देवळांच्या देशा - "माणकेश्वर हेमाडपंथी मंदिर (झोडगे)"

Submitted by ज्ञानु on 25 April, 2013 - 00:59

(आधी मी प्रिय मित्र जिप्सी यांची माफी मागतो . त्यांच्या लेखमालेचे नाव मी माझ्या या लेखाला दिले परंतु .हेच नाव याला योग्य असले असते अस मला वाटत. जिप्सी मित्रा क्षमस्व आणि आभार .)

भारतातील काही मोजक्या हेमाडपंथी मंदिरातील हे एक माणकेश्वर शिवालय . नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला मालेगाव तालुक्यात झोडगे म्हणून एक गाव आहे तिथे हे मांदिर आहे . मालेगाव ते धुळे मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.3 वर हे गाव लागते .रस्त्याने जातांना उजव्या बाजूला नजर टाकल्यास एका टेकडीच्या खाली हे मंदिर स्पष्ट दिसते.
अंबरनाथ येथील शिवमंदिर ,सिन्नर येथील गोंदेशवर ,तसेच त्रांबकेश्वरचे मंदिर हे याच शैलीतले . इंटरनेटला खूप शोधले पण या मंदिराची मोजकीच माहिती मिळाली मग शेवटी मोह न अवरल्याने हा उपेक्षित कलेचा खजाना पहायला निघालो .
मंदिर परिसर प्रशस्त व रमणीय आहे .कुठल्याही मंदिरात असणारा गोंगाट येथे नसतो . एक नीरव शांतता जी तुम्हाला क्षणार्धात ध्यानस्थ करून टाकेल . अशी ही जागा . झोटिंग नावच्या टेकडी वर नाथपंथीय साधूंचा वास होता त्यांच्यासाठी हेमाद्री पंडिताने इ.स. च्या १३ व्या शतकात हे मंदिर येथे उभारले. मंदिरासमोर याच मंदिराची छोटी प्रतिकृती पडक्या अवस्थेत उभी आहे.स्थानिक नागरिकांना भेटल्यावर भारतीय पुरातत्व खात्याचे या कलाकृती कडे किती दुर्लक्ष आहे हे समजते . फक्त अजिंठा -वेरूळ हि दोनच ठिकाणे माहिती असणार्‍यांनी एकदा या मंदिराला नक्की भेट द्यावी . येथील काही स्थानिक तरूणांकडून दरवर्षी दीपावली पाडव्याला "दीपोत्सव " घेतला जातो 3500 दिवे लावून हे तरुण "मंदिर संवर्धंनाचा" संदेश देतात .
बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराजवळ महाराष्ट्रातील सर्व मंदिरांच्या प्रतिकृती पाहावयास मिळतात त्यात याच्या प्रतिकृतीचाही समावेश आहे.
येथे दर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते . राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात या यात्रेचे या यात्रेचे विशेष म्हणजे पारंपरिक तमाशा व कुस्त्यांची दंगल .
तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद वाटतो की मला आमच्या मंदिराचा खूप जुना फोटो मिळालाय . तो आपणा सोबत share करतांना प्रचंड आनंद वाटतोय . साभार माजी सरपंच दीपक लोटणराव देसले .
575421_129356887256257_186927552_n_0.jpg
प्रचि . 1
zodage temple.jpg
_______________________________________________________________
प्रचि २ .
Untitled_Panorama23.jpg
मंदिरावरील शिल्प अत्यंत कोरीव आहेत मंदिराची डावी बाजू काही प्रमाणात ढासळलेली असली तरीही उजवी बाजू अजूनही जशीच्या तशी आहे.भगवान विष्णूच्या १० अवतरांची शिल्प इथे पाहावयास मिळतात .यातील वामन अवतार शिल्प जे प्रचि . २ मधील एका चौकटीत दिसते अत्यंत सुंदर आहे . यात त्यांनी पातळ नरेशच्या डोक्यावर आपले तिसरे पाऊल ठेवून हातात छत्री घेऊन उभे असल्याचे दिसते . तसेच इतर देव देवतांची शिल्पेही इथे आढळतात .
________________________________________________________________
प्रचि ३.
913723_506588586068066_955616105_o.jpg
मंदिराचे एक मुख्य वैशिष्ट्य येथे आलेल्या पुरातत्व खात्याच्या अभ्यासककडून समजले .हे जगातील एकमेव असे मंदिर आहे . की ज्याला ३ "कीर्तीमुख " आहेत . याच्याशी सलग्न कुठल्याही हेमाडपंथी अथवा इतर शैलीतल्या मंदिरांना १ च कीर्तीमुख आहे . कीर्तीमुख म्हणजे हिंदू धर्मात घरच्या प्रवेश द्वाराला लावले जाणारे मुखवटे. ज्याचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. सध्या यातील दोन किर्तिमुख तसेच आहेत तर तिसरे ढासळले आहे. परंतु माणसाचा हात अजूनही तिथपर्यंत न पोहोचल्यामुळे येथील काम टिकून आहे.

