चित्रपटाच्या संवादांच लेखन चालू आहे, सोनलला संवाद लिहून पूर्ण कर म्हणून आग्रह करणारा राम या दोघांकडे आळीपाळीने बघणारी रागिणी. चित्रपटाच्या शेवटाकडे जाणारा सिन शेवट अनेकवेळा समजावून सांगून थकलेला राम वैतागतो तेव्हा सोनलच्या तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य, "तुझा हिरो खोटा आहे, राम".
अनयुज्वल शेवट दाखवणारा चित्रपट.
हे अगदी साधं सोपं असतं आपण त्याला काँप्लिकेटेड करून ठेवत असतो.
नाती संपली तरी प्रेम असतच
आपला हात धरून चालणारं कोणितरी हवं असतं
प्रमोशनल संवादात साधारण कल्पना येऊन जाते, आणि म्हणूनच पहावा वाटतो
दाक्षिणात्य चित्रपटांच भाषांतर करणारा लेखक असणारा. आपल्या बायकोवर मनापासून प्रेम करणारा, तडजोड होईल, जमेल पुन्हा आपलं हा विश्वास बाळगणारा,नात्यांवर विश्वास असणारा, आणि रागिणीची वाट पाहणारा राम.
राम आणि उदयोन्मुख अभिनेत्री रागिणी एकाच क्षेत्रातले, म्हणून दोघ लग्न करतात पण जमत नाही आणि घटस्फोटाच्या वाटेवर आहेत. राम कळवळून कॉन्सिलिंगसाठी बोलवत असतो. त्याला नातं टिकवायचच असतं तर रागिणीला मात्र बंधन नकोच असतं तीचा साफ नकार.
सोनल, दुस-यांदा या वाटेवर चालणारी वैतागलेली. "माणसानी एकतर लग्न कराव नाहितर आनंदी रहावं",
"मी आनंदी राहायचं ठरवल आहे" असं म्हणणारी.
स्वराज, आणि मीरा हे रामचा मित्र, आणि सोनलची मैत्रिण.
स्वराज रामला आणि मीरा सोनलला चांगलेच ओळखणारे. दोघांनाही या दोघांची काळजी.
सोनलचा रामच्या आयुष्यात प्रवेश, दोघांच कामाच्या दरम्यान जमलेलं मस्त ट्युनिंग; ओघानच एकमेकांना मिस करणं आणि प्रेमात पडल्याचा साक्षात्कार होणं. नेहमीचाच गोंधळ, प्रेमात पडलेलं बावचळलेपण, अरे हे मला वाटतय पण समोरच्याला पण वाटतय का हे असचं?
मीराला आणि स्वाराजला पक्की खात्री. सोनलपण हे सहज स्विकारते पण राम....त्याला जड जातं तो रागिणीसाठी थांबलेला आहे, असं त्यानी ठरवलेलच असतं आणि तो तिथे अडकतो.
शेवट सांगत नाहीये, तुम्ही बघाच.
अतूल कुलकर्णी सारखे अभिनेते अजून का नाहीत हा प्रश्न पुन्हा पडला.
सुलेखाचा सहज वावर, अॅटिट्युड आवडला
सागरिकाची सोनल आवडली. सुरवातीला जरा उच्चार खटकतात पण तरी आवडलीच.
राजवाडेंचा स्वराज, आणि मीरा वेलणकरची मीरा त्यांच्या त्यांच्या जागेवर एकदम फिट्ट.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चित्रपटासाठी मिराह एंटरटेनमेंटनी लिरिक्स लॉन्च ही कल्पना राबवली. ही कल्पना अतूल कुलकर्णींची, यासाठी त्यांच आणि मिराहच जोरदार अभिनंदन.
मला तरी भयंकर आवडला, तुम्हाला साध सरळ सोपं काही बघायला आवडत असेल तर तुम्हीही बघाच.
साधी सोपी प्रेमाची गोष्ट
कदाचित प्रिमिअरला प्रेमाची गोष्टच्या टिम बरोबर पाहिल्यामुळे जरा जास्तच आवडला असावा 
चिनूक्स - समीक्षक, प्रेक्षक
चिनूक्स - समीक्षक, प्रेक्षक नंतर, हल्ली प्रोमोज मधे दिग्दर्शक , कलाकार याना चांगला भरपुर वाव मिळतो त्यांच्या कलाकृती बद्दल बोलायला, कितीजण या पैलुंवर बोलतात?
