Submitted by योगितापाटील on 9 February, 2013 - 02:14
नशिबा तुझ्यापुढे मी ना वाकणार नक्की
दे वार तू कितीही मी झेलणार नक्की
लढण्यात आपुल्या ज्या हरलेच कैकवेळा
पचवून शल्य सारे मी जिंकणार नक्की
वाटेवरी तमाच्या मी चंद्र पेरलेला
स्वप्ने उद्या सुखाची पण उमलणार नक्की
आयुष्य वाळवंटी मृगजळ खुणावणारे
हुलकावणी तुझी ही पण संपणार नक्की
मम सागरात आता वादळ उधाणलेले
नौका तरी किनारी पोहोचणार नक्की
ग्रीष्मातल्या उन्हाने भेगाळली भुईही
आशा वळीव होऊनी बघ बरसणार नक्की
-योगिता पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होऊनी बघ>>>> होउन /होवुन
होऊनी बघ>>>> होउन /होवुन बघ............ असे केल्यास वृत्तात बसेल
बाकी एकंदर गझल छान
thanks vaibhav
thanks vaibhav
हं... आयुष्य वाळवंटी मृगजळ
हं...
आयुष्य वाळवंटी मृगजळ खुणावणारे
हुलकावणी तुझी ही पण संपणार नक्की
हा छान वाटला...
आशा वळीव होऊनी बघ बरसणार
आशा वळीव होऊनी बघ बरसणार नक्की<<< होऊनी ऐवजी बनुनी असे घेतल्यास छान व शुद्ध होईल.
वाटेवरी तमाच्या मी चंद्र पेरलेला<<<
ही ओळ आणि
आयुष्य वाळवंटी मृगजळ खुणावणारे
हुलकावणी तुझी ही पण संपणार नक्की<<<
हा शेर आवडला. शुभेच्छा!
नशिबा तुझ्यापुढे मी ना वाकणार
नशिबा तुझ्यापुढे मी ना वाकणार नक्की
दे वार तू कितीही मी झेलणार नक्की
छान. पुलेशू.
ग्रीष्मातल्या उन्हाने भेगाळली
ग्रीष्मातल्या उन्हाने भेगाळली भुईही
आशा वळीव होऊनी बघ बरसणार नक्की
आशय आवडला.
sarvanche khup khup aabhar
sarvanche khup khup aabhar ,Befikir sir aapan asech margdarshan karat rahave hich apeksha
'आयुष्य' आणि 'वळीव' यातले
'आयुष्य' आणि 'वळीव' यातले खयाल छान आहेत.