___________________________________________________________________
प्रचि ४.
S6300161.jpg
मंदिर पाश्चिमाभिमुख आहे . त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण थेट गाभर्यात प्रवेश करतात .
___________________________________________________________________
प्रचि ५.
IMG_0363.jpg
मंदिरातील शिवलिंग. व गाभारा . येथील शिवलिंग कोकणातील "मारलेश्वर शिवलिंगाशी साधर्म्य साधणारे आहे.
___________________________________________________________________
प्रचि ६.
12.jpg
___________________________________________________________________
प्रचि ७. IMG_0329 (2).jpg
___________________________________________________________________
प्रचि ८.
01.jpg
महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकार आर्टिस्ट शिवाजी तुपे यांनी काढलेले मंदिराचे रेखाचित्र .
___________________________________________________________________
प्रचि ९..
63302_436450883081837_1801063044_n.jpg
___________________________________________________________________
प्रचि १०
481771_436450933081832_848845182_n.jpg
__________________________________________________________________
प्रचि ११. .61484_436450973081828_1379641726_n.jpg
_____________________________________________________________________
प्रचि १२
598422_436450899748502_959714822_n.jpg
______________________________________________________________________
प्रचि १३ .
3757_435291233197802_1410319691_n.jpg
______________________________________________________________________
एक आव्हान - आपल्याला महाराष्ट्रातील इतके मंदिर माहीत आहेत. परंतु या मंदिरसारखी अनेक अशी मंदिरे दडलेल्या खजान्यासारखी आहेत. त्यांच्या जतन आणि संवर्धंनासाठी निदान एकदा तरी त्यांना भेट द्या .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच !
भर उन्हाळ्यात डोक्या-कानाला फडका गुंडाळून उघड्या जीपमधून धुळे- नाशिक येताना हें मंदिर पहाण्याचा सुखद अनुभव घेतलाय मीं ! दुधांत साखर तसं माझ्या आवडत्या चित्रकारानं [ शिवाजी तुपे ] काढलेलं त्या मंदिराचं स्केचही इथं पहायला मिळालं !! धन्यवाद.
[ तिथून जवळच लोंकरीसाठी ऑस्ट्रेलियन जातीच्या मेंढ्या पाळण्याचा रेमंड वूलचा एक मोठा प्रकल्प येऊं घातला होता; पुढे काय झालं त्याचं हेंही कुतूहल आहे ].

भाऊ रेमांड वुल प्रकल्पाची अमूल्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तसेच लिंबूजी आपल्या प्रतिक्रियेबद्दलही आभारी आणि. उमेशप आपण योग्य जागा सांगितली ती हीच जागा आहे.

मस्तच आहे मंदिर. एकेक करुन खरच या सिरीजमधल्या सगळ्या देवळांना भेट द्यायला हवी. मागे घृष्णेश्वराचे मंदिर बघुन असेच मस्त वाटले होते.

धन्यवाद,
एका अनवट ठिकाणी असलेल्या, अश्या सुंदर शिल्पकृतीची ओळख इथे करुन दिल्याबद्दल.

माहिती छान आणि सुंदर प्रचि Happy

त्यांच्या जतन आणि संवर्धंनासाठी निदान एकदा तरी त्यांना भेट द्या . > नक्कीच प्रयत्न करु.

