आमुची माय मराठी

Submitted by यःकश्चित on 6 February, 2013 - 08:57

आमुची माय मराठी

================================

हलकीच आलेली श्रावणाची सर
गुलाबी पहाटेचे जसे धुके धुसर
महाराष्ट्राला पडलेले स्वप्न निळसर
मायमराठी ममत्वाचा स्पर्श ओलसर...!

सह्याद्रीच्या कुशीमध्ये जिचे जन्मस्थान
गडावरच्या तोफा जश्या उंचावूनी मान
कोकणच्या बागेतील हिरवे नारळाचे पान
कोकीळकंठातील एक स्वप्नसुरेल तान...!

तुतारीची तान जशी वाजे दशदिशा
जगी राज्य करण्या असे अभिलाषा
महाराष्ट्राची शान असे मराठी भाषा
सर्वांहुनी महान असे मराठी भाषा.....!!!

- यःकश्चित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users