'बोध प्रीतीचा तुझ्या' (गझल)

Submitted by सुशांत खुरसाले on 3 February, 2013 - 07:12

'बोध प्रीतीचा तुझ्या'

बोध प्रीतीचा तुझ्या ;कळला नसे राया तिला
ऊन का तू घेतले ;अन् का दिली छाया तिला ?

रोज गजरे नवनवे ; रूळती तिच्या केसांवरी
तू झगडशी व्यर्थ रे ; पण ही फुले द्याया तिला !

प्रेम अथवा वासना ; एकसारखे दोन्ही तिला
ना कळे ब्रम्ह तीज ; अन् ना कळे माया तिला !

बाहुलीला का कधी , कळते जगाचे प्रेम रे
र्‍हदय नाही लाभले ; पण लाभली काया तिला !

स्थान का त्या स्पंदनी ,मिळवावया झटतोस तू
नाव भलत्याचेच घे ; जर सांगती बाया तिला !

-- सुशांत खुरसाले
मो.नं. ७५०७२६९९७७
मायबोलीवर पहिल्यांदाच लिहितो आहे... चु.भू.द्या.घ्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैभवदादा , प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद !!

नव्यानेच गझल लिहितो आहे ..काव्याचा अर्थ प्रगल्भ करण्याचा
जरुर प्रयत्न करु.

बाहुलीला का कधी , कळते जगाचे प्रेम रे
र्‍हदय नाही लाभले ; पण लाभली काया तिला !

हा आवडला...!

बाकी तिसर्‍या शेरात "एकसारखे" मध्ये जरा वृत्ताचे बघा.

प्रेम अथवा वासना ; सारखे दोन्ही तिला
ना कळे तिज ब्रम्ह अन् ....ना कळे माया तिला ! >>>

असे करू शकता शेर छान आहे प्रेम्=ब्रम्ह ! वासना =माया अगदी चपखल !!

( गरज वाटल्यास(च) पहिल्या ओळीत तिला हा शब्द बदलू शकता ...एकाद्या शब्दाची अनावश्यक द्विरुक्ती टाळता येईल)

वैभव,
चुकते आहे....

>>> प्रेम अथवा वासना ; सारखे दोन्ही तिला <<<

हे वृत्तात बसणार नाही. त्यांनी वेगळे वृत्त वापरले आहे.

हो हो बरोबर आहे जोशी साहेब तुमचे
चुकीबद्दल क्षमस्व ! Sad

<<<प्रेम अथवा वासना काही फरक नसतो म्हणे
कळते कुठे तिज ब्रम्ह अन कळते कुठे माया तिला
>>> हे कसे?

वैभवजी आणि अजयजी ,
प्रथमतः प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!

<< प्रेम अथवा वासना काही फरक नसतो म्हणे
कळते कुठे तिज ब्रम्ह अन् कळते कुठे माया तिला >>
हा वैभवजींनी सुचवलेला बदल रास्त वाटतो आहे.. .

याबाबत मीही जरा गोंधळलोच होतो ...सुचवल्याबद्दल आभार !!