सुर्रेख आहे मंदिर! :

रच्याकने, माझ्या गावाच्या इतक्या जवळ असुनही ह्या मंदिराविषयी काहीच माहिती नव्हती. Sad

कांदे पोहे , योग ,झकास विजय ,इंद्रधनु ,जिप्सी ,आर्या किशोरजी आपण अश्या दडलेल्या कलाकृतींविषयी ही सहानुभूती दाखवतात हे ऐकून छान वाटल. पण एक विदारक वास्तव सांगायच म्हणजे "भारतीय पुरातत्व खात्याच किती दुर्लक्ष आहे हे प्रचि . 1,,4,6 व 7 पाहिल्यावर लक्षात येते . या मांदिरच्या दोनही बाजूस मूल कळसासारखे छोटे कळस होते पण ते आता पूर्णपणे ढासळले आहेत . मी स्वत: औरंगाबाद येथील पुरातत्व खात्यात तशी लेखी तक्रार व पडझड झालेल्या भागाचे फोटो दिले होतो हे 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 10 वेळा केले पण ,मंदिर पडल्यावर पुरातत्व खात्याला जग येईल आस वाटतय . आपण फक्त अजिंठा-वेरूळचा अभिमान बाळगतो. दक्षिण भारतात गेल्यास प्रत्येक 10 गावांनंतर एक स्थापत्य कलेचा नमूना अत्यंत सुंदर रित्या जपलेला आढळतो . मग आपण फक्त वेरूळ अजिंठ्यावरच का समाधानी राहावे .त्याला तोडीस तोड कलाकृती असताना यांकडे दुर्लक्ष केला जात आहे.तुमच्या माहितीसाठी हा फोटो टाकतोय ही त्या मंदिराची छोटी प्रतिकृती पूर्णपणे नाहीसी होण्याच्या मार्गावर आहे. कदाचित अजून काही वर्षांनी पुढच्या पिढ्यांना माणकेश्वर मंदिराची ही अवस्था पाहण्याची वेळ येइल . आणि ते केवळ या निर्लज्ज प्रशासनामुळे.
IMG_0340.jpg
भाऊ .खरच खुजरहोची आठवण होते पराव माझे मित्र हे मंदिर बघायला आले तेव्हा त्यांच्या तोंडातून हेच उद्गार आले.

>>>> पण एक विदारक वास्तव सांगायच म्हणजे "भारतीय पुरातत्व खात्याच किती दुर्लक्ष आहे हे प्र <<<<
"पुरातत्व खात्यावरच" केवळ जबाबदारी जात नाही तर "सरकार" नामक प्रकारावर अन त्यान्च्या "ध्येय धोरणान्वरही" जबाबदारी जातेच जाते! पुरातत्व खाते वगैरे या सरकारी व सराकारन्तर्गत सरकारबाह्य शक्तिन्च्या सूप्त व उघड धोरणान्च्या अंमलबजावणीची कठपुतळी असतात.
दुर्दैवाने याबाबतीत कोळसा उगाळावा तितके काळेच बाहेर पडणारे. तेव्हा इथेच पुरे.

धन्यवाद ज्ञानु .अंबरनाथ शैलीतील या नवीन कमी माहित असलेल्या मंदिराची ओळख सुरेख छायाचित्रांसह करून दिलीत . जतन करण्याबद्दल तुमचे प्रयत्न स्तुत्य आहेत .धुळे मालेगाव मार्गावर आहे ?चाळिसगाव स्टे.ला उतरून पितळखोरा आणि झोडगे करता येईल का ?

