Submitted by तिलकधारी on 29 January, 2013 - 23:59
तुझ्या मोहापायी घेती भेट कसायाची गाई
नको मांस खाऊ भाऊ इथे किती हिरवाई
गाय शेण देते त्याचा थर शुद्ध करे घर
गाय हंबरते तेव्हा फुटे देवाला पाझर
जरा गोमुत्र शिंपड घरासह मनावर
तिच्या दुधावर वाढे तुझे बाळ झरझर
अश्या माउलीला घाल रोज थोडे चारापाणी
तिला शिवून नमून म्हण कृपा कर राणी
तिच्या जीवावर चाले इथे संसार तिघांचा
तुझ्या वहाणा व्हायला गाय चाले अनवाणी
तुझ्या मोहापायी घेती भेट कसायाची गाई
नको मांस खाऊ भाऊ इथे किती हिरवाई
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वागत तिलकधारी. चांगलीच आहे
स्वागत तिलकधारी.
चांगलीच आहे कि कविता.
हम्म्म्म्मा !!! चांगली आहे
हम्म्म्म्मा !!!
चांगली आहे कविता, पण येथे जोरदार प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाह तिलकधारी जाम आवडली
वाह तिलकधारी
जाम आवडली
तुमची फार वाट पाहत होते मायबोलीकर आता आला हे पाहून मला फार आनंद होत आहे
>>तुमची फार वाट पाहत होते
>>तुमची फार वाट पाहत होते मायबोलीकर आता आला हे पाहून मला फार आनंद होत आहे
काहीपण ? कोण हे तिलकधारी ? आणि माबोकर त्यांची वाट कशाला पहातील ?
सुंदर कविता.
सुंदर कविता.
कविता फार आवडली.
कविता फार आवडली.
तिलकधारीकाका, नमस्कार आणि
तिलकधारीकाका,
नमस्कार आणि स्वागत.
आपल्या स्वभावाला अनुसरून काव्य शब्दाशब्दांतून ओसंडत आहे.
आपल्या स्वभावाला अनुसरून
आपल्या स्वभावाला अनुसरून काव्य शब्दाशब्दांतून ओसंडत आहे.
जपून हो अजुन कसले कसले धारी येतील इकडे शब्दांना धार लावत.
वैवकु आणि कणखरजींना अनुमोदन
वैवकु आणि कणखरजींना अनुमोदन !!
स्वागत आहे !
वाट पाहात होतोच.... अजूनही पाहातोय.. तुमच्या सक्रीय सहभागाची !
'गायी'चे रुपक बहुतेक मला
'गायी'चे रुपक बहुतेक मला समजले आहे..
>>वाट पाहात होतोच.... अजूनही
>>वाट पाहात होतोच.... अजूनही पाहातोय.. तुमच्या सक्रीय सहभागाची !
अर्रे, कमाल आहे, कोण आहे ही महान व्यक्ती की ज्याची काही जण वाट पहात होते ?
जे वाट पहात होते त्यांच्या कॉमन ओळखीची व्यक्ती आलेली आहे असे दिसते.
की कोणी प्रसिद्ध कवी तर नाही ना आला ??
@महेश भाऊ, कवी तिलकधारी हे
@महेश भाऊ,
कवी तिलकधारी हे अपरान्त साहित्य मंडळाचे पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी-लेखक व समीक्षक आहेत.... माझ्या माहितीप्रमाणे.
ओह, माहितीबद्दल धन्यवाद
ओह, माहितीबद्दल धन्यवाद !
(स्वगत : पण हे अपरान्त साहित्य मंडळ काय आहे ?)
काका, मस्तच लिहिलीत......
काका, मस्तच लिहिलीत......
सु-स्वा-ग-त-म
सु-स्वा-ग-त-म
वाह !
वाह !
गाय हंबरते तेव्हा फुटे देवाला
गाय हंबरते तेव्हा फुटे देवाला पाझर, तुझ्या वहाणा व्हायला गाय चाले अनवाणी
नवीन माहिती मिळाली. धन्यवाद .
गोरक्षा कार्यासाठी ही कविता
गोरक्षा कार्यासाठी ही कविता नक्कीच उपयोगी होईल असे वाटते....
खूप आवडली...