आरती गझलकाराची

Submitted by राजे विडंबनश्री on 1 February, 2013 - 05:45

दुर्गुणात्मक दुर्गूणी गझला या आणा
जमली नाही तर ती कविता हे जाणा
येता-जाता शब्द सुचले ते हाणा
भरभर टाका आता कवितेचा घाणा
जयदेवा जयदेवा जयजय कविवर्या
खांद्यापासूनी नमतो तव कार्या, जयदेवा जयदेवा ॥

अंतर्बाह्य तूच आहेस श्रेष्ठ
अभाग्यासी कैसी कळेल ही गोष्ट
गझला लिहिण्याचा वळवळतो जंत
रसिकांचा याने पाहिलासे अंत
जयदेवा जयदेवा जयजय कविवर्या
खांद्यापासूनी नमतो तव कार्या, जयदेवा जयदेवा ॥

गझला लिहिण्याचा तू विडा घेतला
इतरांनी साष्टांग "प्रतिसाद" केला
प्रसन्न होउनीया मोठा जाहला
जन्मोजन्मी पीडा देऊन गेला
जयदेवा जयदेवा जयजय कविवर्या
खांद्यापासूनी नमतो तव कार्या, जयदेवा जयदेवा ॥

गझला करताना हे लागते ध्यान
लिहिले काय त्याचे उरते ना भान
मी-तू लिहिल्याने गझलेला मान
'राजे'ला संधी ही पकडाया कान
जयदेवा जयदेवा जयजय कविवर्या
खांद्यापासूनी नमतो तव कार्या, जयदेवा जयदेवा ॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Rofl

Happy
Wink
:-/
:-|
Lol

ग्रेट् !!

दत्तात्रेयाची आरती ना मूळची ?
त्यांची किमान माफी अवश्य मागा जमली तर ! मला आपलं वाट्लं ते सांगीतलं

व्वा. काव्य म्हणून खरंच चांगलं आहे, Wink
----------------
स्वगत - राजे विडंबनश्री हा कुणाचा डु आय असावा बरे? मात्र हा व्यक्ती गेयतेचा जाणकार कवी आणि उपटसूंभ स्वनामधन्य गझलकारांचा विरोधक असावा, हे स्पष्टपणे जाणवते. Happy

आणी हो वैभव यांनी सांगीतल्याप्रमाणे दत्तगुरुंची क्षमा मागायला हवी होती आधी. कारण नेमकी मूळ आरतीच ओठात आणी मनात येते आधी.