वेरूळ अजिंठ्यासाठी जो निधी मंजूर होतो.त्याच प्रमाणात या मंदिरांसाठी पण होतो ,पण पुरातत्व खात्यातील भ्रष्ट व पैसेखाऊ अधिकारी मंदिरांसाठी मंजूर झालेले पैसे लांपास करतात .मागच्या वेळी अजिंठ्यात गेलो तेव्हा पहिलं की 1000 कारागिरांची टिम अजिंठ्याच्या शिल्पांवर काम करत होते.आणि एकीकडे माणकेश्वर मंदिर ,गोंदेश्वर सिन्नर ,पाटणा देवी ,पितळ्खोरा लेणी ,यांकडे वर्ष वर्ष एकही अधिकारी फिरत नाही .आणि फिरलाच एखादा तर फक्त डेवलपमेंटच्या गप्पा मारतात."यहा गार्डन करेंगे ,पार्क करेंगे,शोप्स ओपेन करेंगे " आणि परत जातात. अरे काय गरज आहे याची.जे आहे ते जपायचा सोडून दिलं . आणि गार्डन करतायत .मंदिर पूर्ण ढासळल्या नंतर लोक काय गार्डन मध्ये फिरायला येतील. दोन चार मोज पट्ट्या घेऊन येतात आणि माप मोजतात आणि जातात . मात्र येणारा प्रत्येक अधिकारी हेच काम करतो.एकदा माणकेश्वर मंदिराचे शिवलिंग पार जमीन दोस्त झाले होते तेव्हा आंदोलन छेडून ती पिंड बाहेर काढली . म्हणजे मंदिराच्या ७५० वर्षाच्या इतिहासात एकमेव काम,मग अश्या खात्याचा उपयोग काय . शासन भरपूर पैसा देत कारण त्यांना अश्या देऊळ लेणी.वरसास्थळांमधून भरपूर कमाई आहे.पण पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांना मलाई कुठून मिळेल मग ते हे पैसे लटतात . आणि फक्त खातच नाही तर सामान्य नागरिकही जबाबदार असतात दोषी एक नाही सगळेच असतात . आपल्या गावातले ,मंदिर आहे त्यासाठी किती पैसा येतो , त्याच काय होत हे माहिती करून घेण आपली जबाबदारी असते . आणि आपण एवढंही नाही करू शकलो तर आपली त्या देवा विषयीची श्रद्धा भक्ति काही कामाची नाही अस मला वाटत.

srd हो दोनही ठिकाण चालीसगावहून जवळ आहे.चाळीसगावहून झोडग्याला यायचे असल्यास
चाळीसगावहून मालेगावला बसेस असतात .व नंतर मालेगावहुन धुळेकडे जाणार्‍या गाड्यानी झोडग्याला पोहोचता येते . NH3 वर आहे . त्यामुळे पोहोचायला सोपं आहे .

छान.

तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद वाटतो की मला आमच्या मंदिराचा खूप जुना फोटो मिळालाय . तो आपणा सोबत share करतांना प्रचंड आनंद वाटतोय . साभार माजी सरपंच दीपक लोटणराव देसले .
575421_129356887256257_186927552_n.jpg

तिथून जवळच लोंकरीसाठी ऑस्ट्रेलियन जातीच्या मेंढ्या पाळण्याचा रेमंड वूलचा एक मोठा प्रकल्प येऊं घातला होता; पुढे काय झालं त्याचं हेंही कुतूहल आहे
<<
भाऊ, तुम्ही ३०-३५ वर्षांपूर्वीचं बोलताहात काय?

येऊ घातला नाही, आला होता. तो प्रकल्प रेमंडचाच होता. लळिंगच्या किल्ल्या जवळ बनवला होता. धुळे येथे (जवळचे गोंदूर गांव. सध्या तिथे पायलट ट्रेनिंग चालते) या प्रकल्पासाठी विमानतळदेखिल कंपनीने बांधला होता. ऑस्ट्रेलियातून मरिनो जातीचे मेंढे ब्रीडींगसाठी आणले होते, त्यांच्यासाठी त्याकाळी एअरकंडीशन्ड खुराडी होती.

कालांतराने कंपनीच्या कुरणात आम्हाला आमची गुरे चारू द्या असे आंदोलन 'भूमीपुत्रांनी' केले अन रेमंडने तिथून गाशा गुंडाळला. बुडित धंदा कुणीच करीत नाही. काप गेले अन भोके राहिली, असे त्या प्रकल्पाचे झाले. आजकालच्या लोकांना ह्या इतिहासाची माहितीही नाही.

