प्रवेशिका - ४५ ( chinnu - झुरणे हे नवे नाही... )

Submitted by kaaryashaaLaa on 15 October, 2008 - 00:07

मित्रहो, कार्यशाळेत गझल प्रकाशित होण्याचा आज शेवटचा दिवस.
आजही तुम्ही नेहमीप्रमाणे गुणांकन करायचं आहेच.
भारतीय प्रमाणवेळेनुसार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत तुम्ही गुणांकन करू शकता.

झुरणे हे नवे नाही
साजण तो, सवे नाही

भिरभिरती मनी ऊन्हे
सोसवत शिरवे नाही

शब्द शब्द धुके झाला
आठवत कडवे नाही!

आस तुझ्या पावसाची
मन-रान हिरवे नाही

दगडाला पाझर सख्या!
मन तुझे हळवे नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे ४
अत्यंत छोटा बहर.. पण गझल झालीये... वाह...
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

५ गुण...

ठीक आहे. माझ्या मते ४ गुण.
-सतीश

४ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

छोट्या बहराला ६ गुण
--------------------------------
आली दिवाळी! Happy

छोट्या बहरात लिहीणं तसं कठीणच असतं. म्हणून माझे ५ गुण .

माझे ५