Submitted by मामी on 12 February, 2013 - 01:24
आधी मायक्रोस्कोपकरता काढलेला धागा रिसायकल करून जनरल करत आहे.
मुंबईत कुठे काय मिळेल याची विचारणा इथे करता येईल.
पान १ : मायक्रोस्कोप / सूक्ष्मदर्शक यंत्र
पान २ : सिरॅमिक figurines
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लॅबचे साहित्य पुरवणार्या
लॅबचे साहित्य पुरवणार्या कोणत्याही दुकानात तुला बाकीचे मटेरिअल मिळेल. आणि हो, हाताशी भरपूर टिश्यू पेपर आणि एक डिसेक्शन बॉक्स असलेला बरा. इब्लिस सांगतोय तो स्कोप चांगला आहे.
तिला आधी स्कोपखाली जे काय पहायचे असेल ते पाहू दे, अगदी वाटेल ते; त्यातूनच आवड, स्कील, पेशन्स वाढत जातो.
खरेदी केल्यावर मला नक्की कळव, काही उत्तम लॅब प्रोसिजर्स पाठवेन
हे, धन्स आगाऊ. नक्कीच. बाबु,
हे, धन्स आगाऊ. नक्कीच.
बाबु, ते काय आहे ते मला तरी काही कळलं नाही. इथेच इतर कोणी अजून सांगू शकतील.
बागुलबुवा, १. हे काहे
बागुलबुवा,
१. हे काहे आहे?
<<
'हे' एलईडी लाईटवाले वेबक्याम आहे, स्क्रीनवर मोठे चित्र दिसेल त्यात, दुसरे काही नाही. अजिबात अर्थ नाही त्याला.
२. वर मामींसाठी रेकमेंडेशन दिलेल्या मायक्रोस्कोपच्या आयपीसला साध्या मोबाईलचा कॅमेरा -डोळा लावतात तसा- लावला तरी छान फोटो येऊ शकतात.
३. डिसेक्टिंग ऑप्टिकल मायक्रोस्कोप्स विथ बीम स्प्लिटर अँड कॅमेरा असं प्रकरण भरपूऽर महाग मिळेल, मेडिकल क्वालिटी दीड ते दोन लाखा पुढे मिळतात.

त्यातल्या त्यात इथे हे जरा बजेटवालं प्रकरण दिसते आहे : http://www.nextag.com/dissecting-microscope/stores-html
या चित्रातल्या मायक्रोस्कोपच्या डाव्या आयपिस मधे खुपसलाय तो क्यामेरा आहे. याला बीमस्प्लिटर नाही. त्यामुळे डिसेक्शनचे लाईव्ह रेकॉर्डिंग होणार नाही..
४. पॅरासाईट्स / कल्चर हे अत्यंत किचकट काम आहे. नुसत्या मायक्रोस्कोपने होत नाही. (इथे डिसेक्टिंग मायक्रोस्कोप कामाचा नाही. लॅब क्वालिटी हवा.) जंतू/जिवाणू ओळखता आला तर फार झालं तर ग्राम निगेटिव्ह कोकाय आहेत इतपत दिसते. ते नक्की कोण अन कोणत्या औषधाचे 'ऐकतात' हे समजायला इन्क्युबेटर अन कल्चर सेन्सिटिव्हिटी इ. उद्योग करावे लागतात. अर्थात तुम्ही माशांच्या बाबतीत भरपूर पॅशनेट आहात, तेव्हा हे करालही. या बाबतीत कुणा मायक्रोबायोलॉजी लॅबवाल्याची ओळख काढून थोडे काम आऊटसोर्स केलेत, किंवा त्याच्याकडे शिकलात तर जास्त फायद्याचे होईल. तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशनची व टेक्निक्सची ओळखही होईल.
फार छान वाटले तुम्ही मुलीला
फार छान वाटले तुम्ही मुलीला मायक्रोस्कोप घेऊन देता आहे. मायक्रोस्कोप सोबत सुरुवातीला फक्त तयार स्लाईड घ्या. त्या तिला आधी फोकस करायला शिकू द्यात. स्लाईड स्वतः बनविणे जरा कठीण जाते.
अगार वगैरे घेऊ नका. कारण ते बनविल्यानंतर त्याला लगेचच sterile करावे लागते. नाहीतर त्यावर नको ते जीवाणू वाढतात. शिवाय ते घरी करणे योग्य ही नसते ( for health).