दिग्दर्शकानं, अभिनेत्यानं
दिग्दर्शकानं, अभिनेत्यानं चित्रपटाची सुरुवातीला केवळ ओळख करून देणं अपेक्षित असतं. विषय काय, त्याचं महत्त्व काय, हा विषय का हाती घेतला, याबद्दल सर्वसाधारणपणे अनेकजण बोलतात. चित्रपटाशी संबंधित मंडळींनी चित्रपटाचा अर्थ लिहून, बोलून समजावून सांगणं अपेक्षित आहे, असं मला वाटत नाही. चित्रकारांना, कवींना असं करताना मी पाहिलेलं नाही. हे काम समीक्षकाचं आणि प्रेक्षक-वाचकाचं.
विषय काय, त्याचं महत्त्व काय,
विषय काय, त्याचं महत्त्व काय, हा विषय का हाती घेतला, याबद्दल सर्वसाधारणपणे अनेकजण बोलतात.>>
सर्वसाधारणपणे ही येक प्रेमकथा आहे, या या काळात घडते, दोन माणसे काही सर्कम्स्टन्सेस मधे येकत्र आली आणि त्यांच्यावरची कथा इतपतच बोलतात, त्यापुढे आम्ही हा विषय जरा वेगळ्या पद्धतीने हाताळलाय हे नेहमीचे.
चित्रकार- यात जर येखाद्या गॅलरीने/क्युरेटरने जर क्युरेट केले असेल तर ब्रोशरमधे विषय, तंत्र, हाताळणी व्यवस्थीत नॅरेट करतात
चांगला चित्रपट रीव्ह्यु असा
चांगला चित्रपट रीव्ह्यु असा धागा काढा ना मग.... माझी पोस्ट तुम्हाला योग्य वाटत नसली किंवा उपयोगाची वाटावी म्हणुन लिहिलेली नाही.... तुमची पोस्ट वाचल्यावर माझ्या मनातली ती प्रतिक्रिया आहे... त्या मुळे ती पोस्ट तुमच्या उपयोगाची आहे का नाही हा तुमचा प्रश्न आहे!!!!
परत समिक्षकाने काहीहे लिहिलं तरी आपलं आपल्याला आवाडलं की नाही ते समजतच ना!!! अनेक सिनेमा असे असतात की पत्रकार परिक्षण अगदी वाईट करतात... प्रत्यक्षात ते अप्रतिम असतात.... प्रत्येक पेक्षकाने आपली आवड पाहुनच सिनेमे पहावेत....
विषयाबद्दल तर चित्रपटकारही
विषयाबद्दल तर चित्रपटकारही बोलतातच. चित्रपटाची ब्रोशर्स, मुलाखतीच्या सीड्या प्रत्येक पत्रकाराला आगाऊ देण्यात येतात. 'आता हे बघा, हा लाल रंग अमूक दाखवतो, हा निळा फर्राटा तमूक दाखवतो' असं सांगण्याची वेळ चित्रकारावर येत नसावी. तसं त्यानं सांगूही नये. याबाबत तुम्हीच अधिक सांगू शकता.
माझी पोस्ट आवडल्याचा अनेकांनी
माझी पोस्ट आवडल्याचा अनेकांनी उल्लेख केला आहे... ह्याचाच अर्थ त्यांना ही तोच अर्थ तुमच्या पोस्ट चा अभिप्रेत झाला जो मला होता.....
<माझी पोस्ट आवडल्याचा
<माझी पोस्ट आवडल्याचा अनेकांनी उल्लेख केला आहे... ह्याचाच अर्थ त्यांना ही तोच अर्थ तुमच्या पोस्ट चा अभिप्रेत झाला जो मला होता.....>
असू शकेल. माझा मुद्दा चित्रपटाचं परीक्षण लिहिण्याची जबाबदारी घेतलेल्यांबद्दल होता. तसं पहिल्या ओळीत मी स्पष्ट लिहिलेलं आहे. इतरांना काय आवडावं, आणि काय आवडू नये, हा त्यांचा प्रश्न. माझ्या मुद्द्यासंदर्भात तुम्ही 'सामान्य प्रेक्षकाचा' का उल्लेख करताय, हे कळलं नाही.
पण चिनूक्स हल्ली या सगळ्याचंच
पण चिनूक्स हल्ली या सगळ्याचंच व्यावसायिकीकरण झालेलं आहे.....
आपण इथल्या नव्हे तर इतरत्र बाहेर केल्या जाणार्या समिक्षणाबद्दल म्हटलं जे विशेषतः छापलं जातं आणि त्यावर शेकडो वाचक आपलं मत ठरवतात ते समिक्षण हल्ली "थर्ड पार्टी सर्टिफिकेशन" अजिबातच राहिलेलं नाही.... समिक्षण हा आता प्रमोशनचा भाग झालाय.... म्हणूनच काही ब्लॉगर्स, समिक्षक हे पेड असतात..... रेडिओ स्टेशन्स मिडिया पार्टनर्स असतात....
