प्रवेशिका - ३९ ( mi_anandyatri - मी कुणा पटलोच नाही... )

Submitted by kaaryashaaLaa on 13 October, 2008 - 23:36

मी कुणा पटलोच नाही
की खरा कळलोच नाही?

मी कसा हे दाखवाया
अंतरी शिरलोच नाही

ते तिचे नसणार डोळे
मी जिथे दिसलोच नाही

जिंकण्याचा अर्थ कळला
मग कधी हरलोच नाही

संपली माझी गरज अन्‌
मी कुणा स्मरलोच नाही

मरणही ध्यानी रहावे
मी असा जगलोच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह... छोट्या बहरातील सुंदर गजल! अगदी सहज उतरलीये!
मतला... PERFECT!! हरलोच.. खास!
शेवटचा शेरही जमून गेलाय.
(छोट्या बहरामुळे गजल 'पुलस्ति'चीच असावी अशी शंका डोकावून गेली मनात :))

मरणही ध्यानी रहावे
मी असा जगलोच नाही

हे आवडलं.
छान गझल.

मी जिथे दिसलोच नाही; मग कधी हरलोच नाही ; मी कुणा स्मरलोच नाही

हे तिन छान आहेत

६ गुण

मस्तच जमलिये.. माझे ७ गुण..

छान! मतला आणि हरलोच हे शेर फार आवडले.
माझे - ६.

छान आहेत छोटे छोटे शेर.. Happy
"मी कुणा पटलोच नाही" वाचून वाटलं काहितरी "यो' गझल आह का काय.. Proud

jokes apart.. माझ्याकडून ६ गुण..

"मी कसा हे दाखवाया
अंतरी शिरलोच नाही"

क्या बात है!!
८ गुण..

जिंकण्याचा अर्थ कळला
मग कधी हरलोच नाही

मस्त! खूप आवडला हा शेर!

गुण ६
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....