भाजीभाकरी - फोटोसह

Submitted by दिनेश. on 11 February, 2013 - 03:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
२ / ३ भाकर्‍या होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
आळस. भाजी भाकरी वेगळी करायचा आणि डब्यात वेगळी आणायचा आळस !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश्दा खरच खूप मस्त....आज माझा मुलि साठि काय करु प्रश्नच पडला होता...हि भाकरिच करते......माझा मुलीला खमंग आवडते...आज नक्कि हेच बनेल घरि...धन्यवाद Happy

मस्तच दिनेशदा,
आमच्या घरी, ज्वारीच्या पिठात, थोडे बेसन, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन, तिखट(हे लाल मिरच्या, तीळ आणी मीठ एकत्र कुटुन बनवलेले असते),मीठ टाकुन भाकर्‍या बनवतात न्याहरीला. त्या नुसत्याच किंवा पोपडा(वरचा पापुद्रा) फाडुन त्यावर तिखट व शेंगदाणा तेल टाकुन जे काही लागते ते स्वर्गीयच म्हणावे लागेल. Happy

दिनेशदा,
कमाल आहे तुमची! या क्षेत्रातही नवनवीन प्रयोग!
इतरांना असेल पण मला माहित नव्हते कि खवय्येगिरीतही तुम्ही काही कमी नाहि! प्रचि पाहूनच तोंडाला पाणी सुटले!

सोप्या सुटसुटीत पाकक्रुती असतात दिनेशदा तुमच्या. लेक मेथीशिवाय दुसरी पालेभाजि खात नाही. हा प्रकार पराठा म्हणुन दिला तर ऩक्की आवडेल. शाळेच्या डब्यात द्यायलाही मस्त!

0.jpgमि केली ( पण मिनि भाकरि बोलता येइल) पालक,चवळि , सर्वांचे मिश्र पिठ,,....नाचणी पिठा मु ळे थोडे काळपट झाले... मुलाला शाळेच्या डब्यात दोन भाकरी मध्ये चीझ घालुन दिले...

01.jpg

दिनेश, भारीच आहे हे! न खाल्ल्या जाणार्‍या पालेभाजाही खाल्ल्या जातील अशाने. Happy

अमा, एकवचन जेंव्हा भाकर वापरले जाते तेंव्हा अनेकवचन भाकरी होते; एकवचन भाकरी असेल तेंव्हा अनेकवचन भाकर्‍या होते. || इति चिनूक्स ||

पालक अशा प्रकारे खाल्ला तर कदाचीत पोटात जाईल...
फोटो मस्त आहे... भाकरीवरती तीळ पेरायची आयडीया मस्त आहे....
हे थोडं उकड काढलेल्या भाकरीसारखं का? पण उकडीत पाणी जास्त असतं मला वाटतं इथे भाजीतल्या पाण्याने ते पीठ भिजेल नं?

कालच्या उरलेल्या अंबाडीच्या भाजीवर हा प्रयोग केला. ओल्या हळदीचे लोणचे, लसणाची चटणी आणि सोबत ही गरम गरम भाकरी वर तुपाची धार! मजा आली.

दिनेश, असे रंग उतरले की रंग बघून अजूनच आपण त्या पदार्थाच्या प्रेमात पडतो.

मला ही भाकरी थोडी कोरडी वाटते आहे पण कदाचित तितकी कोरडी नसावी.

Pages