स्प्लेंडिड क्वांग चौ - भाग ५ (अंतिम)

Submitted by वर्षू. on 12 February, 2013 - 00:38

http://www.maayboli.com/node/40890 - भाग १

http://www.maayboli.com/node/40893 -भाग २

http://www.maayboli.com/node/40896 - भाग ३

http://www.maayboli.com/node/40953 -भाग ४

चीनी माणसाशी ओळख झाली रे झाली कि त्याच्याकडून दोन प्रश्न आपल्याकडे फेकले जातात.पहिला हा,'व्हॉट इज युअर चायनीज नेम ?" आपण या प्रश्नाचे नकारात्मक पण नम्र उत्तर द्यायची तयारी करत असताना लगेच दुसरा प्रश्न ही आपल्यावर लगेच आदळतो,' व्हॉट स्पोर्ट यू प्ले?' तू कोणता खेळ खेळतेस ?' दोन्ही प्रश्नांची आपल्याकडे नकारात्मकच उत्तरे असल्यामुळे आपण अवघडल्यासारखे गप्प राहतो.मग चीनी माणूस आपल्याकडे निरखून (नेमकं काय ?) पाहात,मनातल्यामनात काय ते उमजून,समजूतदारपणे गप्प बसतो.पण कोणी कोणी आगाऊपणे कानउघाडणीदेखील करतात,' तुम्ही लोकं काही खेळत नाही( खेळ म्हणजे त्यांच्या लेखी एक्सरसाइजसुद्धा असते बरं!)
तुम्ही उशिरा जेवता,लगेच झोपता, म्हणून तर तुम्ही सर्व्......"मग त्याला म्हणावेसे वाटते,' वो छोडो,ये ना सोचो...."
चीनमधे खरोखरच शारीरिक हेल्थ ला प्रचंड मह्त्त्व आहे. रोज सकाळी रिटायर झालेले स्त्री पुरुष तायची ,हातात पंखे घेऊन तालावर सामूहिक नृत्य वगैरे करत असतात. तर संध्याकाळी नियमाने बागेत फिरायला जाणे, कसरती करणे हा तर यांचा आवडता उद्योग आहे.
इथे प्रत्येक एरियात मोठाल्या सार्वजनिक बागा आहेत. रस्त्यांवरून सहज चालता चालता वाटलं तर खुशाल या बागांमधे शिरावं, फेरफटका मारावा, मोकळ्या हवेत कसरती कराव्या, दमायला झालं तर तिथेच एखाद्या दगडी बाकावर आराम करावा.. या बगिच्यांची एक अजून खासियत आहे. इथे भरपूर संख्येत निरनिराळ्या प्रकारच्या व्यायामांकरता इक्विपमेंट्स, लावलेले आहेत.कुणीही यावं, या सर्व सवलतींचा नि:शुल्क लाभ घ्यावा..
घराजवळ असलेल्या या गार्डन ला जायचा रस्ता ही क्वांग चौ च्या इतर रस्त्यांप्रमाणे इतका सुबक आणी रेखीव आणी स्वच्छ आहे कि त्याची एक झलक दाखविण्याचा मोह आवरता आला नाहीये मला..

रुंद, सहा पदरी रस्त्यांवरच्या डिवायडर्स मधे, रस्त्याच्या वळणावरच्या मोकळ्या ट्रँगल मधे फुलचफुलं लावून रुक्ष रस्त्यालाही सुंदर कलरफुल बनवून टाकलेलं आहे

रस्त्याला लागून असलेला १३ फुटी फुटपाथ वर सायकलिस्ट्स करता वेगळी लेन आहेच.. पायी चालणार्‍याला ऊन,पावसाचा त्रास जाणवू नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा घनदाट आणी मोठाले वृक्ष लावलेले आहेत. इथे फुटपाथवर वेंडर्स अजिबात दिसत नाहीत.

हे आमच्या घराजवळच असलेलं एक गार्डन..