फॉलो केलं जाणारं उघड समिक्षण हेच जर मुळात निव्वळ प्रमोशनल अॅक्टिव्हिटी झालेली असेल तर मग काय वेगळ्या अपेक्षा करणार आपण ????
भुंगा, मीडिया पार्टनर असणं
भुंगा,
मीडिया पार्टनर असणं म्हणजे पैसे घेऊन अनुकूल परीक्षण लिहिणं नव्हे.
दुसरं म्हणजे, हल्ली बातम्या सर्रास पैसे घेऊन / देऊन छापल्या जातात हे मान्य. तशी परीक्षणंही काही वृत्तपत्रं छापतात. तसे पत्रकार कोण, याबद्दलही गॉसिप कॉलमांमधून लिहून येतं. पण प्रत्येकावर तशी जबरदस्ती नसते. जे चित्रपटाचे अभ्यासक आहेत (किंवा म्हणवतात), किंवा ज्यांचा निर्मात्यांशी, माध्यम प्रायोजकांशी काहीच संबंध नाही, पण जे परीक्षण लिहीत आहेत, त्यांच्याकडून तरी ही अपेक्षा असावी की नको?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/10904
इकडे या चर्चा करायला.
<<सिनेमा आवडला नाही म्हणुन तो
<<सिनेमा आवडला नाही म्हणुन तो कळलाच नाही म्हणणे चुकीचे आहे... आणि सिनेमा आवडला म्हणुन तो खुप कळला म्हणणे हे ही चुकीचे आहे.... सिनेमा अनेक फॅक्टर्स मुळे आवडतो किंवा नाही आवडत.>> मोकिमी +१००००
चिनूक्स, काही मुद्दे पटणारे
चिनूक्स, काही मुद्दे पटणारे आहेत तुझे.
इथली सारी परीक्षणे जाम
इथली सारी परीक्षणे जाम कन्फ्यूज करतात राव
एक वाईट तर एक छान
अन ते ही अगदी टोकाची वाईट अन टोकाची छान
काही ठरवून गेम होतो की ज्याची त्याची आवड
ट्रेलर छान वाटला सिनेमाचा, पण मराठी चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघायची पद्धत नसल्याने जेव्हा केबलवर लागेल तेव्हा नक्की दोन तास सवड काढून बघणार हे नक्की.
श्यामली छान लिहिलयसं
श्यामली छान लिहिलयसं .
चिनुक्स , भुंगा , मोकिमी बरचसं पटलं.
<<<माझ्या मते, सिनेमाबद्दल वाचणारे, सिनेमापेक्षा, त्याच्या वर्णनामधल्या रंजकतेला अधिक प्राधान्य देऊन वाचतात.
आणि पॉझिटिव्हपेक्षा टर उडवणारे/टिप्पणी करणारे/ विनोदी अंगाने जाणार्या लिखाणाला अधिक वाचक लाभत असल्यामुळे तशाच प्रकारचे लिहिण्याकडे लेखकाचा कल वाढतो..>>> आंनदयात्री , हल्ली ह्या धाटणीचचं परीक्षण जास्त करुन बघायला मिळतं. बर्याचजणांकडे सिनेमा बघण्याच्या आधीच मजकुर तयार असतो, फक्त मध्ये मध्ये कथेची पेरणी केलेली असते असा संशय येतो ते परिक्षण वाचताना.
ही गोष्ट चित्रपट म्हणुन का
ही गोष्ट चित्रपट म्हणुन का काढली? चित्रपट या माध्यमाचा काय आणि कसा उपयोग करुन घेतला?
माझ्या मते तर हे नाटक आहे, फक्त शूट केले आहे. जर हेच करायचे होते तर टीवी वर २ तासाचे एक छोटे नाटक का नाही केले म्हणजे वेगवेगळ्या घरात शूटींग करता आले असते.
मराठी दिग्दर्शकांना चित्रपट हे काय माध्यम आहे हेच कळले नाहीये हे पुन्हा एकदा दाखवुन दिले.
जर कुठलाही सिनेमा बघुन तुम्हाला कथा चांगली होती आणि संवाद चांगले होते असे पहिल्यांदी वाटले तर ते दिग्दर्शकाचे failure आहे. आणि दिग्दर्शकाला चित्रपट माध्यमाचा आवाका कळला नाहिये असे दिसते.
'सिनेमा कसा बघावा?' या
'सिनेमा कसा बघावा?'
या प्रश्नाचा खूप विपर्यास केलेला दिसतोय. असो.
प्रसाद, तुम्हाला चित्रपट आणि
प्रसाद, तुम्हाला चित्रपट आणि नाटक यामधला फरक माहित आहे का?
तुम्ही वर उल्लेखलेला चित्रपट पाहिलेला आहे का? असल्यास तुमचे सविस्तर परीक्षण वाचायला आवडेल.
