Submitted by सुशांत खुरसाले on 3 February, 2013 - 07:12
'बोध प्रीतीचा तुझ्या'
बोध प्रीतीचा तुझ्या ;कळला नसे राया तिला
ऊन का तू घेतले ;अन् का दिली छाया तिला ?
रोज गजरे नवनवे ; रूळती तिच्या केसांवरी
तू झगडशी व्यर्थ रे ; पण ही फुले द्याया तिला !
प्रेम अथवा वासना ; एकसारखे दोन्ही तिला
ना कळे ब्रम्ह तीज ; अन् ना कळे माया तिला !
बाहुलीला का कधी , कळते जगाचे प्रेम रे
र्हदय नाही लाभले ; पण लाभली काया तिला !
स्थान का त्या स्पंदनी ,मिळवावया झटतोस तू
नाव भलत्याचेच घे ; जर सांगती बाया तिला !
-- सुशांत खुरसाले
मो.नं. ७५०७२६९९७७
मायबोलीवर पहिल्यांदाच लिहितो आहे... चु.भू.द्या.घ्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्यक्तिशः हे लेखन फारसे
व्यक्तिशः हे लेखन फारसे आवड्ले नसले तरी चूक भूल देत घेत आहे ....
मबोवर स्वागत !
वैभवदादा , प्रतिसादाबद्द्ल
वैभवदादा , प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद !!
नव्यानेच गझल लिहितो आहे ..काव्याचा अर्थ प्रगल्भ करण्याचा
जरुर प्रयत्न करु.
बाहुलीला का कधी , कळते जगाचे
बाहुलीला का कधी , कळते जगाचे प्रेम रे
र्हदय नाही लाभले ; पण लाभली काया तिला !
हा आवडला...!
बाकी तिसर्या शेरात "एकसारखे" मध्ये जरा वृत्ताचे बघा.
प्रेम अथवा वासना ; सारखे
प्रेम अथवा वासना ; सारखे दोन्ही तिला
ना कळे तिज ब्रम्ह अन् ....ना कळे माया तिला ! >>>
असे करू शकता शेर छान आहे प्रेम्=ब्रम्ह ! वासना =माया अगदी चपखल !!
( गरज वाटल्यास(च) पहिल्या ओळीत तिला हा शब्द बदलू शकता ...एकाद्या शब्दाची अनावश्यक द्विरुक्ती टाळता येईल)
वैभव, चुकते आहे.... >>>
वैभव,
चुकते आहे....
>>> प्रेम अथवा वासना ; सारखे दोन्ही तिला <<<
हे वृत्तात बसणार नाही. त्यांनी वेगळे वृत्त वापरले आहे.
हो हो बरोबर आहे जोशी साहेब
हो हो बरोबर आहे जोशी साहेब तुमचे
चुकीबद्दल क्षमस्व !
<<<प्रेम अथवा वासना काही फरक नसतो म्हणे
कळते कुठे तिज ब्रम्ह अन कळते कुठे माया तिला>>> हे कसे?
वैभवजी, तुमच्या शेराचा आताचा
वैभवजी,
तुमच्या शेराचा आताचा फ्लो फार मस्त आहे.... चालू शकेल मला.
पण अहो, मूळ गझलकाराला चालले पाहिजे ना?
वैभवजी आणि अजयजी , प्रथमतः
वैभवजी आणि अजयजी ,
प्रथमतः प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
<< प्रेम अथवा वासना काही फरक नसतो म्हणे
कळते कुठे तिज ब्रम्ह अन् कळते कुठे माया तिला >>
हा वैभवजींनी सुचवलेला बदल रास्त वाटतो आहे.. .
याबाबत मीही जरा गोंधळलोच होतो ...सुचवल्याबद्दल आभार !!
@ वैभवजी , प्रेम = ब्रम्ह
@ वैभवजी ,
प्रेम = ब्रम्ह आणि वासना =माया..>>
अगदी जे सांगायचे ते ओळखलेत...
पुलेशु
पुलेशु