासाठी त्यांच्यापर्यंत मायबोलीतर्फे अधिकृत पत्र पोहोचायला हवं.

या उपक्रमांतर्गत एखादी बालकविता सादर करायची असल्यास, त्या कवितेचं, पुस्तकाचं व प्रकाशकाचं नाव कळवल्यावर मायबोलीतर्फे परवानगी मिळवून देण्याच्या सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल.

रैना,
पॉप्युलर प्रकाशनानं तुम्हांला परवानगी दिली आहे. तुम्ही ईमेल पाठवल्यास तसं पत्र प्रकाशकांना देता येईल.

नाच रे मोरा, येरे येरे पावसा ही गाणी लिहिली कोणी ते पण मला माहीत नाही. ती कविच्या मालकीचीन राहता आपल्या सर्वांची झाली आहेत.
भोंडल्याची गाणी(भोंडला हा सार्वजनिक कार्यक्रम धरला जात असेल तर) कोणी लिहिली? ती म्हणताना आपण परवानगी घेतो का?
प्रताधिकाराबाबत तारतम्य बाळगलं नाही तर गाणी/बडबडगीतं फक्त पुस्तकांची धन राहतील ती आपल्या सगळ्यांच्या प्रेमाधिकाराची कशी होतील? तशी ती झाली नाहीत तर त्याचं दु:ख कवीला अधिक होइल की प्रताधिकार जपला गेल्याचा आनंद आधिक?

<भोंडल्याची गाणी(भोंडला हा सार्वजनिक कार्यक्रम धरला जात असेल तर) कोणी लिहिली? ती म्हणताना आपण परवानगी घेतो का?>

ही पारंपरिक गाणी आहेत. आणि म्हणून प्रताधिकार लागू होत नाही.

<प्रताधिकाराबाबत तारतम्य बाळगलं नाही तर गाणी/बडबडगीतं फक्त पुस्तकांची धन राहतील ती आपल्या सगळ्यांच्या प्रेमाधिकाराची कशी होतील? तशी ती झाली नाहीत तर त्याचं दु:ख कवीला अधिक होइल की प्रताधिकार जपला गेल्याचा आनंद आधिक?>

प्रताधिकार कायदा हा मायबोलीनं केलेला नाही. तो सर्वच देशांमध्ये लागू आहे. मायबोली या कायद्याचं पालन करते, इतकंच.

या उपक्रमात सादर केली जाणारी गाणी जर प्रताधिकाराच्या कक्षेत असतील, तर योग्य ती परवानगी घेऊनच ती सादर केली जावीत, ही अपेक्षा आहे. तशी परवानगी मायबोलीतर्फे घेऊन दिली जाईल.

मायबोलीला घाउक प्रमाणात विंदा करंदीकर, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर अशा फेमस प्रताधिकारमुक्त नसून प्रताधिकारयुक्त कवींच्या पूर्व परवानग्या घेउन ठेवणं शक्य आहे का?म्हणजे वर्षभरासाठी तुम्ही ह्या ह्या कविंच्या कविता/गाणी/गोष्टी माबोवरच सादर करु शकता?

प्रताधिकारमुक्त म्हणजे ज्यांच्या कविता/गाण्या/गोष्टींना प्रताधिकार लागू होत नाहीत
प्रताधिकारयुक्त म्हणजे वरच्या बरोबर विरुद्ध अर्थाने वापरला मी शब्द. असा शब्द नसेल पण मीच आपला तयार केला वाट्टं (मी हा शब्द प्रताधिकार्मुक्त करते आहे) Proud Light 1

<प्रताधिकारमुक्त म्हणजे ज्यांच्या कविता/गाण्या/गोष्टींना प्रताधिकार लागू होत नाहीत>

लेखकाच्या मृत्यूनंतर (त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे) ६०-८० वर्षांनंतर साहित्य प्रताधिकारमुक्त होतं. साहित्य प्रताधिकारमुक्त असेल (लेखकाचा मृत्यू होऊन ६०/८० वर्षं झाली असतील, किंवा ते गाणं / कविता पारंपरिक असेल) तर परवानगीचा प्रश्न नाही.

अशा उपक्रमांसाठी सहसा सर्व लेखक-कवी-प्रकाशक मदतच करतात. अडवणूक करण्याच्या कोणाचाही उद्देश नसतो. मात्र परवानगी घ्यावी, अशी सर्वांचीच रास्त अपेक्षा असते.

एक फाईल पाठवली आहे. यु ट्युब्वर अपलोड होईना. म्हणुन मेल केलीये.

अशी चालणार नसेल तर २१ तारखेला म्हणजे उद्या अपलोड करायचा प्रयत्न करेन.

तसे कळवावे.

संयोजक, मुदत वाढवल्याबद्दल धन्यवाद.
संदीप-सलीलचं 'बुमबुम्बा' किंवा पाडगावकरांचं 'टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले' पाठवलं तर चालेल काय ? परवानगीसाठी काय करावं लागेल ?
माझा मुलगा ६+४ आहे. ह्या उपक्रमात प्रवेशिका चालेल का?

चिनूक्स,

प्रताधिकाराच्या मुद्यांना अनुमोदन. मायबोली त्यासाठी प्रयत्न करून ईथल्या प्रवेशिकांना सहाय्य करते आहे हेही ऊत्तमच! मात्र त्याच बरोबर केवळ त्या एका 'तांत्रिक' गोष्टीमूळे भविष्यात ईथे साहित्य पाठवणार्‍यांच्या सर्वांच्या, विशेषतः लहान मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या ऊत्साहावर पाणी पडणार नाही यासाठी काहितरी ठोस मार्ग/योजना याचा विचार केला जावा असे वाटते. म्हणजे शक्यतो अशा सर्वच ऊपक्रमांच्या आधीच संयोजक मंडळात यादृष्टीने काहितरी तजवीज करता येईल? म्हणजे आयत्या वेळी कुणाचीच धावपळ नको.

स्वानुभवावरून यात बरीच गुंतागुंत किंवा logistics आहे याची जाणिव आहे(च) पण प्रताधिकार हा 'अडसर' न राहता ऊलट सर्वांना तो पाळता यावा (यात मूळ प्रकाशन, प्रकाशक, साहित्य, वाचक, ईथे ते साहित्य वापरणारे सर्वच आले) या दृष्टीने यावर एक कायमस्वरूपी 'पॉलिसी' तोडगा काढण्याच्या दृष्टिने विचार प्रशासनाने करावा असे सुचवावेसे वाटते.

धन्यवाद!

नमस्कार रुणुझुणू. तुमच्या दोन्ही गाण्यांसाठी परवानगी मिळालेली आहे. तरी तुम्ही प्रवेशिका पाठवू शकता.

मंगेश पाडगावकरांनी या उपक्रमासाठी (म्हणजे फक्त लहान मुलांसाठी) त्यांच्या कुठल्याही कविता, गाणी म्हणण्याची परवानगी दिलेली आहे. तरी पाडगावकरांची कविता / गाणी म्हणायची असतील, तर संयोजकांना तपशील कळवू शकता, म्हणजे पाडगावकरांना कळवून प्रकाशकांशी बोलता येईल.

मला विंदाच एक परी फुलवेडी पाठवायच आहे. मी चिनुक्स ह्याना संपर्कातुन मेल केल आहे. परवानगी साठी अजुन काय कराव लागेल?

Pages