प्रसाद, तुम्हाला चित्रपट आणि
प्रसाद, तुम्हाला चित्रपट आणि नाटक यामधला फरक माहित आहे का?>> माहिती आहे. खरे तर इतका फरक आहे की लिहिता पण येणार नाही. दोन्ही मधे एक कथा असते आणि अभिनेते त्यातली पात्र रंगवतात ह्या दोन common गोष्टी सोडुन काहीच साम्य नाहीये.
तुम्ही वर उल्लेखलेला चित्रपट पाहिलेला आहे का? असल्यास तुमचे सविस्तर परीक्षण वाचायला आवडेल.>> हा चित्रपट मी पाहिला आहे. पण चित्रपट परिक्षण म्हणजे त्याच्या कथेचे परिक्षण नाही. किंवा कथा सांगणे किंवा त्याचा अर्थ लावणे हे पण नाही. कथेबद्दल स्वतंत्र परिक्षण होऊ शकते पण ते चित्रपटाचे परिक्षण नसेल. चित्रपट हे मुख्यता दिग्दर्शकाचे माध्यम आहे, त्यामुळे चित्रपटाचे परिक्षण म्हणजे तो कसा दिग्दर्शीत केला आहे त्याचे परिक्षण असणे अपेक्षीत आहे. त्या माध्यमाच्या ज्या शक्यता आहेत त्या कश्या वापरल्या आहेत, ह्याचे परिक्षण होणे गरजेचे आहे.
हे जे काही टीवी वरच्या दिर्घांका सारखे तयार केले आहे, त्याला चित्रपट म्हणणेच मला फारसे पसंत नाही. तर त्याच्या बद्दल काय लिहीणार?
कथे बद्दल , त्यातल्या पात्रांच्या बद्दल नक्कीच चर्चा होऊ शकेल पण ते कथे चे परिक्षण असेल हे लक्षात घ्या.
मी पूर्वी माबो वर २-३
मी पूर्वी माबो वर २-३ चित्रपटांबद्दल लिहिले होते. ते फारसे परिक्षणात्मक नव्हते. खरे तर चित्रपट ही अनुभवण्याची गोष्ट आहे त्यामुळे त्यावर काय लिहिणार. फक्त मला आवडलेले चित्रपट कोणते ते सांगू शकतो आणि काय आवडले ते सांगू शकतो.
हे बघा.
http://www.maayboli.com/node/38200
ह्यावर लोकांनी गोष्ट जरा जास्त detail मधे सांगा अश्या type च्या comments दिल्या. गोष्ट सांगणे हा हेतू च नव्हता माझा. खरे तर काही अतिशय सुंदर सिनेमांच्या गोष्टी छोट्या होत्या.
प्रसादजी.... +१ तुमचा वरचा
प्रसादजी.... +१
तुमचा वरचा धागा अतिषय उत्कॄष्ट होता.... त्यात अजुन अॅडीशन होउ द्यात....
श्यामली, छान लिहिलंस.
श्यामली, छान लिहिलंस.
चिन्मय, पोस्ट्स (विशेषतः पहिल्या पानावरच्या) आवडल्या. अनुमोदन.
तू पिफ मधल्या सिनेम्यांबद्दल कधीचंच लिहितो आहेस, ते लिही प्लीज. परागच्या बाफावर किंवा स्वतंत्र धागा काढून विस्तृत लिही.
श्यामली, छान लिहिलंस. कालच
श्यामली, छान लिहिलंस.
कालच हा सिनेमा पाहिला. मला आवडला. अतुल as always छान, सागरिका ने साकारलेली सोनल पण आवडली. मला तिचे उच्चारण नाही खटकले. मुळात मला ती सध्याच्या convent medium मध्ये शिकलेल्या व मराठी फक्त व्यवहारापुरते बोलणार्या तरुण/तरुणी सारखी वाटली. माझी मुलगी पण असेच मराठी बोलते (हे मी फार कौतुकाने बोलत नाही आहे पण सत्य कथन करतेय).
थोडक्यात, मला ही साधी, सोपी प्रेमाची गोष्ट आवडली.
काल पाहिला. आवडलाच. अतूल
काल पाहिला. आवडलाच. अतूल कुलकर्णी बेष्ट.
सोनलचे मराठी उच्चार खटकले.
प्रसाद१९७१ +१ तुम्ही म्हणताय
प्रसाद१९७१ +१
तुम्ही म्हणताय तीच गोष्ट ' बदाम राणी गुलाम चोर ' बघताना जाणवली होती.'माकडाच्या हाती शँपेन ' बघितलेले असल्याने सिनेमात नाटकाचेच शूटिंग वेगळे कलाकार व संवाद वाढवून केल्यासारखे वाटले होते.
Pages