आम्ही ग्रॅजुएशनला शिकविण्यासाठी या प्रकारचे मायक्रोस्कोप वापरतो. उद्या डीलर ची लिस्ट देते. किंमत साधारण हीच असते. (३ -३.५ k)
मला असे वाटते की objective lens १०x आणि ४५x पुरे कारण १००x फक्त बॅक्टेरिया बघण्यासाठी वापरल्या जाते. आणि बॅक्टेरिया ची स्लाईड बनविणे आणि तिला फोकस करणे हे शिकविण्यासाठी अम्हाला कमीत कमी ३ ते ४ प्रॅक्टिकल्स f.y. च्या मुलांची घ्यावी लागतात. अर्थात मुलीला आवड असेल तर प्रश्नच नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायक्रोस्कोपची काळजी. आणि मोठा शत्रू म्हणजे धूळ. त्यावरील कव्हर आणि असेल तर लाकडी कॅबिनेट फार गरजेचे मुंबैइच्या धूळीत. त्याशिवाय लेन्स साफ करण्याचे सोल्युशन आणि त्याचे मऊ कापड (यावर अजिबात धूळ नको कारण त्याने लेन्सवर चरे पडतात आणि मग स्लाईड दिसण्याऐवजी स्पायडर्मॅन्चे जाळे दिसते).
लॅबचे साहित्य पुरवणार्या
लॅबचे साहित्य पुरवणार्या कोणत्याही दुकानात तुला बाकीचे मटेरिअल मिळेल. आणि हो, हाताशी भरपूर टिश्यू पेपर आणि एक डिसेक्शन बॉक्स असलेला बरा. इब्लिस सांगतोय तो स्कोप चांगला आहे. >>>> हो, धन्स.
तिला आधी स्कोपखाली जे काय पहायचे असेल ते पाहू दे, अगदी वाटेल ते; त्यातूनच आवड, स्कील, पेशन्स वाढत जातो. >>>>> आगाऊ, अगदी अगदी.
खरेदी केल्यावर मला नक्की कळव, काही उत्तम लॅब प्रोसिजर्स पाठवेन >>> नक्कीच. धन्स.
रितेशद१३, उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
बाबु, मासे डिसेक्ट करायला
बाबु, मासे डिसेक्ट करायला माय्क्रोस्कोप कशाला. कोळीण देत नाही कां??
(अवांतर प्रतिसाद, पण राहावलं नाही)
मोबाईल कॅमेरासोबत ज्वेलरी
मोबाईल कॅमेरासोबत ज्वेलरी मायक्रोस्कोप वापरून बघा, किंमत फक्त ४०० ते ५००
फोटोग्राफ्स काढता आल्यामुळे स्टडी देखिल ईंटरेस्टींग होईल
http://www.ebay.in/itm/Mini-60X-Jewelry-Loupe-LED-Lighted-Magnifier-Micr...
http://www.ebay.in/itm/60X-Zoom-LED-Cellphone-Microscope-Micro-Lens-For-...
भरमा, उद्या कोळीणींकडे
भरमा, उद्या कोळीणींकडे माश्यांच डिसेक्शन शिकायला बसलो तर घरी माझं पोमॉ होणार नाय कॉय ?
इब्लीस, धन्स. मला वाटतं तो मायक्रो लेन्सवाला वेब कॅम असावा. बजेटात बसला तर चालेलही. मला पाणी आणि माश्यांवर (स्कीन सॅम्पल किंवा अख्खा) होणारी जीवाणूंची वाढ, त्यांच्या खाण्याचे (मायक्रोवर्म्स, बीअरवर्म्स, ग्रीन्डाल वर्म्स, ईन्फुसोरीया, डॅफ्नीआ) मी करत असलेले कल्चर (उत्पादन) बरोबर वाढते आहे की नाही हे तपासायचे आहे. मला वाटतं ३०० x मॅग्निफाईंग पुरेसे ठरेल.
प्रसिक ६० x पुरेसा ठरेल काय ?
६० x पुरेसा ठरेल काय ?>>>> No
६० x पुरेसा ठरेल काय ?>>>> No idea, माझा ईंटरेस्ट मायक्रोस्कोप पेक्षा टेलिस्कोप मधे जास्त आहे
मी M.Sc.Microbiology केले आहे
मी M.Sc.Microbiology केले आहे पण कधीही microscope विकत घेतला नाही. आम्हाला सगळं शाळा college मधेच मिळाले होते. हे सगळं शाळेत असताना नाही लागत आणि खुप महागही असत, त्यामुळे विकत घेऊ नका, अशी माझी नम्र विनंती.
