स्प्लेंडिड क्वांग चौ -भाग ४

Submitted by वर्षू. on 9 February, 2013 - 23:35

http://www.maayboli.com/node/40890 - भाग १

http://www.maayboli.com/node/40893 -भाग २

http://www.maayboli.com/node/40896 - भाग ३

http://www.maayboli.com/node/40953-भाग ४

http://www.maayboli.com/node/41012 - भाग ५ (अंतिम)

चायनीज नववर्षाचे स्वागत करण्याकरता चीन च्या प्रत्येक शहरातील विविध मोकळ्या पटांगणांवर,स्टेडियम च्या विशाल ग्राऊंड्स वर ,' फ्लॉवर मार्केट्स' लागतात. नवीन वर्षापूर्वी तीन दिवस हा बाजार भरतो. जवळजवळ ५०० वर्षांपूर्वी पडलेली ही प्रथा ,आजतागायत चीनी माणूस प्रकर्षाने पाळत आला आहे. या तीन दिवसांत येथील लोकं, सहकुटुंब,सहपरिवारासोबत , मित्रमंडळीसोबत प्रचंड मोठ्या संख्येने या बाजाराला भेट देतात. व्हीलचेअरवर बसलेली वृद्ध मंडळींपासून , प्रॅममधली बाळंही इतक्या गर्दीत न त्रासता मजेने इकडेतिकडे फिरतात. प्रत्येक जण त्याच्या खिशाला परवडेलशी फुलं, फुलझाडं विकत घेत असतात. ताजी फुलं घरात आणली तर वर्षभर घरात आनंद,सुखसमाधान नांदते ही त्यामागची भावना असते.
दोन दिवसांपूर्वी मी ही या बाजारात चक्कर मारली आणी इथे उतू चाललेल्या अमाप उत्साहाच्या लाटेत संपूर्णपणे डुंबून घेतलं..

प्रवेश आणी निकास , सेपरेट केल्यामुळे एकाच दिशेने व्यवस्थित जाता येत होतं. समोरून येणार्‍यांशी टकरा होत नव्हत्या. तुफान गर्दी असली तरी शिस्त पाळली जात होती.याशिवाय कुणीही गर्दीतून चालताना खातपीत नसल्याने स्वच्छताही होतीच..
प्रवेश करण्यापूर्वी..

हे तीन पुतळे , ,'फू' , 'लू' आणी ,'शोउ' या तीन स्टार गॉड्स चे आहेत. पवित्र ज्युपिटर प्लॅनेट चा प्रतिक असलेला हा फू स्टारगॉड , गुड लक चा ही प्रतिक मानला जातो. हा नेहमी प्राचीन गुरुच्या वेषात असतो. त्याच्या एका हातात पोथी तर दुसर्‍या हातात लहान बाळाच्या रुपात नववर्ष दाखवलेले असते. मधला पुतळा ,' लू स्टार गॉड चा आहे. प्राचीन ब्यूरोक्रॅट च्या वेषातल्या या स्टार गॉड ची आराधना केल्यास , आपली उत्तरोत्तर पदोन्नती होते असा इथे विश्वास आहे. तिसरा 'शोउ स्टार' . याच्या हातात प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याची दोरी असते असे मानले जाते. एका दन्तकथेनुसार शोउ , आईच्या गर्भात दहा वर्षं राहिला आणी शेवटी त्याने जन्म घेतला तेंव्हा तोच मुळी वृद्धावस्थेत होता. त्याचे भव्य कपाळ आणी हातातले पीच फ्रूट , दीर्घायुषाचे प्रतीक ठरले. याचा चेहरा हसरा आणी प्रेमळ असतो. केंव्हा केंव्हा याच्या हातात जीवनामृताने भरलेली लांब दुधी दाखवतात.

