देवळांच्या देशा - "गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)"

Submitted by जिप्सी on 11 February, 2013 - 12:50

१. देवळांच्या देशा – "अंबरनाथचे शिवमंदिर"
२. देवळांच्या देशा - "मानस मंदिर"
३. देवळांच्या देशा - "शहाडचे बिर्ला मंदिर"

=======================================================================
=======================================================================
गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे.

हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.

रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.
(साभार-विकिपीडिया)

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
मंदिरातील शिवलिंग
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे जिप्सी. सगळे फोटो फारच आवडले.

तू माझ्या गावीपण अकोले ला पण जा. सिन्नर पासून ६० किमी आहे. सिन्नरहून संगमनेरला जा आणी तेथून अकोले येथे जाऊ शकतो.

गावात सिध्देश्वर आणी गंगाधरेश्वराचे मंदिरं अशीच प्राचीन आहेत. तसेच जवळच टाहाकारी येथे देवीच अतीशय सूंदर प्राचीन मंदिरपण आहे. तू त्यांचे फोटो बघायला मजा येईल.

वाह!!!!!!!!!!! Happy

तु जवळच असलेल्या स्फटिक म्युझियम मध्ये गेला असशीलच.
त्याचे फोटो तुझ्या फ्रेमिन्ग मध्ये बघणं आवडेल.

धन्यवाद राजेश, रोहित, झकास Happy

सिध्देश्वर आणी गंगाधरेश्वराचे मंदिरं >>>>या मंदिराबद्दल ऐकुन/वाचुन आहे. पण अजुन पहिले नाही. मागे राजूर पर्यंत गेलेलो पण वेळेअभावी अकोलेला जाता आले नाही. नक्की एकदा जाऊन येईन. Happy

स्फटिक म्युझियम मध्ये गेला असशीलच.>>>>नाही ना. वेळेअभावी गारगोटी संग्रहालय पाहता नाही आले. Happy

अप्रतिम आहेत मंदिरं! Happy
सिन्नर अगदी जाण्यायेण्याच्या वाटेवर आहे. पण तिथे असं मंदिर आहे हे महित नव्हतं.

अकोला(संगमनेर) मधे पण एक खुप पुरातन मंदीर आहे. मी खुप लहान असतांना गेलेले तिथे....तेव्हा कळलेलं की जमिनीतुन वर आलेलं(आपोआप नव्हे) आहे ते..
नेहमी आपण ऐकतो तशीच आख्यायिका:
एक शेतकरी नांगरत असतांना त्याच्या नांगराच्या फाळाला या मंदिराचा कळस लागला असं म्हणतात. आणि खरच ते मंदीर जरा खोलवर आहे.

प्रचि अत्यंत सुंदर!

परंतू गोंदेश्वर मंदिराची विशेष अशी जपणूक मात्र पुरातत्व खात्याकडून होत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. एकदा तिन्हीसांज झाली की तिथे काय काय चालते ह्याचे चित्रण कुणीतरी खात्याला पाठवायला हवे.

प्राप्त परीस्थितीत हा ठेवा आणखी किती वर्षे 'ऑन इट्स ओन' टिकून राहील देव जाणे.

झक्कास....
प्रचि १, ४, ७ तर अफलातुन...
मित्रा, शक्य झाले तर PP करुन माणसे काढुन टाकत जा. उगाच eyesore वाटतात.

मस्त!!!

मस्त फोटो. दुसरा फोटो फार आवडला. Happy माहिती पण उत्तमच.
आणि इतकं सुरेख सुबक नक्षीकाम करणार्‍यांना (अज्ञात कलाकारांना) __/\__

सुंदर फोटो.
देवस्थान पूजेत राहिले तरच टिकून राहते. कुठल्याही कारणाने ती बंद पडली तर..

मंदीर जागतं असावं म्हणजे त्याला ऑईलपेंट लावावा असे नव्हे कि सभोवार दुकाने उभारावीत असेही नव्हे.
असे अगदी नेमकेपणाने जपलेले देऊळ म्हणून मी गोव्याच्या तामडी सुर्लाचे नाव घेईन. ( सध्या मुखपृष्ठावर आहे तेच.)

