भूत कसे बनते? -- एक प्राचीन पाक कृती ;-)

Submitted by अत्रुप्त आत्मा on 12 February, 2013 - 05:41

भूत बनविण्याची पाक-क्रुती:-

साहीत्य- एक जोडी धार्मिक वातावरणात वाढलेले-पती/पत्नी, त्यांचं तसच १ श्रद्धाळू अपत्य (वय तीन वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर रेसीपी संपंन्न होण्यात काही बुद्धीवादी तसेच विवेकी अडचणी येतात), रहाण्यासाठी कोणत्याही देश/प्रदेशातले एक घर, आणी जगातला कुठलाही देश( देश जितका धार्मिक असेल,तितकी पाक-क्रुती दमदार व जोमदार होते)

क्रुती--- प्रथम भारता सारखा १ धर्म:श्रद्ध देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा,मग त्यात एका सुशिक्षीत,उच्चविद्याविभुषीत कींवा अशिक्षीत कींवा कश्याही...थोडक्यात ---धार्मिक असलेल्या पती/पत्नींना आणून सोडावे. त्यांना त्यांच्या या अपत्यास शक्यतोवर यथेच्छ धार्मिक संस्कार करण्यास सांगावे, मुल जर का निबर मिळालेलं असेल तर, मधुन मधुन त्याच्यावर 'ऐकत नाहीस आई बाबांचं?...थांब तुला भूत्याकडे देते' असे मंत्र मारावे,यानी पोर चांगलं मऊ पडत,आणी रेसीपी योग्य वळणावर पोहोचते...पोर फारच निबर असेल आणी धर्मश्रद्धेच्या रश्यात बुडत नसेल तर,वरतून एक जाड छडी घेऊन त्याला ''फार अक्कल वाढलीये तुझी,म्हणे आत्मा कुठ्रे असतो?'' असं वरुन खोबरं पेरत खाली टेंबाव...मग त्याला एक श्रद्धेची उकळी येऊ द्यावी... आणी जगात फिरण्यासाठी डीशमधे काढावं... इथे मुलाच्या डोक्यातलं भूत निम्म तयार होतं.. मग हा मुलगा थोडं जरी काही झालं तरी एकदम फॉर्मात येऊन घाबरेल..'माझ्यावर भूत बसलय' अश्या कथा सांगुन शाळेला दांड्या मारेल... झालं... इथुन पुढे त्याच्यावर श्रद्धेचं झाकण टाकून त्याला निवत ठेवलं की त्याच्यातलं भूत तय्यार ... http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scared-ghost-smiley-emoticon.gif

टीप-स्वतःला आणी नंतर इतरांना फसविण्यासाठी... हे भूत अगदी हुकमी एक्यासारखं तयार राहातं, त्याला नासण्या,अंबण्या विटण्याचं भय फक्त जागरुक प्रशासन,सुशिक्षीत समाजमन या पासूनच असतं ... तेंव्हा ही पाक-क्रुती एकदा तयार का झाली,की सहसा हज्जारो वर्ष खराब होत नाही,अगदी बिनधोक टिकते...

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीलंय!

पण माझ्यामते ही पाकॄ बोलाची कढी बोलाचा भात सारख्या आभासी बोलाच्या भूताची आहे.
याच पाकृत फक्त ३०ग्रॅम अतृप्त आत्मा टाका, खरेखुरे भूत बनेल.
Wink

मस्त लिहीलय. यात एखादा मन्त्रिक टाक आणि अगम्य भाषेतील मन्त्राची फोडाणी द्या. लज्जतदार होइल.

mast!

कवी चेकाळला व पानेच्या पाने प्रतिसाद लिहू लागला की त्याचे भूत बनते. कितीही टीकेच्या उता-यानंतरदेखील त्याच्या अंगातले भूत नाही उतरले तर हे भूत दुस-यांच्या कवितेला पर्यायी गझल, कविता करू लागते. त्यावर कोणी टीका केली की मग अजूनच जास्त चेकाळून त्या भुताचा समंध बनतो व प्रत्येक कवीझाडाला धरतो व मोठे मोठे 'लेक्चर' देउ लागतो. वेळीच इतर समभुतांकडून अंगातले काढले नाही तर त्याचा वेताळ व्हायला वेळ लागत नाही. मग हा वेताळ समस्त कवी/गझलकारांचा अ‍ॅडमिन असल्यासारखा प्रत्येक कवीच्या अंगात घुसून प्रतिसादावाटे बाहेर पडतो!

Pages