चला आता आत शिरा..पाहा बरं धक्कामुक्की करायची नाही... Wink

ईअर ऑफ स्नेक जवळ एक फोटो हवाच

गर्दीची फिकिर नको

हे पिचर प्लांट. हे ही विषारीच असतं. पण चीनी समजुतीप्रमाणे घरी हे प्लांट ठेवल्यास हे प्लांट, गुड लक आणी वैभव आपल्याकडे आकर्षित करून घेऊन या पिचर मधे साठवून ठेवतात.

ही पिवळी फळं आहेत ,' solanum mammosum' च्या झाडाची. बटाटे, टोमॅटो फॅमिलीतले हे झाड आहे. या झाडाचा प्रत्येक भाग विषारी असला तरी चायनीज नववर्षात हे झाड घरी आणणे शुभ समजले जाते. या फळाला पाच टोकं असतात ज्यांना चायनीज लोकं पाच बोटं म्हणतात. जशी एका हाताची पाच बोटे वेगवेगळी असून एकत्र असतात ,तशी पाच पिढ्या घरात एकत्र ,सुखासमाधानाने नांदाव्यात हा संदेश हे झाड देत असते.

विविध प्रकारची पिन व्हील्स्,खेळणी,आर्टिफिशल फुलं,टोप्या विकणारे ही भरपूर स्टॉल्स होतेच..

गुलाब गुलाब..

फुलझाडं परवडत नसल्यास फ्रेश फुलांचे गुच्छ तरी घ्याच..

यावेळी ऑर्किड्स ची खूपच चलती होती

हे दोन आर्टिस्ट्स, संगमरवरी स्लॅबवर ,बाजूला स्टोववर साखर वितळवून त्या कॅरेमल ने पक्षी,साप इ. पटापट काढत होते..

कॅरेमल चा ड्रॅगन तय्यार..

एकत्र परिवारात सुखसमाधान नांदण्याकरता लहान ऑरेंज ट्री ही घरात हवीच..

क्रमशः

Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तुम्हा सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल थांकु..

जिप्सी द इन्स्पिरेशनल गुर्जी.. एस्पेशल धन्स.. Happy

चला करूया स्वागत रंगीत फुले घेऊनी
अननसाचे कळे तिरंगी, सवे उगवुनी
करून ड्रॅगन कॅरामलाचा तया खाऊनी
ऑर्किडांची फुले जिवंत चौकटीत धरुनी

चिनी वर्षूच्या
नववर्षाचे
सहर्ष स्वागत !

वर्षेदी, प्रचि सह्हीच आहेत. उत्साह अगदी इथपर्यंत जाणवतोय.

मुळात नववर्षाची सुरवात घरात फुलं, झाडं आणून करण्याची कल्पनाच किती सुंदर आहे. आणि फुलं, झाडं तरी किती प्रकारची आहेत!

काही प्रश्न :

१. दुसर्‍या प्रचिमधले लहान मुलाला हातात घेतलेले गृहस्थ कोण आहेत?
२. ती पिवळी, काहीशी लिंबासारखी आणि बरीचशी क्षेपणास्त्रासारखी दिसणारी फळं कोणती? त्यांचा उपयोग काय?
३. कॅरॅमलच्या ड्रॅगनचं काय करतात?
४. तू कोणती कोणती फुलं / झाडं घेतलीस?

या चिनी मंडळींचे फुले-झाडे प्रेम वाखाणण्याजोगे आहे - कॅक्टसची फुले काय मस्त दिस्तातेत ...
मनापासून धन्स वर्षू - हे सर्व इथे शेअर केल्याबद्दल....

सगळे भाग सही आहेत !
ते पहिल्या दुसर्‍या भागात लॅंटर्न्स आहेत का ? संध्याकाळी गेलात तर अजून छान वाटेल ना ?

वर्षू नील यांची ही 'चीनी नूतन वर्षाची भेट' खूपच भावली. चारही भागातील प्रचिंनी इतके प्रसन्न करून टाकले की, काहीतरी चमत्कार व्हावा आणि आपल्याला दोनचार दिवसांसाठी का होईना चायनिज व्हिसा मिळावा म्हणजे या प्रचित्रांची जादू प्रत्यक्ष जागेवर जाऊन भरल्या नजरेने पाहता यावी.

