प्रवेशिका - ४० ( ashwini_k - तुझे खुले केस... )

Submitted by kaaryashaaLaa on 13 October, 2008 - 23:39


तुझे खुले केस भारणारा सुगंध या मारव्यास नाही
तुझ्या बटांचा मुजोर झोका, टपोर गोर्‍या फुलास नाही

तुझीच चाहूल जाणवावी, उधाण या भावनांस यावे
पुन्हा पुन्हा झेप घेत आहे, लगाम माझ्या मनास नाही

लपेटले श्याम मेघ ओले, दुखावल्या जेथ रानवेली
भिजून जातील पायवाटा, अता सुका हा प्रवास नाही

सडा उफाळेल केशराचा, दिसेल प्राचीस थांब थोडे,
पहाट वार्‍यातली कटारी, फिरून ह्या काळजास नाही

तुझ्यासवे खेळताच होळी अबोल होईल बोलणारे
लपून ये ! भेटण्यास रानी, जिथे कुणी आसपास नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला प्रयत्न. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या... चालीवर म्हणता येतंय.

चांगली आहे.
माझ्या मते ६ गुण.
-सतीश

५ गुण..

मस्त जमलिये फक्त तो मिटरमधे बसवण्याचा प्रयत्न खटकतो. (जेथ, अता)

तुझीच चाहूल जाणवावी, उधाण या भावनांस यावे
पुन्हा पुन्हा झेप घेत आहे, लगाम माझ्या मनास नाही

छान! आवडला.

लपेटले श्याम मेघ ओले, दुखावल्या जेथ रानवेली
भिजून जातील पायवाटा, अता सुका हा प्रवास नाही
छान..
माझे ५
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

सुन्दर हळवी गझल

८ गुण

गुण ७
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....