वर आर्याने म्हटले तसे झोडग्यावरून हज्जारदा पुण्याला गेली असेल, एकदाही २५ मिनिटे अंतरावरील झोडग्याला काय आहे, हे बहुतेकांना माहीत झालेले नसते. या फोटोतील देऊळ हायवे वरून दिसते हो..

पुण्यातून कुठूनही सिंहगड दिसतो, तसा धुळ्यातून लळिंगचा किल्ला दिसतो. तिथे काय आहे, हेही कुणालाच ठाऊक नसते. किल्ल्यावर जायची अधिकृत वाट आजकाल लळिंगमधे लोकांनाही ठाऊक नसते..

शेवटी कालाय तस्मैनमः

<< भाऊ, तुम्ही ३०-३५ वर्षांपूर्वीचं बोलताहात काय? >> जवळपास तितकींच वर्षं झालीं असावीत. म्हणूनच लळींगचा प्रकल्प झोडगेच्याच जवळ असावा असं वाटलं. रेमंडच्या प्रकल्पाबद्दलचं त्यावेळीं तीव्रतेने वाटलेलं कुतूहल आतां मंदिराच्या विषयामुळें शमलं. इब्लीसजी, मनःपूर्वक धन्यवाद.

इब्लिस भाऊ तुमच्या या रेमांड चर्चेमुळे मला . देखील या प्रकल्पविषयी प्रथम माहिती पडले. आता प्रकल्प नाहीये पण विमानतळ मात्र शिल्लक आहे. माझ्या आत्याचे घर तेथून जवळच आहे., आणि वरील फोटोविषयी अजून काही.
हा फोटो 18व्या शतकात मेजर रॉबर्ट गिल यांनी काढला असल्याची शक्यता आहे. कारण या फोटोत मागे दिसणारे ओसाड जंगल इथे सध्या माझे गाव आहे. आणि मागे दिसणारा डोंगर आता नजरेस पडत नये.तेथूनच NH3 जातो .

मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील काही उपेक्षित हेमाडपंथी मंदिरे माहिती असतील तर कळवा . ठिकाणासाहित .

१.माहितीबद्दल धन्यवाद ज्ञानु .जुना फोटो जपून ठेवल्या बद्दल आणि सरपंचांचे आभार . २.भारतातील मंदिर रचने संबंधि दोन पुस्तके नैशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केली आहेत : Temples Of North India , Krishna Deva ,80 pages ,30 photos ,1997 edition rs.40 .आणि दुसरे Temples Of South India ,K. R. Srinivasan ,pages 200,32photos ,edition1972 ,rs 55 .स्वस्त आणि मस्त पुस्तके .३. अंबरनाथचे शिवमंदिर मी १९६० सालापासून पाहातो आहे भिकाऱ्यांच्या आणि प्लास्टिक च्या विळख्यातच आहे .

ज्ञानु अतिशय सुंदर प्रचि आणि माहीती, तुमची कळकळ जाणवली.
जुणी प्राचिन मंदिर जपायची सोडुन त्याच्याबाजुला नवीन मंदिर उभारणारी बरीच गाव आहेत.
त्या प्राचिन शिल्पकलेची सुंदरता सिंमेटवरच्या नक्षीला कोठुन येणार. Sad

srd आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद अंबरनाथच्या मंदिराविषयी वाईट वाटतं , मग झोडग्याच मंदिर चांगलाय निदान मी म्हटल्या प्रमाणे तेथील परिसर रमणीय आणि ध्यानस्थ करनारा आहे. तरीही या मंदिराजवळ जि.प.ची शाळा आहे त्यामुळे मुलांकडून प्रचंड नुकसान होत . (माफी मागतो त्या शाळेत आम्हीही होतो , आणि आमच्याकडून सुद्धा कधीतरी झाल असेल पण आता कळायला लागलाय त्यामुळे ते जतन करण्याचा प्रयत्न करतो ) . . आपल्या सर्वांच्या माहितीत भर म्हणून एक गोष्ट सांगतो."मराठी विश्वकोशच्या 14व्या खंडातील पान क्र.69/70 वर यादव कालीन शिल्पशैलीची माहिती आहे . त्यात माणकेश्वर मंदिराचे प्रचि .व माहिती दिलेली आहे

Pages