रोज संध्याकाळी पाण्याचा टँकर येऊन इथल्या झाडांना व्यवस्थित पाणी देऊन जातो. माळीबुवा आपापली नेमलेली कामे निमूटपणे करत असतात. मजा म्हंजे ही गार्डन्स नेहमीच टापटीप आणी रेखीव दिसतात.

वॉकिंग एरिया सोडून पुढे आलात कि दोन्ही बाजूला शंभरापेक्षा जास्त, परमनंटली फिक्स केलेली टेबल टेनिस ची टेबलं दिसतील. टेबलावर पितळी ,भक्कम नेट फिक्स करून टाकलेली असते. फक्त आपली बॅट आणी बॉल घेऊन या..

हाताच्या सगळ्या पॉईंट्स ना दाब मिळून रक्तप्रवाह सुरळित होण्याकरता लावलेल्या या फिरत्या चकत्या वृद्ध लोकांना विशेष प्रिय आहेत..

From Guangzhou

हे लहान पिल्लू, हम भी कुछ कम नही ' च्या तालावर आपणच कसरत करत होतं

स्टेपर्स च्या .. कडेने एक ५०,६० माजोंग टेबले फिक्स केलेली आहेत. हा चीनी लोकांचा हा अत्यंत आवडीचा बैठा खेळ.

विविध इक्विपमेंट्स


कंबरेला धक्का न लावता साईड ट्विस्टिंग करण्यासाठी हे साधन फार उपयोगी आहे. ही एक्सरसाईज करत असलेल्या या हसतमुख आजोबांनी फोटो काढायला परवानगी दिली..

ग्राऊंड च्या दुसर्‍या भागात मधे जाळी लावून ,पलीकडे मुलांकरता बास्केट बॉल, फुटबॉल खेळण्याची सोय केलेली आहे.

आपल्या नागरिकांच्या आरोग्याकरता सरकार जितके जागरूक आहे , इकडली जनता देखील तितक्याच काटेकोरपणे घालून दिलेल्या नियमांचे पालन करत असते. आजपर्यन्त मी तरी कुठलंच तुटकं फुटकं , बिघडलेलं इक्विपमेंट इथे पाहिले नाही आणी लोकंही कधी ही जागा मिस यूज करताना पाहिले नाहीत.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे तर स्वर्गाचेच वर्णन वाटते आहे. तुम्ही लोक स्वर्गात राहता ही खरोखरीच आनंदाची गोष्ट आहे त्याशिवाय स्वर्गातून, इथे मायबोलीवरही येता, आम्हाला सगळ्या स्वर्गसुखाच्या गोष्टी सांगता, हीही आनंदाचीच गोष्ट आहे. मात्र, ह्यामुळे आता इथले लोक "आम्हाला एकदा स्वर्गात हिंडवून आणा ना!" असा आग्रह करण्याची शक्यता नाकारता येत नाही!

तरीही, हा स्वर्ग निर्माण झाला कसा, कुणी केला, आपणही तसा करू शकू काय, त्याकरता इथे आम्ही काय करायला हवे अशा विचारांची गर्दी दाटून आल्याने, आता प्रतिसाद आवरता घेतो.

हे मात्र सांगायलाच हवे की ही सर्वच मालिका आवडली. चीनविषयी ऐकीव अवास्तव गोष्टी समजून घेण्यापेक्षा, त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा पुराव्यानिशी सादर करण्याचा हा उपक्रम तर मला बेहद्द आवडला.

कबूल आहे की आम्ही कर्तृत्वाच्या अंधारकोठडीत बंद आहोत. पण असल्या झरोक्यांतून बाहेर पाहू, तेव्हाच तर सुटकेचे मार्ग दिसू लागतील ना! म्हणूनच अशा लेखांकरता हार्दिक अभिनंदन आणि पुढील लेखनाकरता मन:पूर्वक शुभेच्छा!

वर्षू नील....

"...इतकेच नव्हे तर जो शेतकरी जास्तीतजास्त चिमण्या मारेल त्याला चांगलं इनाम ही देण्यात येत असे...."

