विनोदी कथा सादरीकरण

Submitted by बेफ़िकीर on 1 February, 2013 - 01:15

मॉडर्न कॉलेज मराठी विभाग आयोजीत व पुणे विद्यापीठ पुरस्कृत:

मराठी विनोदी कथा: स्वरूप आणि सादरीकरण

या राज्यस्तरीय चर्चासत्रात, मंगळवार दिनांक ५ फेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी २.३० ते ४.०० या दरम्यान निवडक विनोदी कथांचे मुक्त सादरीकरण हा कार्यक्रम आहे.

वक्ते:

स्वाती महाळंक
भूषण कटककर
वैशाली मोहिते व इतर

स्थळ - मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय

(हे चर्चासत्र दिनांक चार व पाच असे दोन दिवस असून यात विनोदी कथांचे स्वरूप, विनोदी कथांचे लेखन, रंगमंचीय सादरीकरण हेही उपक्रम समाविष्ट आहेत)

रस असल्यास व शक्य असल्यास जरूर यावे.

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नताशा | 1 February, 2013 - 18:05 नवीन
बेफिकीर, मला तुमचं लेखन मुळात अजिबात विनोदी वाटत नाही (जे विनोदी म्हणून लिहिलं असतं ते ). परखड मत. क्षमस्व.<<<

आवडेल असे लिहिता येईल का हे बघायचा प्रयत्न करतो. परखड व प्रामाणिक अभिप्रायासाठी खरंच आभार!

विषय आला आहेच तर, कृपया थोडासा अधिक वेळ देऊन एक वाचक / श्रोता म्हणून विनोदी कथेकडून तुमच्या अपेक्षा कश्या आहेत ते लिहिता का? मला उपयोग होईल. Happy

अर्थात, हसू येणे ही अपेक्षा मान्यच आहे, पण तरी थोडेसे विस्तृत लिहिलेत तर बरे होईल.

सर्वांचे शुभेच्छांसाठी आभार!

>>>पेशवा | 3 February, 2013 - 03:37
राज्यस्तरिय म्हणजे काय ? पुर्स्क्रुत ़करताना पात्रतेच्या काय अटी असतात़ का ?<<<

पेशवा, या दोन लिंक्स आहेत, तेवढीच माहिती माझ्याकडे आहे.

http://moderncollegepune.com/Nimantranpatrica9-1-2013.pdf

http://moderncollegepune.com/Nimantranpatrica9-1-2013%20-1.pdf

धन्यवाद Happy