नक्की

Submitted by योगितापाटील on 9 February, 2013 - 02:14

नशिबा तुझ्यापुढे मी ना वाकणार नक्की
दे वार तू कितीही मी झेलणार नक्की

लढण्यात आपुल्या ज्या हरलेच कैकवेळा
पचवून शल्य सारे मी जिंकणार नक्की

वाटेवरी तमाच्या मी चंद्र पेरलेला
स्वप्ने उद्या सुखाची पण उमलणार नक्की

आयुष्य वाळवंटी मृगजळ खुणावणारे
हुलकावणी तुझी ही पण संपणार नक्की

मम सागरात आता वादळ उधाणलेले
नौका तरी किनारी पोहोचणार नक्की

ग्रीष्मातल्या उन्हाने भेगाळली भुईही
आशा वळीव होऊनी बघ बरसणार नक्की

-योगिता पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

thanks vaibhav

आशा वळीव होऊनी बघ बरसणार नक्की<<< होऊनी ऐवजी बनुनी असे घेतल्यास छान व शुद्ध होईल.

वाटेवरी तमाच्या मी चंद्र पेरलेला<<<

ही ओळ आणि

आयुष्य वाळवंटी मृगजळ खुणावणारे
हुलकावणी तुझी ही पण संपणार नक्की<<<

हा शेर आवडला. शुभेच्छा!

sarvanche khup khup aabhar ,Befikir sir aapan asech margdarshan karat rahave hich apeksha Happy