फुलांचे ताटवे पाहताना तर बालकवींचीच आठवण येत राहिली.... काय सुंदर कविता रचली असती त्यानी या दृष्यांवर !!

यू आर सो लकी, वर्षू नील.

अशोक पाटील

सर्वांचे प्रतिसाद खूप आवडले.. त्रिवार धन्स!!

मामी , तेरी चौकस बुद्धी को मान गई... __/\__
तुझ्या प्रश्नांची उत्तरे ..

१) हे तीन पुतळे , ,'फू' , 'लू' आणी ,'शोउ' या तीन स्टार गॉड्स चे आहेत. पवित्र ज्युपिटर प्लॅनेट चा प्रतिक असलेला हा फू स्टारगॉड , गुड लक चा ही प्रतिक मानला जातो. हा नेहमी प्राचीन गुरुच्या वेषात असतो. त्याच्या एका हातात पोथी तर दुसर्‍या हातात लहान बाळाच्या रुपात नववर्ष दाखवलेले असते. मधला पुतळा ,' लू स्टार गॉड चा आहे. प्राचीन ब्यूरोक्रॅट च्या वेषातल्या या स्टार गॉड ची आराधना केल्यास , आपली उत्तरोत्तर पदोन्नती होते असा इथे विश्वास आहे. तिसरा 'शोउ स्टार' . याच्या हातात प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याची दोरी असते असे मानले जाते. एका दन्तकथेनुसार शोउ , आईच्या गर्भात दहा वर्षं राहिला आणी शेवटी त्याने जन्म घेतला तेंव्हा तोच मुळी वृद्धावस्थेत होता. त्याचे भव्य कपाळ आणी हातातले पीच फ्रूट , दीर्घायुषाचे प्रतीक ठरले. याचा चेहरा हसरा आणी प्रेमळ असतो. केंव्हा केंव्हा याच्या हातात जीवनामृताने भरलेली लांब दुधी दाखवतात.

२) ही पिवळी फळं आहेत ,' solanum mammosum' च्या झाडाची. बटाटे, टोमॅटो फॅमिलीतले हे झाड आहे. या झाडाचा प्रत्येक भाग विषारी असला तरी चायनीज नववर्षात हे झाड घरी आणणे शुभ समजले जाते. या फळाला पाच टोकं असतात ज्यांना चायनीज लोकं पाच बोटं म्हणतात. जशी एका हाताची पाच बोटे वेगवेगळी असून एकत्र असतात ,तशी पाच पिढ्या घरात एकत्र ,सुखासमाधानाने नांदाव्यात हा संदेश हे झाड देत असते.

३) हाहा... मी या वर्षी एक ही झाड घेतलं नाही.. कारण ड्रायवर सुट्टीवर असल्याने अवजड कुंड्या टॅक्सीत घालून आणणं अशक्यप्राय गोष्ट.. एकतर गर्दीमुळे एकेक टॅक्सी पकडायला चार जणं धावणं आलंच Wink
जस्ट फुलं घेतली आणी एक छोटुसा सॉफ्ट टॉय साप.. Happy

ओ हा परश्न राहिलाच.. कॅरेमल चा ड्रॅगन किंवा इतर पशुपक्ष्यांचं काय करतात??
अगा सोप्पये.. खाऊन टाकतात थोड्या वेळाने.. Lol

चारही भागांतले फोटो सुंदर आहेत. किती नवं बघायला मिळालं.

खेळण्यातले स्टफ्ड साप क्यूट आहेत! (साप आणि क्यूट एकाच वाक्यात वापरेन असं कधी वाटलं नव्हतं.) Happy

भारीच, मस्त आहेत फोटो.
युरोप अमेरीकेत जाणारे बरेच आहेत त्यामुळे तिकडचे फोटो दिसतात पण चिनला जाणारे क्वचितच. तुमच्यामुळे हेही पहायला मिळताहेत.

सुधीर

Pages