~ या मोहिमेविषयी इथे काहीसे सविस्तर लिहिणे मल आवश्यक वाटते, कारण माओने उचललेले हे पाऊल त्या साली [१९५८-५९] जगभर चर्चेचा विषय झाले होते. आपल्या कृषि विद्यापीठातूनही या संदर्भात भरलेल्या शैक्षणिक शिबिरामध्ये हा विषय चर्चिला गेला होता. [आजही दापोली कृषि विद्यापीठात या माओ प्रयोगावरील साहित्य उपलब्ध आहे....]

कृषि उत्पादन वाढविण्यासाठी माओ आणि त्याच्या सहकार्‍यांनी १९५८ मध्ये चालविलेली ही मोहिम एकट्या "चिमण्यां"च्या विरूद्ध नव्हती तर त्यात अजून तीन घटक होते....डास, माशा आणि उंदीर. चिमण्यांचा.... अंग धरण्यापूर्वीच पेरलले बी-बियाणे त्या खातात असे आढळल्याने..... समावेश नंतर करण्यात आला. आवाहनाला [माओ देवच होता चिनी जनतेसाठी....त्यामुळे ताबडतोब प्रतिसाद मिळत असे] हाक देऊन शेतकर्‍यांनी मग मिळेल त्या आयुधाने....डबे, भांडी, ड्रम्स, काठ्या, कुर्‍हाडी, कोयती आदी....या 'चार डोकेदुखीं' चा नायनाट करण्यास सुरुवात केली. या चौघात बिचार्‍या चिमण्याच अधिक मात्राने बळी पडल्या कारण झाडावरील त्यांची घरटी शोधून काढून त्यातील अंड्यांचा तसेस नवजात पिलावळीचा नाश करणे शेतकर्‍यांना सहजी शक्य झाले. तुम्ही म्हणता तशी चिमणीमार वीरांना 'प्रोत्साहनात्मक' बक्षिसेही देण्यात आली होती...विशेष म्हणजे या मोहिमेत शाळेतील मुलामुलींनाही राबविण्यात आले होते.

वर्षभरात या मोहिमेचे फलित असे दिसून आले की, [पक्षी शास्त्रज्ञांनी दाखवून दिले]... चिमण्या जरी बीबियाणे खात असल्या तरी त्याचबरोबर त्या शेतीला घातक असलेले अन्य किडेकिटाणूही खात असत. आता चिमण्यांचीच संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याने ही किटाणू मंडळे बलवान झाली... [टोळांसारखी.... लोकस्ट] आणि जिथे धान्याचे उत्पादन वाढणे गरजेचे होते....त्यात उलट आणखीनच घट झाली....आणि आपल्या "चिमण्या हटाव" मोहिमेचा फज्जा उडाल्याचे पाहून मग १९६० मध्ये खुद्द माओनेच 'चौकडी' च्या यादीतून 'चिमण्या' वर काट मारली आणि त्याजागी 'झुरळ' येऊन बसले.

अशी ही कहाणी....'चिनी चिमण्यां' ची.

अशोक पाटील

नरेंद्र काका, धन्यवाद!!! तुम्ही माझ्या पॉजिटिव्ह अ‍ॅटीट्यूड बद्दल केलेले अभिनंदन आवडले. Happy आजवर वर्तमानपत्रातून किंवा मासिकांतून किंवा माबो वर चीन ची जी तसवीर दाखवत आलेय ती प्युअरली स्वानुभावांवरच आधारलेली आहे.त्यात कुठेही बनाव नाहीये.
प्रत्येक देशात्,माणसात, मला पॉजिटिव्ह पॉईंट्स शोधायला आवडतात..

