कशी आहेस तू

Submitted by -शाम on 10 February, 2013 - 07:33

Untitled-1.jpg . . . . . . . . . . . .
मूळ प्र.चि नेटवरून साभार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुनही कैफ ना सरला अजुनही धुंद ती आहे
सहज मी पाहिले होते कशी सजतेस तू राणी

कशाला पाहिजे कुठल्या वसंताची अता मर्जी
तुला पाहून बहरावे असे हसतेस तू राणी
व्वा.........झक्कासच !!

कशाला पाहिजे कुठल्या वसंताची अता मर्जी
तुला पाहून बहरावे असे हसतेस तू राणी

न आले आजही काही मला घेता तुझ्यासाठी
मिठी निर्व्याज ही माझी हवे तर नेस तू राणी<< वा वा

ही ओळही मस्तच

>>>नकोसा जीव होई पण हवी असतेस तू राणी<<<

तुला पाहून बहरावे असे हसतेस तू राणी

मिठी निर्व्याज ही माझी हवे तर नेस तू राणी

अप्रतिम ओळी. कविता आवडली.

<<कशाला पाहिजे कुठल्या वसंताची अता मर्जी
तुला पाहून बहरावे असे हसतेस तू राणी>>>

क्या बात है...
शॉल्लेट Happy

व्वा व्वा!!!

न आले आजही काही मला घेता तुझ्यासाठी
मिठी निर्व्याज ही माझी हवे तर नेस तू राणी

नकोसा जीव होई पण हवी असतेस तू राणी

लाघवी आर्जवांनी नटलेल प्रेम गीत बेहद्द आवडलं.

-सुप्रिया.

छान.... मस्तच.
"कशाला पाहिजे कुठल्या वसंताची अता मर्जी
तुला पाहून बहरावे असे हसतेस तू राणी" >>>> ही द्वीपदीअधिक आवडली.

खरे तर कवितेला चित्राच्या कुबडीची गरज नसावी परंतू आजच्या गुलाबी दिवसासाठी ही कविता होती म्हणून जरा गुलाबी प्रेझेंटेशन!!! Happy

कौतुक करणार्‍या दोस्तांचे मनःपुर्वक आभार!

ही तर गझल आहे ना ??>>>> कसं काय ब्वॉ, यात नक्की शब्द कुठेय? Wink

धन्यवाद!

यात नक्की शब्द कुठेय?>>>>>नाही समजलो !! Sad

गुलाबी रंग कमी .....केशरी जास्त झालाय चित्रात Wink

किती ओघवती....आवडली मनापासून...कुणाची तरी याद आली 'राणी' सम्बोधनाने.... Wink

अरेच्चा, इतकी सुरेख कविता कशी काय मिसली होती मी !!!

अतिशय सुरेख, शामराव....

हे काव्यलेखन वरती काढल्याबद्दल भाग्यश्री परांजपे यांना धन्स .... Happy