मुंबईत हे कुठे मिळेल?

Submitted by मामी on 12 February, 2013 - 01:24

आधी मायक्रोस्कोपकरता काढलेला धागा रिसायकल करून जनरल करत आहे.

मुंबईत कुठे काय मिळेल याची विचारणा इथे करता येईल.

पान १ : मायक्रोस्कोप / सूक्ष्मदर्शक यंत्र
पान २ : सिरॅमिक figurines

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळं तू मुलीसाठी घेणारेस का?
तिच्या वयाला हे एवढं सगळं लागेलच असं वाटत नाही.
तिच्या शिक्षकांशी बोलून यातले काय काय लागेल याची खात्री करून घे.
स्टेन्स वगैरे केमिकल्स किंवा पेट्रिडिश कल्चर्स हाताळण्याइतकी ती मोठी आहे का हे ही बघ (शिक्षकांशी बोलूनच).
सर्जिकलवाल्या दुकानात शालेय किंवा कॉलेजिय डिसेक्शन बॉक्स मिळतात त्यात बर्‍याच गोष्टी असतात (स्काल्पेल, फोरसेप्स, स्लाइडस, कव्हरस्लिप्स, कॉनकेव्ह स्लाइडस वगैरे).
लॅटेक्स ग्लवजही तिथेच मिळतील.

मुलीकरता एक मायक्रोस्कोप (सूक्ष्मदर्शक यंत्र) घ्यायचा आहे. त्याबाबत खालील मुद्द्यांवर माहिती असल्यास सांगा, प्लीज.

१. मुंबईत मायक्रोस्कोप कुठे मिळेल?
साधारण गुगलून बघितलं तर प्रिन्सेस स्ट्रीटवर काही डीलर्स सापडले.
http://mumbai.olx.in/student-microscope-iid-468475722 यावर दिलेल्या नंबरवर बोलले. किंमत रु. २५००+१२.५% टॅक्स सांगितली आहे. बरोबर स्लाईड आणि कव्हरस्लिप्स चे बॉक्स फ्री आहेत.

२. मायक्रोस्कोप बरोबर इतर काय साहित्य घ्यावे लागेल? http://www.hometrainingtools.com/microscopic-life-kit/p/KT-MICLIFE/ इथे एक लिस्ट दिसली. मायक्रोस्कोप घेणार तर बरोबर योग्य ते सर्व साहित्य असावे अशी इच्छा आहे. कोणी याबाबत काही सांगू शकेल का?

Kit Contents
•72 plain glass slides
•12 concave glass slides
•Slide coverslips
•Methylene blue stain (for cell nuclei)
•Eosin Y stain (for cell cytoplasm)
•Prepared microscope slides: ficus leaf, paramecium, protozoa, bacteria, and allium (onion) root mitosis
•#11 scalpel (for making tiny cross-sections)
•1 bottle of nutrient agar
•5 plastic petri dishes
•2 sterile swabs
•Latex gloves
•Protozoa mix to grow euglena, etc.
•Protist identification key
•2 sterile lancets
•Study guide with information about cells, bacteria, and other microscopic life

३. हे इतर साहित्य मुंबईत कोठे मिळेल?

******************************************************

ओके नी. धन्स. आमच्या घरी आम्हा दोघांचं सायन्स दहावीनंतर गंगार्पण केल्यामुळे तुम्हा सर्वांच्या सल्ल्याची गरज आहे.

साहित्यातलं जे साहित्य आता लगेच लागेल ते घेईन. बाकी लागेल तसतसं घेता येईल. सध्या त्यांना कांद्याची स्लाईड वगैरे करायला शिकवताहेत. पण त्याकरता त्या स्लाईडमध्ये काहीतरी द्रवसुद्धा घालावा लागतो ना? तो कोणता?

स्टेन (काहीतरी द्रव) कोणता ते आता लक्षात नाही. मी टिवायनंतर बायो-सायन्स सगळंच गंगार्पण केलंय. Happy
पण कांद्याच्या स्लाइडसाठी साधी डिसेक्शन बॉक्स पुरे. पेट्रिडिश लागेल असं वाटत नाही. स्टेनचे शिक्षकांना विचार.

नेहरु सायन्स सेंटर आणि नेहरु प्लॅनेटोरियम इथे शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त असा मायक्रोस्कोप मिळतो.
>>> पाहिले ते. पण ते अगदी प्राथमिक अवस्थेतले असतात.

http://www.microscope-microscope.org/basic/buyers-guide.htm ही एक उपयुक्त लिंक पहा. इथे त्यांनी सूक्ष्मदर्शकाच्या खरेदीसंबंधी खूप छान मुद्दे मांडले आहेत.

