क्षण

Submitted by शाबुत on 4 February, 2013 - 22:01

क्षण

एका गावातल्या शाळेच्या प्रांगणात निंबाच्या हिरव्या झाडाखाली, एक शिक्षक आपल्या वर्गातल्या मुलांना घेऊन बसले होते, कारण उन्हाळ्याचे दिवस होते, वर्गात सगळ्यांनाच घाम येत होता, तेव्हा निंबाच्या झाडाखाली गारव्यात शिकवणं चालु होते. शिक्षण तेच असतं की ज्यात मुलांच्या आयुष्यात चांगला बदल घडवुन आणतं. त्या शाळेतल्या एका भितींवर लिहलेलं होतं की, "जिवन जगण्याची कला ही सगळ्या कलांमधे मोठी कला आहे."

"कधीतरी आपल्या आयुष्यात अशीही वेळ येते की, आपल्याला वाटतं 'आजवर जे काही जगलो, ते सगळंच वाया गेलं.' अशा वेळी आपलं मन नेहमी भुतकाळाचाच विचारत रुतुन बसलेलं असतं, खरं तर मनाला भुतकाळातच रमायला जास्त आवडत असेल, कारण सकाळी उठल्यापासुन तर रात्री झोपेपर्यंत मनात काहीना-काही विचार सतत चालु असतात, ते सहसा आपल्या भुतकाळा संबधी असतात."

"..... कधीतरी चारपाच माणसं जमली की ते नेहमी आपल्या भुतकाळातल्या आठवणी सांगण्यात रमुन जातात. कधीतरी कोणी भविष्याविषयी बोललं तर माझं कसं होईल..... त्याचं कसं होईल... या जगचं कसं होईल............ अशीच काहीतरी चिंता वाहत असतो कारण भविष्य आपल्याला माहीती नसतं, तसच ते जाणुन घेण्याचं कोणतही साधन आजवर उपलब्ध झालं नाही........ खरं त्याची गरजच नाही, कारण.........." शिक्षक वर्गातल्या मुलांना शिकवित होते. मुलंही पुस्तकाबाहेरचं असल्यानं कान देऊन ऐकत होते.

"माणसाचं खरं जिवन हे त्याचा चालु वर्तमान असतं, पण एवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, त्यावेळी आपलं मन मात्र भुतकाळात आपल्या हातुन झालेल्या चुका,...... ज्या कधीच दुरुस्त करता येत नाही, कारण ती वेळ निघुन गेलेली असते, तसचं भविष्याची चिंता,..... त्यांच नेमकं स्वरुप आपल्या लक्षात येत नाही. तरीही यातच आपलं मन नेहमी गुरफटलेलं असतं."

".......... अशा परिस्थीत आपल्या हातुन एक अक्षम्य अशी चुक होते, ती म्हणजे 'आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आलेले जे काही वर्तमानातले क्षण आहेत, ते आपल्या जिवणातुन निसटुन जात असतात.......ते कधीच परत येणारे नसतात....... आणि गमंत अशी की आपल्याला त्याची जाणिवही नसते........"

"......... तेव्हा मुलांनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की..... भ्रमात जगु नका.......नेहमी सजन राहुन जगा..... वर्तमानाते जे काही क्षण आहेत, ते चांगल्या प्रकारे कसे उपयोगात आणुन....... त्यात चांगली कामं करुन........ आपलं जिवन कसं आंनदी बनवता येईल यावर लक्ष केंद्रीत करा..... म्हणजे तुमचा भुतकाळ आणि भविष्य दोन्ही उज्जवल होतील....... कारण माणसाचं जिवन हे भुतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ... असं ठोकळेबाज नसुन तो सतत वाहणारा प्रवाह आहे."

थोड्या वेळानंतर शाळा सुटल्याची घंटा वाजली.

..........................

Group content visibility: 
Public - accessible to all site users