हि कसली 'शाळा'?

Submitted by anandsant on 6 February, 2013 - 11:50

शाळा......रद्दड चित्रपट ...प्रत्येकाला आपल्या शाळेची आठवण करून दिली एवढंच काय ते यश...भंगार कथानक, - जुना काळ दाखविण्याच स्पष्टीकरण नाही, - दिलीप प्रभावळकरांना वाया घालवलय - ,माजरेकर सर ( संतोष जुवेकर) / नरूमामा (जितेंद्र जोशी) / बेंद्रे बाई / जोश्याची बहिण हि पात्र निरर्थक, - एकालाही स्वतःचा स्वभाव नाही, म्हात्रे सोडला तर नायकाचा एकही मित्र लक्षात राहत नाही, मुलांचं भावविश्व खुलवून दाखवण्यास director असमर्थ, expression देण्याची मुभा फक्त म्हत्रेलाच, कथा कुठेही रंजक होत नाही..चित्रपट चालू असताना मधेच सर्वांची नावं दिसायला लागतात, इथे चित्रपट संपतो! (?) director ला नक्की काय संदेश द्यायचाय हे बहुदा शाळा २ मध्ये असावं .. पटकथा आणि
खेड्यातलं चित्रीकरण हि जमेची बाजू...ट्रेलर मुळे उगाच अपेक्षा उंचवून ठेवल्या...National Award का दिलं हे गूढ कायम.. चित्रपट म्हणण्यापेक्षा "Documentary" म्हटले तर उत्तम.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील परीक्षण चित्रपटाचे आहे..पुस्तकाचे नाही...! (पुस्तक नक्कीच अप्रतिम आहे..परंतु नावाव्यतिरिक्त दोघांमध्ये काहीही साम्य नाही)

हो ना कोण सुजय ? Uhoh
चित्रपट न आवडण्याचा आणि सुजयशी बोलण्याचा संबंध नाही कळाला !
बोलल्यानंतर धागाकर्त्याचे मत बदलेल असे काही आहे का ?

सुजय डहाके...
रच्याकने, इतक्या उशीरा शाळेवर परीक्षण घेऊन का आलात?
कुठल्याही कलाकृतीवर आधारीत दुसरी कलाकृती साकारायची असते त्यावेळी, दोन जबाबदार्‍या असतात. पहिल्याचा आशय आणि सौंदर्य अबाधित राखून, दुसर्‍या कलाकृतीचं वेगळेपण दर्शवण्याचं...
फार कमी वेळा आणि कमी लोकांना ते जमतं... त्यामुळे, अशा गोष्टींबाबत, पूर्वग्रह ठेवून पाहणं बर्‍याचदा आपल्या नाखूष असण्याचं कारण असतं... हेमावैम... असो.

...

..

चित्रपट येऊन गेल्यावर इतक्या दिवसांनी आणि चित्रपटाविषयीची तुमची मतं चित्रपटाच्या दिग्दर्शकापर्यंत थेट पोचवली गेली असताना ती मतं इकडे जाहिर करण्यामागे काय उद्देश आहे?

चित्रपट तसा वाईट नाहिये...पण पुस्तकामुळे आपल्या अपेक्षा जरा जास्तच होत्या.
आता जेंव्हा टीव्हीवर बघतो तेंव्हा पहील्यांदा पाहिला होता त्यापेक्षा जास्त आवडतो Happy

लोकांना नटनट्यांच्यापलिकडे काहीही पडलेली नसते. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम वगैरे फक्त पुस्तकातल्या गोष्टी. हे वरच्या कोण सुजय मधून दिसले. धन्य!!

नीधप.....

हा रोग फार जुना आहे. "गाईड" पाहिल्यानंतरच्या पुढच्या आठवड्यात आम्ही चारपाच मित्र रंकाळ्यावर त्या चित्रपटावर भरभरून बोलत राहिलो होतो. गप्पांच्या ओघात एक मित्र म्हणाला, "बाकी काही म्हण अशोक; गाईडला डोक्यावर घ्यावे ते केवळ विजय आनंदसाठीच !".... यावर मी काही उत्तर देणार तोच असाच एक गणपा मध्येच टपकला आणि म्हणाला, "अरेच्या, पण गाईड मध्ये देव आनंद आहे ना ?"

मला वाटते आपल्या देशाने फक्त 'सत्यजित रे' हे एकच नाव असे पाहिले असावे की प्रेक्षक त्यांच्यासाठी चित्रपटगृहात जात होते.

अशोक पाटील

''निशाणी डावा अंगठा'' पाहिल्यावर मला असेच वाटले होते... पण पुन्हा पाहिल्यावर त्यातला दिग्दर्शक दिसला आणि जास्त भावला तो चित्रपट. Happy

खरेतर मी अभिनेत्यांपेक्षा सुद्धा दिग्दर्शकाला मानणार्‍या गटातीलच आहे,
पण गेली अनेक वर्षे चित्रपट आवर्जुन पहात नाही आणि नविन लोक आणि माहिती पासुन पण लांब आहे,
त्यामुळे सुजय यांचे नाव माहित नव्हते.
बिमल रॉय पासुन अलिकडचे प्रियदर्शन पर्यंत आणि राजा परांजपे / भालजी यांच्या पासुन संजय सूरकर, इ. पर्यंत अनेक दिग्दर्शक आवडत्या यादीत आहेत.