प्रवेशिका - ५० ( nachikets - धुळीत ह्या पाऊल... )

Submitted by kaaryashaaLaa on 15 October, 2008 - 00:29

मित्रहो, कार्यशाळेत गझल प्रकाशित होण्याचा आज शेवटचा दिवस.
आजही तुम्ही नेहमीप्रमाणे गुणांकन करायचं आहेच.
भारतीय प्रमाणवेळेनुसार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत तुम्ही गुणांकन करू शकता.

धुळीत ह्या पाऊल जराही मळले नाही
असा चाललो! वाटेलाही कळले नाही

भेट न व्हावी - हे ना जमले कधी तुलाही
तू टाळावे हे मजलाही टळले नाही

पोटाला जे चटके बसले... कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही!

फिरवत बसलो जाते, पण मी काय मिळवले?
ना ओवीही सुचली... काही दळले नाही

काय वेगळे घडते जर भेटलोच नसतो?
ह्या प्रश्नाने सांग तुलाही छळले नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रहो, या गझलमधे काफिया हा 'कळले', 'मळले', 'दळले' इत्यादि शब्दांनी बनलेला आहे, हे तर आता तुम्हाला समजेलच.
पण आता प्रत्येक काफियाच्या आधीचा शब्द थोडा बारकाईने बघा. 'जराही', 'वाटेलाही', 'मजलाही'.. काही साम्य दिसतंय?
हे सगळे शब्द 'ही' ने संपतायत आणि 'आ' ही अलामत पाळतायत.
दुसर्‍या शब्दांत, ही गझल दोन काफिये वापरते.
अश्या गझलला 'जुल काफिया' गझल असं म्हणतात.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

फिरवत बसलो जाते, पण मी काय मिळवले?
ना ओवीही सुचली... काही दळले नाही

५ गुण

खल्लस....
पोटाला जे चटके बसले... कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही!

माझे ८
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

सगळेच शेर छान!!!

९ गुण...

फिरवत बसलो जाते, पण मी काय मिळवले?
ना ओवीही सुचली... काही दळले नाही

टाळ्या!!!! Happy

६ गुण

वाह !! जाम आवडली गझल, शानदार !!
सरपण, ओवी हे खूप आवडलेले शेर.

फिरवत बसलो जाते, पण मी काय मिळवले?
ना ओवीही सुचली... काही दळले नाही

मस्त आला आहे हा शेर. त्या आधीचा, 'पोटाला चटके' आणि शेवटचाही चांगले आहेत.
माझ्या मते ६ गुण.
-सतीश

छान लिहील्ये

७ गुण

शेवटचा शेर खास!
७ गुण
--------------------------------
आली दिवाळी! Happy

८ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

यमक जुळवण्यापलिकडचे काहितरी हवे.

सरपण आणि प्रश्न हे शेर फार फार आवडले!
चांगली गझल. माझे - ७.

पोटाला जे चटके बसले... कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही!

फिरवत बसलो जाते, पण मी काय मिळवले?
ना ओवीही सुचली... काही दळले नाही

हे दोन शेर आवडले.

माझे ७ गुण..

माझे ७

छान गझल
माझे ८

प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे आभार!!!

नचि, तुझ्या कल्पना भन्नाट असतात. जबरी आहे गझल.

ही माझी अत्यंत आवडती गझल आहे व मिलिंदमुळे पुन्हा लिंक मिळाली.

नचिकेत, प्लीज कीप राइटिंग!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!