पुरुषार्थ -

Submitted by विदेश on 26 January, 2013 - 07:10

किती जणांचा धावा केला
कुणी न तेव्हां धावत आला

किती दमले मी टाहो फोडुन
रडले कुढत अपुल्याच मनातुन

जपण्याचा मी प्रयत्न केला
शीलाच्या माझ्या ठेव्याला

दुर्दैवाचा घाला पडला
नशिबी दुर्योधन धडपडला

जगास फुटला नाही पान्हा
धावत नाही आला कान्हा

सुन्न-खिन्न टाकून मी मान
पुरुषार्थाचा बघत अपमान !

. . .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली रचना...

*** दुर्योधनाच्या ऐवजी दु:शासन करा.