स्प्लेंडिड क्वांग चौ -भाग ४

Submitted by वर्षू. on 9 February, 2013 - 23:35

http://www.maayboli.com/node/40890 - भाग १

http://www.maayboli.com/node/40893 -भाग २

http://www.maayboli.com/node/40896 - भाग ३

http://www.maayboli.com/node/40953-भाग ४

http://www.maayboli.com/node/41012 - भाग ५ (अंतिम)

चायनीज नववर्षाचे स्वागत करण्याकरता चीन च्या प्रत्येक शहरातील विविध मोकळ्या पटांगणांवर,स्टेडियम च्या विशाल ग्राऊंड्स वर ,' फ्लॉवर मार्केट्स' लागतात. नवीन वर्षापूर्वी तीन दिवस हा बाजार भरतो. जवळजवळ ५०० वर्षांपूर्वी पडलेली ही प्रथा ,आजतागायत चीनी माणूस प्रकर्षाने पाळत आला आहे. या तीन दिवसांत येथील लोकं, सहकुटुंब,सहपरिवारासोबत , मित्रमंडळीसोबत प्रचंड मोठ्या संख्येने या बाजाराला भेट देतात. व्हीलचेअरवर बसलेली वृद्ध मंडळींपासून , प्रॅममधली बाळंही इतक्या गर्दीत न त्रासता मजेने इकडेतिकडे फिरतात. प्रत्येक जण त्याच्या खिशाला परवडेलशी फुलं, फुलझाडं विकत घेत असतात. ताजी फुलं घरात आणली तर वर्षभर घरात आनंद,सुखसमाधान नांदते ही त्यामागची भावना असते.
दोन दिवसांपूर्वी मी ही या बाजारात चक्कर मारली आणी इथे उतू चाललेल्या अमाप उत्साहाच्या लाटेत संपूर्णपणे डुंबून घेतलं..

प्रवेश आणी निकास , सेपरेट केल्यामुळे एकाच दिशेने व्यवस्थित जाता येत होतं. समोरून येणार्‍यांशी टकरा होत नव्हत्या. तुफान गर्दी असली तरी शिस्त पाळली जात होती.याशिवाय कुणीही गर्दीतून चालताना खातपीत नसल्याने स्वच्छताही होतीच..
प्रवेश करण्यापूर्वी..

हे तीन पुतळे , ,'फू' , 'लू' आणी ,'शोउ' या तीन स्टार गॉड्स चे आहेत. पवित्र ज्युपिटर प्लॅनेट चा प्रतिक असलेला हा फू स्टारगॉड , गुड लक चा ही प्रतिक मानला जातो. हा नेहमी प्राचीन गुरुच्या वेषात असतो. त्याच्या एका हातात पोथी तर दुसर्‍या हातात लहान बाळाच्या रुपात नववर्ष दाखवलेले असते. मधला पुतळा ,' लू स्टार गॉड चा आहे. प्राचीन ब्यूरोक्रॅट च्या वेषातल्या या स्टार गॉड ची आराधना केल्यास , आपली उत्तरोत्तर पदोन्नती होते असा इथे विश्वास आहे. तिसरा 'शोउ स्टार' . याच्या हातात प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याची दोरी असते असे मानले जाते. एका दन्तकथेनुसार शोउ , आईच्या गर्भात दहा वर्षं राहिला आणी शेवटी त्याने जन्म घेतला तेंव्हा तोच मुळी वृद्धावस्थेत होता. त्याचे भव्य कपाळ आणी हातातले पीच फ्रूट , दीर्घायुषाचे प्रतीक ठरले. याचा चेहरा हसरा आणी प्रेमळ असतो. केंव्हा केंव्हा याच्या हातात जीवनामृताने भरलेली लांब दुधी दाखवतात.

चला आता आत शिरा..पाहा बरं धक्कामुक्की करायची नाही... Wink

ईअर ऑफ स्नेक जवळ एक फोटो हवाच

गर्दीची फिकिर नको

हे पिचर प्लांट. हे ही विषारीच असतं. पण चीनी समजुतीप्रमाणे घरी हे प्लांट ठेवल्यास हे प्लांट, गुड लक आणी वैभव आपल्याकडे आकर्षित करून घेऊन या पिचर मधे साठवून ठेवतात.

ही पिवळी फळं आहेत ,' solanum mammosum' च्या झाडाची. बटाटे, टोमॅटो फॅमिलीतले हे झाड आहे. या झाडाचा प्रत्येक भाग विषारी असला तरी चायनीज नववर्षात हे झाड घरी आणणे शुभ समजले जाते. या फळाला पाच टोकं असतात ज्यांना चायनीज लोकं पाच बोटं म्हणतात. जशी एका हाताची पाच बोटे वेगवेगळी असून एकत्र असतात ,तशी पाच पिढ्या घरात एकत्र ,सुखासमाधानाने नांदाव्यात हा संदेश हे झाड देत असते.

विविध प्रकारची पिन व्हील्स्,खेळणी,आर्टिफिशल फुलं,टोप्या विकणारे ही भरपूर स्टॉल्स होतेच..

गुलाब गुलाब..

फुलझाडं परवडत नसल्यास फ्रेश फुलांचे गुच्छ तरी घ्याच..

यावेळी ऑर्किड्स ची खूपच चलती होती

हे दोन आर्टिस्ट्स, संगमरवरी स्लॅबवर ,बाजूला स्टोववर साखर वितळवून त्या कॅरेमल ने पक्षी,साप इ. पटापट काढत होते..

कॅरेमल चा ड्रॅगन तय्यार..

एकत्र परिवारात सुखसमाधान नांदण्याकरता लहान ऑरेंज ट्री ही घरात हवीच..

क्रमशः

Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनी संस्कृतीचे वर्णन,सगळ्या प्रचि उत्तमोत्तम आहेत.वर्षू ,तू तर घरबसल्या चीन ची सफर घडवुन आणलीस.चीन्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य आणि विविध फुलांच्या रंगाची उधळण उत्तम टिपली आहेस.खूप्पच छान.

चारही भागांचा मिळून इथेच एक प्रतिसाद देतो ग्ग.... कारण या भागातील फोटो सर्वात जास्त आवडले... प्रेमातच पडलो मी या चायनीज रंगांच्या.. Happy

अवांतर - आता १३ संपत आला.. मात्र पुढच्या १४ फेबच्या आधी फुलांची ऑर्डर इथूनच.. Happy

Pages