Submitted by प्राजु on 3 February, 2013 - 10:51
घेतले फ़ुलायचे नवीन खूळ मी
अन शिशीर थुंकला भरुन चूळ मी
मोगरा तुलाच ठेव ठेंगणा तुझा
माळते विशाल धुंदला बकूळ मी
काच होउनी समोर राहिले जरी
वाटले तुला, असेन का ठिसूळ मी??
न्हाउनी पवित्र जाहलास तूच अन
वाटते तुलाच जाहले गढूळ मी??
काय वागले जरा रिवाज सोडुनी
बुडविली म्हणे परंपरा नि कूळ मी!
रूप चंडिकाच मी अखेर! जाण तू
दैत्य मारण्यास घेतले त्रिशूळ मी
सोड हा विचार, देव तू न राहिला
आणि राहिले तुझी न चरणधूळ मी
- प्राजु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त गझल. आवडली.
मस्त गझल. आवडली.
गझल म्हटली की सर्व काही गोगोड
गझल म्हटली की सर्व काही गोगोड असायला हव या विचाराना झुगारुन देणारी ही गझल आवडली<<<
गझल म्हंटली की सर्व काही गोगोड असायला हवे असे कोण म्हणाले? सुरेश भटांच्या फार कमी गझला 'गोगोड' आहेत. त्यांच्या अनुयायांच्या फार कमी गझला 'गोगोड' आहेत. उर्दूत फार कमी गझला 'गोगोड' आहेत.
असो!
या गझलेबाबत माझे मतः
ही गझल खयालांमधील काहीश्या नावीन्यामुळे आवडली. काही ठिकाणी सुबकता किंवा चपखलता कमी पडली असे प्रामाणिकपणे वाटते.
घेतले फ़ुलायचे नवीन खूळ मी
अन शिशीर थुंकला भरुन चूळ मी<<<
शिशीर थुंकला ही संकल्पना नावीन्यपूर्ण आहे. पण चूळ भरून शिशीर थुंकला ही शब्दरचना काहीशी रसभंग करणारी वाटली. पण पर्यायही नाही आहे कारण चूळ हा एक काफियाही आहेच. पहिली ओळ मस्तच आहे. 'अन् शिशीर त्यागला भरून चूळ मी' असे मला सुचले. फुलायचे खुळ या सुंदर कल्पनेपुढे थुंकणे या शब्दाने काहीसा रसभंग जाणवला हे वैयक्तीक मत आहे, चुकीचेही असू शकेल.
मोगरा तुलाच ठेव ठेंगणा तुझा
माळते विशाल धुंदला बकूळ मी<<< मोगर्याला उद्देशून 'ठेंगणा' हे विशेषण का घेतले असावे लक्षात आले नाही. मोगर्याचा गझलेतील प्रतीकात्मक वापर कंटाळवाणा झाला आहे हे कबूल, म्हणून ते दर्शवण्यासाठी ठेंगणा ऐवजी 'हा जुना' असे एक सुचले. आता हे जे काही सुचले आहे ते 'असेच असायला हवे होते' असे म्हणत आहे असे कृपया मानले जाऊ नये. पण चपखलता भासली नाही मला तरी ठेंगणा या शब्दात!
काच होउनी समोर राहिले जरी
वाटले तुला, असेन का ठिसूळ मी??<<< हा शेर मला लक्षात आला नाही याचे कारण दुसर्या ओळीतील 'का' या अक्षराची जागा व अभिप्रेत अर्थ! म्हणजे 'ही ठिसूळ असेल का बुवा?' असे विचारले जात आहे की 'मी ठिसूळ आहे असे तुला का म्हणून वाटले' असे विचारले जात आहे? थोडक्यात, 'असे असे झाले का?' असे आहे की 'असे का झाले' असे कारण विचारले जात आहे हे समजले नाही. बहुधा याचे कारण 'का' या अक्षराची ओळीत आलेली जागा हे असावे. दोन्ही अर्थ असले तर 'वाटले तुला' यानंतरचा 'स्वल्पविराम' निदान माझा तरी गोंधळ उडवत आहे. ही इतकी चर्चा, याला कृपया चीरफाड समजले जाऊ नये. वर बरीच चर्चा झाल्यामुळे मीही माझी मते नोंदवत आहे इतकेच.
