घोकंपट्टी

Submitted by सोनू. on 8 February, 2013 - 18:24

' समजून घ्या, नुसती घोकंपट्टी नको ' ... कित्तीवेळा ऐकले असेल हे वाक्य! पण कितीही समजुन घेतले तरीही परीक्षेत आठवण्यासाठी पाठांतर करावेच लागायचे मला.
आम्लात निळा लिटमस तांबडा होतो. आम्लाचे गुणधर्म समजले, लिटमसचे समजले, पण निळा की काळा, तांबडा की पिवळा हे लक्षात ठेवण्यासाठी किती pH चा कोणता रंग, त्यांचे मूलद्रव्य कोणते व कोणती रासायनीक प्रक्रिया होते हे सगळे लहान मुलांना समजून देणार का? त्यापेक्षा ' कोयल सी तेरी बोली कुकूकुकू कुकू कुकूकुकू ' या गाण्याच्या चालीवर 'आम्लात निळा लिटमस, तांबडा होतो तांबडा तांबडा होतो' हे परीक्षेत हमखास आठवेल असे का लक्षात ठेवू नये? काही गोष्टी आपोआप लक्षात राहतात, कसे ते नाही माहीत, जसे लिटमस तांबडा व निळा आहे (जांभळा नकोय) आणि आम्लं व अल्कं त्यांच्यावर प्रक्रिया करतात. पण जोड्या कशा लावणार?
तर अशा बर्याच क्लृपत्या असतील तुम्ही ' समजून घेऊन देखिल आयत्यावेळी परीक्षेत गोची होऊ नये ' ( Wink ) म्हणून पाठ केलेल्या, त्यांची उजळणी करायची ही जागा. बरेचदा असेही होते की काहीतरी असंबद्ध गोष्टं आठवते पण ते कशासाठी लक्षात ठेवले़य ते आठवत नाही किंवा त्यांचे पूर्ण वाक्य आठवत नाही. कदाचित इथल्या कोणीही तसेच लक्षात ठेवले असेल आणि काही गमती आठवतील..
घोकंपट्टी चांगली व आपल्या घरच्या लहानांना अशी पद्धत शिकवा असे सांगत नाहीय. मजा म्हणून आठवून पाहूया हा साधा, सोपा आणि सरळ मुद्दा आहे, तरी कोणी ' आजकालची शिक्षणपद्धती ' वगैरे डोस देवू नयेत ही विनंती.

तर चला लिहूया घोकंपट्टी Happy

पहिल्या महायुद्धाची कारणे - यूआशरामबाता
यूरोपीय राष्ट्रांचा साम्राज्यवाद
क्रमक राष्ट्रवाद
स्त्रास्त्र स्पर्धा
राजनैतिक वैमनस्य
हत्वाकांक्षी कैसर विल्यम दुसरा
बाल्कनचा प्रश्न
तात्कालिक कारण (आॅस्ट्रीयन राजकुमाराची सर्बियामध्ये हत्या)

बघा, आजही २० वर्षांनंतर नीट सांगता येतेय. ही आहे माझी घोकंपट्टी !!! Lol

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री, त्याआधीचे गोल्ड नी सिल्वर आयत्या वेळी नाही आठवले तर कसला तक्ता, कसले रंग नी कसले रोधक (रेझिस्टर्स) Sad
म्हणून जी एस बी बी राॅय

वेगपरिवर्तनाच्या दराला त्वरण म्हणतात व ही सदीश राशी आहे ( change in speed is called acceleration and its a vector quantity)
' देखा है पहली बार, साजन की आँखोंमे प्यार ' च्या चालीवर
वेगात परिवर्तन, सदीश राशी त्वरण
(पुढे टिंग टी टिडिंग, टिंग टी टिडिंग या संगीताच्या जागी मी ' दुखतं तंगाड, दुखतं तंगाड ' असं म्हणायचे .. बहुदा कधीतरी कोणीतरी तंगडं दुखत असताना हे गाणे म्हटलं होतं )

@mit, ही गाणी चाटे क्लासेस मधे शिकवलेली होती. मैत्रिणींनी आम्हाला सांगितली आणि आम्ही वापरली. मलातर खूपच उपयोग झाला

मजा आहे . आता आठवायला लागेल. पटकन आठवलं ते क्रॅनिअल नर्व्जचे क्रम लक्षात ठेवणारे वाक्य.
पण ते इथे लिहिण्यासारखं नाही. Happy

मायबोलीवर एकाच वेळेस ओपन स्कूलिंगविषयी लिहिणारी आणि घोकंपट्टी लिहणारी पोस्ट बाचून मजा वाटली.

साती,
वाचला तो लेख आत्ताच. आपल्या सर्वांच्यावेळी नोस्कुलींग नसल्याने असे करावे लागायचे ना ! तेव्हा असते तर छानच की ! मला खूप आवडलं असतं.
@mit, सांगा ना आयडिया..

मी स्टोर्‍या बनवायचे मोठ्या मोठ्या!
मेमरी टेक्निकच बेस्ट
आताही माझ्या बहिणीचा अभ्यास घेताना मी तिला वाक्य बनवून देते.
बाकी सगळ्या लेखाला अनुमोदन ग
घोकंपट्टीला खरच पर्याय नाही

आम्ही आम्लात निळा लिटमस तांबडा होतो हे "आनिता" असे लक्षात ठेवले होते ,अनिता नावाच्या वर्ग मैत्रीणीच्या नावावर ,ती जाम चिडायची ,प्रत्येक जण प्रयोगशाळेत अनिता अनिता करत फिरायचा

अरे व्वा .
सोनू .....
.आता एक मस्त कल्पना दिलीस मला माझ्या भाच्यांना अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी .......आता अभ्यास घेण्याआधी चाल लावत बसते ओके ..........!

बेधुंद सेम पिंच
माझ्या कोवळ्या वयातल्या पहिल्या क्रशच्या बहिणीचं नाव अनिता होतं Proud
(आता बादरायण वाटत असला तरी तेंव्हा गोड वाटायचा संबंध Blush Proud )

निमोनिक्स असे याला नांव आहे. अ‍ॅनाटॉमीच्या निमोनिक्स च संपूर्ण पुस्तक होतं.

क्रॅनिअल नर्व्हज साठी ऑन ऑकेजन ऑफ टी वालं एक वरणभात वाक्य पण होतंच की Wink

माझ्या कोवळ्या वयातल्या पहिल्या क्रशच्या ....
<<
आत्ता काय निबर वय सुरू झालंय का पोरी तुझं? Proud उक्कूशी तर आहेस अजूनी

अनिता मला जरा कठीणच वाटायचं .. आनिता आनिता असं घोकलं तरी कधीतरी 'अनिता' होणार आणि अल्कात निळा लिटमस तांबडा होणार असं वाटून धसका घेतला होता. मग हे गाणच सोप्पं वाटलं.
तो तांबडा का व्हायचा? लाल का नाही ? लाल चिखल नावाचा धडा होता म्हणजे लाल शब्द प्रचलीत होता तेव्हा. आता माझ्याकडे लाल रंगाचेच कपडे आहेत, तांबडे नाहीत. लाल गुलाबाला तांबडा गुलाब म्हणायला कसंतरीच वाटतय. तांबडा रंग त्या लिटमसनंतर नंतर कधीच वापरलेला नाही आठवत तांबडं फुटलय सोडून

मानवी मूत्र आम्लधर्मी असतं. त्या वयात असल्या गोष्टी बरोब्बर लक्षात रहात. त्यावरून 'लाल लघवी लिटमस' असं वाक्य बनवलं होतं. अर्थात अचकट विनोद करायचे ते केलेच.
-गा.पै.

तार्‍यांच्या वर्णपटाची अक्षरे (उतरत्या तापमानाप्रमाणे) OBAFGKMRNS अशी आहेत. त्यावरून बनवलेलं एक जगप्रसिद्ध वाक्य :
Oh, Be A Fine Girl, Kiss Me Right Now, Sweetheart!
-गा.पै.

माझ्या कोवळ्या वयातल्या पहिल्या क्रशच्या बहिणीचं नाव अनिता होतं >>> तु बालवाडीत होतीस का तेव्हा ? Proud

११ वीला Trigonometry आणि Coordinate Geometry जेव्हा एकत्र आले, तेव्हा कुठला ratio कुठल्या quadrant मध्ये +ve असतो त्याचा क्रम astc होता.

पहिल्यात सगळे +ve म्हणून a
दुसर्‍यात sine +ve म्हणून s
तिसर्‍यात tangent +ve म्हणून t
चौथ्यात cosine +ve म्हणून c

यापासून Add Sugar To Coffee असं वाक्य गुरुजींनी सांगितलं. पुढे म्हणाले की : If you are bored with this sentence, you can use 'All Sardarjis Ticket Checkers'!

गा.पै.

इब्लीस, मला वाटतं सातीला टी पार्टीच्या गर्ल व्हीजिटर्स मधे रस नव्हता Happy
गापै, छान आहेत तुमच्या युक्त्या.

विनया, गाणी करा, रिया सारख्या गोष्टी बनवा नाहीतर mnemonics or acronyms .. शेवटी वेळेवर सगळे आठवल्याशी कारण!
काही लोक या शिवायच लक्षात ठेवतात ते ग्रेटच !!

त्या ग्रेट लोकात एकदा मी पण होते. cranial nerves मला त्या on occasion of tea मधल्या मुलींपेक्षा नुसतेच नावाने लक्षात ठेवणे सोपे वाटायचे.. चालीत म्हणायचे खरंतर पण कुठल्या गाण्याच्या चाल नव्हती असंच आपलं ' आॅलफॅक्टरी आॅप्टीक आॅक्युलोमोटर ट्राॅकेलर ट्रायजेमिनल आॅब्ड्यूसनस् '
' फेशियल वेस्टी ग्लासोफॅरेंजीयल वेगस अॅक्सेसरी हायपोग्लाॅसल '

पलंगावरून दिसेल असे छताला चिकटवलेले होते. फळीचा माळा असल्याने छत खालीच होतं त्यामुळे नीट दिसायच
On Occasion Of The Tea, Attractive Faces Are Girl Visitors. Say Hi.

मूलद्रव्यांची आवर्तसारणी (periodic table of elements ) आठवते का ?
ह हे
ली बे ब क न ओ फ ने
ना मग अल सी प स कल अर
क का सक टी व्ह कर मन फे को नी कू झन गा गे अस से बर कर
रब सर य झर नब मो टक रू रह पड अग कड

४८, आणि मी नेटवर शोधले.. हे सगळे याच क्रमाने अगदी बरोबर आहेत. आय लव घोकंपट्टी ... होय, एखादा मधलाच विचारून त्याचा क्रमांक विचारला तर नाही सांगू शकत .. पण फिकर नाॅट .. लेखी परीक्षेत बक्कळ टाईम असायचा तक्ता काढून नंबर लिहायला .. आणि बरेचदा फक्त थर्ड रो इलेमेंटस् चा प्रश्न यायचा Happy आय स्टील लव इट .. <3

मधले लि बे ब क न ओ फ ने का काहिसे होते नै.
मी कधी पाठ केले नाहीत पण माझी बहिण गुणगुणत असायची. Happy

आयशाॅट साती, नोटस् मधे लिहून मग पेस्ट करते इथे, त्यात कायतरी गोची केली. परत पूर्ण काॅपीपेस्ट केलं. आता झ्याक का? थँक्स सांगितल्याबद्दल .

अरेच्या आदन पवा वाजतो कसा उईपु हे अजुन कोणीच सांगितल नाही. मी तरी सगळ्यात पहिल वाक्यात लक्षात ठेवण्यासाठी पहीलीत हेच शिकलो होतो

अरेव्वा!!
मस्त लेख! घोकंपट्टी खुप केलीय शाळेत.

जीवनसत्व आणि त्यांच्या अभावी होणारे रोग लक्षात ठेवण्यासाठी आम्ही आयडीया केलेली अशी होती.

जीवनसत्व अ - रातआंधळेपणा
जीवनसत्व ब- बेरीबेरी
जीवनसत्व क- स्कर्व्ही
जीवनस्त्व ड- मुदुस

व्हेस्टिब्युलोकॉक्लिअर ला ऑडिटरी. म्हणून ए आहे तिथे.
से हाय ऐवजी पहिल्यात आह, हेवन! असे येत असे शेवटी.

Pages