दुसरा प्रश्न ही आपल्यावर लगेच आदळतो,' व्हॉट स्पोर्ट यू प्ले?' तू कोणता खेळ खेळतेस ?' दोन्ही प्रश्नांची आपल्याकडे नकारात्मकच उत्तरे असल्यामुळे आपण अवघडल्यासारखे गप्प राहतो.
>>>> वर्षुदी, या प्रश्नावर तु का गप्प राहतेस???? सांग ठणकावून "मी माबो माबो खेळते म्हणून." Proud

अशोकजी, मस्त माहिती. धन्यवाद.

बाकी झुरळ या प्राण्याचा जागतिक पातळीवर नायनाट करण्याची मोहिम आखली पाहिजे.

बाकी झुरळ या प्राण्याचा जागतिक पातळीवर नायनाट करण्याची मोहिम आखली पाहिजे.>>> नक्कीच
Proud

अशोकजी.. माहितीत मोलाची भर टाकल्याबद्दल अनेक धन्यवाद!! Happy
मामी , नेक्स्ट टैम ला ह्येच उत्तर देईन.. Proud
'बाकी झुरळ या प्राण्याचा जागतिक पातळीवर नायनाट करण्याची मोहिम आखली पाहिजे''.... हे खाणे इकडच्या जनतेलाही साध्य झालेले नाहीये.. तेंव्हा हा ऑप्शन बाद आहे Wink

वर्षू,
चीनची अशी देखणी सफर घडवून आणल्याबद्दलल यांचे शतशः आभार !!

हे पाहुन आस्चर्य,हेवा तर वाटलाच, पण इकडची परिस्थिती (१० % तरी) पाहुन राग/चीड आली, आपल्याकडे हे शक्य आहे पण खुर्चीवर बसलेली तशी माणसं बदलली पाहिजेत, जनताही सुधारली पाहिजे
पुण्यातले २-३ बसस्टोपच चोरीला गेले यावरुन बघा, काय काय चोरु शकतात इथले लोक..

खरंच, व्यायामाकडे असे खास लक्ष दिल्याने, सगळे कसे तंदुरुस्त दिसतात. तूम्ही काय खेळ खेळता ? या प्रश्नाला
आपल्यापैकी बहुतेक जण नकारार्थी उत्तर तर देईलच पण डझनभर कारणे आणि सबबी पण देतील.

मस्त फोटोज वर्षूताई.
चायना मध्ये जी मजा अनुभवली ती इतर कोठेही नाही बघायला मिळाली.
मी मागच्याच भागात फर्माइश करणार होतो एखाद्या जाड्या, तरुण चिनी माणसाचा फोटु द्या म्हणुन. >>> झकोबा खुपच दुर्मिळ गोष्ट शोधायला सांगतोयस तु.

बसस्टॉप चोरले?????? नि:शब्द,स्तब्ध,अवाक व्ह्यायला झालंय.. पब्लिक प्रॉपर्टीची काळजी घ्यायला म्हणून घरीच उचलून घेऊन जायला लागलेले आहेत कि काय लोकं.. Uhoh अनबिलिवेबल!!!!

वर्षूदी मस्त सफर Happy हा भाग विशेष आवडला. Happy

व्यायामाची अशी सार्वजनिक उपकरणे बघून फार हेवा वाटला. टी टी ची टेबलं सही.>>>>>रूनी +१

धन्स वर्षू या सुंदर लेखासाठी . प्रचि तर अक्षरशः हेवा वाटाव्या अशा जगाची सफर घडवून आणणारी आहेत.
चिन्यांनी त्यांचे मुळात आटोपशीर देह आटोक्यात ठेवण्यासाठी केलेले आटोकाट प्रयत्न पहाता आपण खूप काही शिकण्यासारखे आहे खरे Happy

भाग १ ते ५ ...मस्तच. छान माहिति. तुम्हि मला वाटत कि आता चायनाचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडर झाला आहात..

येळेकर्,हताश नका होऊ... आपल्या आसपास चं वातावरण कसं स्वच्छ ठेवू शकू आपण याची जाणीव ठेवली तरी थोडा फरक पडेल बहुतेक इतरांच्या मानसिकतेत... ब हु ते क.... होप फॉर द बेस्ट!!!!!!! Happy

Pages