एकदा तिन्हीसांज झाली की तिथे काय काय चालते ह्याचे चित्रण कुणीतरी खात्याला पाठवायला हवे.>>

@विजय दिनकर पाटील - भारतात, महाराष्ट्रात हजाराने, शेकड्याने 'प्रोटेक्टेड' मंदिरं आहेत. तिथे एखादा वॉचमन ठेवण्यापलिकडे आणखी सुरक्षा ठेवणं पुरातत्व खात्याच्या मनुष्यबळाच्या आवाक्याबाहेर आहे. या अशा गोष्टी प्रोटेक्टेड, अनप्रोटेक्टेड मंदिरांमधे सगळीकडेच चालतात...

प्रश्न असा आहे की मंदिरांची देखभाल करणं, ती जपणं हे फक्त सरकारचं काम आहे का? सिन्नरमधल्या, त्यात्या गावातल्या कुठल्याही जाणत्या व्यक्तींना त्याचा अभिमान का नसावा? किंवा आपल्या गावातल्या मंदिरांची जपणूक करण्यात आपलापण वाटा असावा कारण तो आपला वारसा आहे असं कधीच कुणाला का वाटत नाही? सगळी जबाबदारी केवळ अभ्यासक आणि सरकारी खात्यांवर ढकलून लोक हात झटकून का मोकळे होतात?
हे प्रश्न तुम्हाला वैयक्तिक विचारत नाहीये तर नेहेमीच 'पुरातत्व खात्याने लक्ष दिले पाहिजे' असा सूर असतो त्यावर एक प्रतिक्रिया आहे. सरकारी कारभार खूप वेळा गलथान असतो ते कुणीच अमान्य करणार नाही पण वारसा जपणूक हे फक्त सरकारचं नाही तर आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे हे ज्यादिवशी बहुसंख्य समाजाला वाटेल तेव्हाच आपला वारसा टिकेल.

रच्याकने, जिप्सी, मस्त फोटो आलेत. तू अन्वा (औरंगाबाद जवळ) किंवा झोडगेची (मालेगाव-धुळे रस्त्यावर) मंदिरं कधी जमलं तर आवर्जून जाऊन बघ Happy

मस्त! सुरेख आले आहेत फोटो.

आपल्याकडच्या मंदिरांतून कोरीव छत तयार करण्याची कला खूपच प्रगत झालेली होती असे दिसते.
कला तर आहेच पण त्यातील अभियांत्रिकी कौशल्य नेत्रदीपक आहे. त्याखातर आपल्याला आपल्या पूर्वजांचा अभिमान वाटायला हवा!

नेहमीप्रमाणेच तुला मुजरा अप्रतिम प्रचिंबद्दल.
मंदिराच्या सभामंडपातील एका खांबावर मैथुनशिल्पे आहेत. आणि शिवलिंगावरील तीर्थ बाहेर येते त्याठिकाणी अप्रतिम मकरमुख आहे. या पंगतीत त्या प्रचिची गैरहजेरी जाणवतेय. प्रचिंच्या कोनांवरून वाटतंय की तू पलिकडील बाजूस गेला नाहीस.
सिन्नरमध्येच दुसरं एक अप्रतिम मंदिर म्हणजे ऐश्वर्येश्वराचं. तिथे द्वारावरील शिल्प अप्रतिम व दुर्मिळ आहे.
वरील प्रतिसादांमध्ये उल्लेख झालेले अकोल्याचे सिद्धेश्वर मंदिरातील युद्धशिल्प देखणे आहे. त्यात उंटाचे शिल्प आहे बहुतेक. गंगाधरेश्वर पेशवेकालीन आहे. टाहाकारीचे तिन गाभार्‍यांचे देवीचे मंदिर. बाहेर काही मैथुनशिल्पे, एक शिलालेख आणि कळसाला विटांचे बांधकाम ही काही वैशिष्ट्ये आहेत.
मला फोन न केल्यामुळे तुझा त्रिवार निश्श्शेध.. Happy

जिप्सि अप्रतिम ..सर्व प्रचि छान आहेत व महितीपण संग्रही ठेवण्यासारखी वरदा http://www.maayboli.com/node/42663 माबो वरील ही पोस्ट झोडग्याच्या मंदिराविषयी आहे. तसेच चाळीसगाव (जळगाव) जवळ पाटणा देवी येथेही एक प्राचीन मंदीर आहे. तेही खूप सुंदर आहे .तेथे अहिराणी भाषेचा पहिला शिलालेख आहे.