गाय

Submitted by तिलकधारी on 29 January, 2013 - 23:59

तुझ्या मोहापायी घेती भेट कसायाची गाई
नको मांस खाऊ भाऊ इथे किती हिरवाई

गाय शेण देते त्याचा थर शुद्ध करे घर
गाय हंबरते तेव्हा फुटे देवाला पाझर
जरा गोमुत्र शिंपड घरासह मनावर
तिच्या दुधावर वाढे तुझे बाळ झरझर

अश्या माउलीला घाल रोज थोडे चारापाणी
तिला शिवून नमून म्हण कृपा कर राणी
तिच्या जीवावर चाले इथे संसार तिघांचा
तुझ्या वहाणा व्हायला गाय चाले अनवाणी

तुझ्या मोहापायी घेती भेट कसायाची गाई
नको मांस खाऊ भाऊ इथे किती हिरवाई

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह तिलकधारी

जाम आवडली

तुमची फार वाट पाहत होते मायबोलीकर आता आला हे पाहून मला फार आनंद होत आहे

>>तुमची फार वाट पाहत होते मायबोलीकर आता आला हे पाहून मला फार आनंद होत आहे
काहीपण ? कोण हे तिलकधारी ? आणि माबोकर त्यांची वाट कशाला पहातील ? Uhoh

तिलकधारीकाका,

नमस्कार आणि स्वागत.

आपल्या स्वभावाला अनुसरून काव्य शब्दाशब्दांतून ओसंडत आहे.

आपल्या स्वभावाला अनुसरून काव्य शब्दाशब्दांतून ओसंडत आहे. Lol
जपून हो अजुन कसले कसले धारी येतील इकडे शब्दांना धार लावत.

>>वाट पाहात होतोच.... अजूनही पाहातोय.. तुमच्या सक्रीय सहभागाची !
अर्रे, कमाल आहे, कोण आहे ही महान व्यक्ती की ज्याची काही जण वाट पहात होते ? Uhoh
जे वाट पहात होते त्यांच्या कॉमन ओळखीची व्यक्ती आलेली आहे असे दिसते.
की कोणी प्रसिद्ध कवी तर नाही ना आला ?? Uhoh

@महेश भाऊ,

कवी तिलकधारी हे अपरान्त साहित्य मंडळाचे पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी-लेखक व समीक्षक आहेत.... माझ्या माहितीप्रमाणे.

वाह !

Happy

गाय हंबरते तेव्हा फुटे देवाला पाझर, तुझ्या वहाणा व्हायला गाय चाले अनवाणी
नवीन माहिती मिळाली. धन्यवाद .