४ ते ५ लोकांसाठि
खालि दिलेल्या प्रमाणानुसार साधारण २५ भजि बनतील
मैदा - १ वाटि
दहि - १ वाटि (आंबट असेल तर उत्तामच)
रवा - मैद्याचा १/५ भाग इतका
साखर - ४ टि स्पून
मीठ - चविनुसार
बकिंग सोडा - १/२ चमचा (दहि किति आंबट आहे,त्या प्रमाणे सोड्याचे प्रमाण थोडे बदलले तर चालेल)
जिरे - १ टि स्पून
ओले खोबरे (बारिक काप किव्वा खोवलेले) - १/४ वाटि
बारिक चिरलेलि हिरवि मिरचि (हवि असेल तर)
कृती :
१. जिरे,मीठ्,साखर्,सोडा,खोबरे,हिरवि मिरचि (हवि असल्यास्),रवा हे सगळे जिन्नस मैद्यात व्यवस्थित मिसळून घ्यावे
२. गरजे प्रमाणे त्यात दहि मिसळून घ्यावे. ह्याचे बॅटर न बनवता सैलसर डोह(dough) बनवुन घ्या ( ३ रा फोटो पाहिल्यावर अंदाज येइल कि पीठ कसे बनले पाहिजे)
३.हे पीठ १ ते २ तास आंबवुन घ्यावे
४.नंतर खालिल फोटोत दाखवले आहे तेवढ्या आकाराचे गोळे बनवुन ते मध्यम आचेवर तळून घ्यावेत
५.खोबर्याचा चटणि सोबत सर्व्ह करावे
टिप :१. fermentation मुळे भजि स्पोंजी अणि थोडे मोठे बनतात व गोलसर आकर हि येतो...त्या मुळे जास्त मोठे गोळे तेलात सोडु नका
२.हा पदार्थ चवीस थोडा गोड असतो म्हणुन साखर थोडि जास्त वापरलि आहे
म्हैसूर भजि
Submitted by गोपिका on 8 February, 2013 - 19:15
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त दिसताहेत.. मैद्याऐवजी
मस्त दिसताहेत.. मैद्याऐवजी इतर काही वापरता येईल का?
वेगळ्याच प्रकारची भजी आहे.
वेगळ्याच प्रकारची भजी आहे.
बहुतेक नाहिच...मैदाच वापरतात
बहुतेक नाहिच...मैदाच वापरतात ह्या साठि
पण आता तुझि आइडिया ट्राय करते.....कहि हेल्दी मोडिफिकेशन जमत का ते बघते
वेगळ्याच प्रकारची भजी
वेगळ्याच प्रकारची भजी आहे.>>>++११
ट्राय केली पाहिजे..
जबरदस्त लागतात. मी ह्यात
जबरदस्त लागतात. मी ह्यात जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, आले घालते. ते रवा मैदा आंबट दही च काँबो हवे. तळायचे नसेल तर सरसरीत करून मस्त दोसे होतात. अमुल बटर बरोबर मस्त लागतात.
उपम्याची मूद आणि हे भजी मस्त वाट्तात ब्रेकफासट साठी.
मस्त लागतात ही भजी. हे नाव
मस्त लागतात ही भजी. हे नाव माहीत नव्हतं पण. लहानपणी एकांकडे खाल्ली होती, तिथून रेसिपी कळली. मात्र ती गोड नव्हती आणि मला असं वाटतं की त्यात रवाही नव्हता, फक्त मैदा. आतून शिजलेल्या साबुदाण्यासारखे टेक्श्चर येते का ह्याला ?
फोटो मस्त
छानच प्रकार आणि फोटो. अगदी
छानच प्रकार आणि फोटो.
)
अगदी क्वचितच हॉटेलमधे बघितलाय. एकदाच खाल्ला होता.
अश्विनीच्या पद्धतीने डोसे पण चांगलेच लागतील. ( तेच करेन
बंगळुरात मैसुर बज्जी, मैसुर
बंगळुरात मैसुर बज्जी, मैसुर बोंडा नावाने मिळतात ही भजी. छान लागतात. त्यात मैदा वापरतात हे माहीत नव्हते.
अगो, आतून स्पाँजी होते.
अगो, आतून स्पाँजी होते. काहीही फर्मेंटेशन एजंट जसे सोडा वगैरे न वापरता त्या दह्याच्या आंबट पणाने आतून फुलते. साबुदाणासारखे नव्हे.
मैसूर बज्जी हे चार ते सात दरम्यानी दक्षिणेत टिफिन म्हणून मिळते. आम्ही नेहमी लंच च्यावेळेस मागवायचो तर अॅबिडस ताजमहाल वाला स्पेशल एक घाणा बनवून द्यायचा.
मैसुर बज्जी आणि कडक वाफाळती
मैसुर बज्जी आणि कडक वाफाळती कॉफी स्टीलच्या वाटी-पेल्यातून मिळणारी!
ओके अमा
ओके अमा
मैद्याऐवजी इतर काही वापरता
मैद्याऐवजी इतर काही वापरता येईल का?>> वस्त्रगाळ केलेले गव्हाचे पिठ वापरून पहायला हवे.
फोटो आणि मैसूर बज्जी दोन्ही भारीच!
अश्विनि मामि,ह्याचा डोसा होउ
अश्विनि मामि,ह्याचा डोसा होउ शकतो हे माहित नव्हते...पीठ उरल आहे त्याचे डोसेच करुन बघते


दिनेशदा ,अगो अणि नलिनी - फोटो चा प्रशंसे साठि धन्यवाद
मैद्याऐवजी इतर काही वापरता येईल का?>> मुगाचे पीठ वापरुन पहायला हि हरकत नाहि
सर्व जणाना प्रतिसादबद्दल खुप खुप धन्यवाद....असे प्रतिसाद मिळाले कि हुरुप आणखि वाढतो
मस्त दिसतायत भजी... करूनच
मस्त दिसतायत भजी...
करूनच बघते आता...
ओह्ह्ह... मैसुर बोंडा
ओह्ह्ह... मैसुर बोंडा का?
ऑफिसमधे मिळते ही डिश. पण फार ऑईली असते. अगदी पिळून तेल निघते.
एव्हढे ऑईली होत्तात का ही भजी?
Saakshi धन्य॑वाद एव्हढे ऑईली
Saakshi धन्य॑वाद
एव्हढे ऑईली होत्तात का ही भजी? >>>>>
ऑफिस फूड कोर्ट मध्ये मिळत ते खरच होर्रिबल असत...मला हि ह्याचा अनुभव आहे....अणि शक्यतो सगळ्या कंपनिज चे केटरर्स एकच...मग काय प्रश्नच नाहि
पण घरच ते घरच....एवढ हि तेल नाहि राहात त्यात
करण सोडा खुप कमि किवा नाहिच वापरला जात (जर दहि जास्त आंबट असेल तर)
मला अस नाहि वाटत कि जे ऑफिस मध्ये पीठ वापरल जातं ते चांगल्या दह्यात किंवा ताकात भिजवतात....पाण्यात भिजवायच अणी भरभरुन सोडा घालायचा....मग काय त्या भज्यांना तेलाचा अभिषेकच