कांद्याच्या पापुद्र्याच्या पेशी पाहण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे आयोडीन टाकतात. ( १०वीतलं प्रॅक्टीकल आठवलं)

क्रिस्टल व्हायोलेट, सॅफ्रॅनिन, मिथिलीन ब्ल्यु, इओसिन ही काही स्टेनस आम्ही वापरलेल्याचं आठवतय. .

मायक्रोस्कोपचा वापर कशाकरता करणार त्यावर कुठला मायक्रोस्कोप घ्यायचा हे पहावे लागेल
साधारणतः दोन प्रकारचे मायक्रोस्कोप असतात.
१] सिंपल मायक्रोस्कोप - एकच लेन्स असते. एखादा कीटक वा पान फूल जरा जास्त मॅग्निफाय करुन पहाण्यासाठी, वगैरे. याची पॉवर आता आठवत नाहीये. पण १०X किंवा २०X एवढीच असावी.
X म्हणजे तेवढे पट - १०X म्हणजे स्पेसिमेन दहापट मोठा दिसतो.

२] कांपाऊंड मायक्रोस्कोप - दोन लेन्स असतात - डोळ्याजवळील लेन्स -आयपीस व स्लाईडजवळील लेन्स ऑब्जेक्टिव्ह लेन्स.
अ] आयपीस - १०X किंवा १५X व ब] ऑब्जेक्टिव्ह लेन्स - ४५X, ६०X व १००X
१००X ही मॅक्झिम पॉवरची लेन्स असते - यातून बॅक्टेरिया पहाता येतात. मायक्रोबायॉलॉजीचे सर्वजण याचा वापर करतात.
टोटल मॅगनिफिकेशन १०००X = १०X X १००X
पॅथॉलॉजी लॅब मधे जे असतात त्यांची ऑब्जेक्टिव्ह लेन्सची पॉवर ४५X, ६०X व १००X असते.
- यात जी ऑब्जेक्टिव्ह लेन्स असते (डॉक्टरकडे- पॅथॉलॉजी लॅब मधे असतात असे मायक्रोस्कोप) त्यानुसार किमती वाढत जातात.
ही सर्व साधारण माहिती आहे.

नी...कसचं !!कसचं!
काही काळ या सुक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास केल्याने जरा बेसिक आठवतय.
त्याच्या पुढचं मात्र नको विचारु. Wink Proud

काही काळ या सुक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास केल्याने जरा बेसिक आठवतय. >>> काय सांगतेस आर्या - तू ही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेस तर .... Wink Happy

मी तर सुक्ष्मजीवशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं गं. पण आता एक बॅक्टेरीया आठवेल तर शप्पथ! Proud
हो, शशांकजी.. आपलं मागे बोलणं झालं होतं यावर. Happy

मामी - ती वर दिलेली लिंक पाहिली - आता हे नवीन ४००X काय आले हे पहावे लागेल.... माझं ज्ञान/माहिती (?) ३० वर्षांपूर्वीचे असल्याने अपडेट करायला पाहिजे आता .... Wink Happy

मुलगी कितवीत आहे?
लाईट अ‍ॅटॅच असलेलेही स्कोप्स आहेत पण त्याची गरज नाही.
पॉईंटर असलेला आयपीस मिळत असेल तर पहा
त्या कीटमध्ये बरेच काही दिलेले आहेच, तरी अजून ग्लिसरीन, आयोडीन, सॅफ्रॅनिन लागेल. बॅक्टेरिअल स्टेनिंग करायचे असेल तर क्रिस्टल व्हायोलेट, इथिल अल्कोहोलही लागेल.

<<आयोडीन कोणत्याही केमिस्टाकडे मिळावे ना?<<
माझ्या मते असं प्युअर आयोडीन नाही चालत.
आयोडीन सोल्युशन्स असतात्...अल्कोहोलमधे बनवलेली. त्यांची काही प्रपोर्शन्स असतात.
टीचर्सला विचारुन घ्यावं हे उत्तम!
याची डीटेल्स आगाऊ देतील.

मामी, जर असाच मुलीचा विज्ञानातली रुची वाढवायला घ्यायचा असेल तर
http://www.digiblue.com/digital-blue-qx7-digital-computer-microscope/

बर्‍यापैकी चांगला आहे. केस ठेवला तर त्याची रचना छान दिसते. स्क्रीन डिस्प्ले असल्याने डोळ्यावर ताण येत नाही.

मुलगी चौथी आहे.

मायक्रोस्कोप पुढे बरीच वर्ष उपयोगी पडेल आणि होपफुली, वापरला जाईल अशी आशा बाळगून आहे.