मुग्धा केदार, सुचनेबद्दल
मुग्धा केदार, सुचनेबद्दल धन्यवाद. पण रु. २५०० ही अगदी काही न परवडणारी रक्कम नाही आणि इतर अनेक गोष्टी (ड्रेसेस, बाहुल्या, खेळणी) यावर खर्च करण्याऐवजी लेकीला स्वतःला मायक्रोस्कोप घ्यावासा वाटतोय तर मला नाही म्हणायला योग्यही वाटत नाही. मी स्वतःहून कदाचित नसताही घेतला.
वर आगाऊ म्हणतोय
>>>> तिला आधी स्कोपखाली जे काय पहायचे असेल ते पाहू दे, अगदी वाटेल ते; त्यातूनच आवड, स्कील, पेशन्स वाढत जातो.
>>>>> त्याप्रमाणे सध्या तिला यात रुची निर्माण झाली आहे, तेवढ्यातच तो घेऊन देणं योग्य आहे. पुढे ती तो वापरत राहिल किंवा तो पडून राहिल हे या क्षणी मलाही माहित नाही.
मामी +१००००००००००००००००००
मामी +१००००००००००००००००००
मामी मला मनापासून तुमचा हा
मामी मला मनापासून तुमचा हा विचार आवडला आहे. मी सुध्धा चौथी- पाचवीत असताना एकदा एका शिबिरात मायक्रोस्कोप मधून कांदा, केस वगैरे बघितले होते. आणि तेच कुठेतरी फार आवडून गेले होते पुढे जाउन त्या फार छोट्या गोष्टींच्या विषयाबद्दल (सूक्ष्मजीवशास्त्र) आवड तयार झाली हे नक्की.
डीलर सरकारी कामात मुरलेले असल्यामुळे व्यक्तीगत स्तरावर फार वेगळे उत्तर मिळाले (विचारात पडलेली बाहुली)
छान माहिती जमा झालीय इथे. मी
छान माहिती जमा झालीय इथे. मी पण घेतला होता ( चांगला मोठा झाल्यावर ) एकदा एका डासाची सोंड बघितली, एवढेच. नंतर वापर झाला नाही.
ग्लास स्लाईड्स, वर ठेवायच्या काचेच्या पट्ट्या नीट वापरायला शिकवले पाहिजे. पण गोडी लागली तर तासंतास त्यात रमेल. किचनमधले सगळे पदार्थ त्या पट्टीवर ठेवून बघेल. ( मी कसे सगळ्याचे फोटो काढले ना, तसेच.)
किचनमधले सगळे पदार्थ त्या
किचनमधले सगळे पदार्थ त्या पट्टीवर ठेवून बघेल. >>>> छान कल्पना.
खालील लिंक्समध्ये दिसणार्या
खालील लिंक्समध्ये दिसणार्या छोट्या छोट्या सिरॅमिक figurines मुंबईत कोठे मिळू शकतील?
https://www.facebook.com/theterrariumshoppe, http://crafting.squidoo.com/make-your-own-table-top-mini-gardens, http://kids.nationalgeographic.com/kids/activities/crafts/miniature-garden/
हवे असलेले मिळाले. म्हणुन
हवे असलेले मिळाले. म्हणुन संपादीत
चांगला आहे धागा. ( मुंबईत हे
चांगला आहे धागा.
( मुंबईत हे कुठं मिळतील असंच वाचलं आधी घाईत )
मला १०"*१०"*१०" साईझचे
मला १०"*१०"*१०" साईझचे कोरुगेटेड बॉक्सेस आणि बरंच बबल रॅप हवं आहे. मुंबईत हे कुठे मिळेल? काही कल्पना?
मामे, मुंबई सोडुन चाललीस की
मामे, मुंबई सोडुन चाललीस की काय???????
छोट्या छोट्या सिरॅमिक
छोट्या छोट्या सिरॅमिक figurines >>> याच्यासाठी धारावी गाठणे. तुलसी पाईपरोडने माटुंग्याच्या झेडब्रिजवर चढून धारावीतून सरळ येऊन पुढे जंक्शनला डावी-उजवीकडे न वळता अगदी सरळ गेलीस की कुंभारवाडा लागेल तिकडे हे सर्व भरपूर व्हरायटीमधे मिळेल.
बबल रॅपसाठी
आणि शिवाय जस्ट डायलच्या वेबसाईटवर शोध घे.
Baalaasaathi kunchi dadar
Baalaasaathi kunchi dadar madhye, tmilel ka
मंजूडी, धन्स. हो साधना,
मंजूडी, धन्स.
हो साधना, १०*१०*१० च्या खोक्यातनं सामान भरून चाललीये मुंबई सोडून. हे हे हे ....
नॅनो टेक्नॉलॉजीच्या दुनियेत
नॅनो टेक्नॉलॉजीच्या दुनियेत काय अशक्य आहे???
Pages