न्हाउनी पवित्र जाहलास तूच अन
वाटते तुलाच जाहले गढूळ मी??<<< शेरातील खयाल अतिशय सुंदर! (बाकी दोन प्रश्नचिन्हे रेखाटून काही साध्य होत नाही, खरे तर एकही प्रश्नचिन्ह नसते तरी शेर पुरेसा अर्थपूर्ण आहेच. शिवाय, 'वाटले तुलाच' मधील जो शेवटचा 'च' आहे तो खरे तर 'मी' या रदीफेसाठी अधिक योग्य आहे. म्हणजे 'तुला वाटले मीच गढूळ झाले?' असे! पण जमीनीमुळे तसे करता येणार नाही हे मान्य). (पहिल्या ओळीतील 'च' योग्य जागी असला तरी अधिक सुलभतेसाठी मी तरी ती ओळ 'न्हाउनी पवित्र जाहलास तू स्वतः' अशी लिहिली असती, पण हे ज्याचे त्याचे).
काय वागले जरा रिवाज सोडुनी
बुडविली म्हणे परंपरा नि कूळ मी!<<< मस्त , थेट आणि सुबक शेर!
रूप चंडिकाच मी अखेर! जाण तू
दैत्य मारण्यास घेतले त्रिशूळ मी<<< शेर आवडला नाही. वर्णनात्मक वाटला.
सोड हा विचार, देव तू न राहिला
आणि राहिले तुझी न चरणधूळ मी<<<
या शेरातील आत्मविश्वासाचा भाव फार सुंदर आहे. पहिल्या ओळीत 'राहिला' या शब्दानंतर एक 'स' हवा होता असे वाटून गेले. तो घेतला असता तरी काही बिघडत नाही. एकदा मागे समीर चव्हाणांनीही असाच एक 'स' त्या वृत्तात शेवटी लघु अक्षर नसतानाही घेतलेला होता व कोणीतरी वृत्ताचा बडगा दाखवल्यावर उत्तर दिले होते की एवढ्यातेवढ्याने फरक पडत नाही, जबाबदार कवीने जबाबदारीने काही लिहिले तर काव्याकडे पाहण्याची दृष्टी ठेवा. ते मला पटले व आपण वृत्तहाताळणी या अडथळ्याच्या पलीकडच्या गझलकारा आहात म्हणून आपणही तो 'स' घेतला असतात तर व्यक्तीशः मला काही वाटले नसते. तसेही, 'देव तू न यापुढे' असेही म्हणता येईल बहुधा!
मी हा शेर असाही केला असता, हे एक सहज आपले सुचले, कृ गै न.
मी न मानणार देव यापुढे तुला
यापुढे नसेन फक्त चरणधूळ मी
(वर दिलेली मते ही माझी वैयक्तीक मते असून त्यांच्यावर वरील चर्चेचा प्रभाव नाही व कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. तरीही चु भु द्या घ्या).
धन्यवाद व शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
गढूळ आणि कूळ शेर खूप
गढूळ आणि कूळ शेर खूप आवडले...
प्राजू माफ करा पण मला तरी गझल वेगळ्या धाटणीची वा बंड्खोर वाटली नाही
मतला जरूर वेगळा आहे विशेषतः सानि मिसरा पण विशेष भावला नाही... पण असे होते... तुम्ही जर convince असाल तर तसाच ठेवा कधी कधी एखादा शेर आपण स्वतःसाठी पण लिहून जातो जो बाकीच्यांना कळतोच असे नाही
Pages