आगाऊ आणि अदिती .... धन्यवाद.

>>>> त्या कीटमध्ये बरेच काही दिलेले आहेच, तरी अजून ग्लिसरीन, आयोडीन, सॅफ्रॅनिन लागेल. बॅक्टेरिअल स्टेनिंग करायचे असेल तर क्रिस्टल व्हायोलेट, इथिल अल्कोहोलही लागेल. >>> हे कोणाकडे मिळतं??? यांचे वेगळे डीलर्स / दुकानं असतात का?

मामी,
आमच्या कन्येसाठी घेतलेला मायक्रोस्कोप नुसताच पडून आहे. त्याचा उपयोग होत नाही : विकत घेऊ नका, अशी माझी नम्र विनंती.

घ्यायचाच असेल, तर कमीत कमी कोणत्याही पॅथॉलॉजी ल्याब वाल्याला चालेल इतपत पॉवरचा घ्या. म्हणजे मग काम झाल्यावर लॅब वाल्यांना डोनेट करता येईल. घराजवळच्या कोणत्याही डीएमएलटी लॅबमधे जाऊन त्यांनी मायक्रोस्कोप कुठून व कितीला घेतला ते विचारून घ्या. ग्लास स्लाईड, कवर स्लिप इ. महाग नसते. - ज्यु.कॉलेज/शाळांच्याच कोऑप स्टोअर मधे मिळते.

४थी साठीच स्टार्च + आयोडिनचा प्रयोग करायचा असेल तर साधे आयोडिनयुक्त टाटा नमक बटाट्याच्या खरवड(स्क्रेपिंग) मधे घाला. स्टार्च निळा होइल. नळाचे पाणी 'तो' द्रव म्हणून वापरता येते. इतर स्टेन्स कोणत्याही 'सायंटिफिक वर्क्स' नामक दुकानांत मिळतील. लोकल शाळेच्या लॅब मधे चौकशी केल्यास दुकानाचे नांव कळेल.

ता. क.
घ्यायचा तर, तुम्ही पेस्टलेल्या लिंकमधे हा मायक्रोस्कोप बिन्धास्त घ्या. पुरेसा आहे. किंमतही रास्त आहे.

इब्लिस, उशीर झालाय. पिंकी प्रॉमिस घेतलंय. Proud

शिवाय सूक्ष्मदर्शकाच्या निमित्ताने काही अभ्यासाशी निगडीत थोडंफार कार्य तिच्या हातून घडेल तरी तितकंच समाधान. कारण नाहीतर शाळेतून आल्यावरचा सगळा वेळ आर्ट आणि क्राफ्ट मध्ये घालवते ती.

इब्लिस, हो, त्याचीच चोक्सी केली मी. बरा वाटतोय.

४थी साठीच स्टार्च + आयोडिनचा प्रयोग करायचा असेल तर साधे आयोडिनयुक्त टाटा नमक बटाट्याच्या खरवड(स्क्रेपिंग) मधे घाला. स्टार्च निळा होइल. नळाचे पाणी 'तो' द्रव म्हणून वापरता येते. इतर स्टेन्स कोणत्याही 'सायंटिफिक वर्क्स' नामक दुकानांत मिळतील. लोकल शाळेच्या लॅब मधे चौकशी केल्यास दुकानाचे नांव कळेल. >>>> धन्यवाद. बरीच माहिती मिळाली. Happy

( १०वीतलं प्रॅक्टीकल आठवलं) >> अजुन आठवतय..
मी आपला गुपचुप प्रतिसाद वाचुन काहि आठवतय का ते प्रयत्न करतोय पण पाटी अजुन कोरीच आहे. Lol

मामी, सौ पतेका बाफ Happy कालच विचार आलेला मनात.

किमतीचा साधारण अंदाज द्या लोकहो. डिसेक्शन कधी केलं होतं ते आठवत नाहिये पण कसं केलय ते पक्क आठवतय.

मासे सिरीयसली सुरु केल्यावर घ्यायचा म्हणतोय Happy कॉम्प्युटरला जोडता येईल असं काही बजेट प्रॉडक्ट आहे कॉय ? Wink

मला त्याची स्पेक्सपण माहित नाहीत. पॅरॅसाईट्स, कल्चर्स आणि पोस्टमॉर्टेम ह्या कामांसाठी वापरेन

हे काय आहे ?

किंमतीचं व्हेरीएशन खूप आहे. http://www.ebay.in/sch/Microscopes-/48741/i.html

http://catalogs.indiamart.com/products/usb-microscope.html

Pages