मनाचा नादच खुळा....."©मंदार खरे"!!!

Submitted by मंदार खरे on 30 January, 2013 - 04:20

मनं पुढं पुढं जातं
नाही दावणीला येतं
अश्‍व वेगानं पळ्तं
वारा काना गेल्यागतं

मन विक्षिप्त ते किती
खेटरापाशी प्रेम करी
डोळ्या देखल जिव देण्यार्‍याच्या
प्रिती नाही याच्यी उरी

मन किती ते अस्थिर
आभाळातल्या पतंगा परी
गटांगळ्या वरती खालती
हेलकावत जाई दूरी

मन खोल नि अथांग
नाही रुंदी यास पोत
कळला म्हणता म्हणता
नवखा अजूनच होतं

मना नाही या उतारा
विषारी सर्प तो बरा
मन वाटे सरड्यासम
रंग बदले भरा भरा

मन गुंतागुंतीचा गोळा
व्यर्थ सोडवण्याचा चाळा
मनाचा नादच खुळा
मनाचा नादच खुळा!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहिणाबाईंच्या मन वढाय वढाय चे आधुनिक व्हर्जन लिहून काय साध्य करायचे आहे आपल्याला? शिवाय त्यात 'नादखुळा' हे कोल्हापूरी विशेषण योजण्याचे प्रयोजन काय?

बरोबर आहे......बहिणाबाईंच्या मन वढाय वढाय चे आधुनिक व्हर्जन म्हणू शकाल

लिहून काय साध्य करायचे आहे आपल्याला?

साध्य काहीच नाही करायचे सुचले म्हणून लिहले........

शिवाय त्यात 'नादखुळा' हे कोल्हापूरी विशेषण योजण्याचे प्रयोजन काय?

फक्त यमक म्हणून प्रांताचा विचार नव्हता केल

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद