पद्म पुरस्कार २०१३ : सध्या निकष काय आहेत ?

Submitted by असो on 25 January, 2013 - 22:39

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार मिळालेल्यांची ही संपूर्ण यादी.
http://zeenews.india.com/news/nation/padma-awards-full-list-of-winners_8...

सर्वांचे अभिनंदन !

पुरस्कारांचे निकष काय असतात / असावेत यावर इथे चर्चा करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@असो
पद्म पुरस्कारासंदर्भात दक्षिणेच्या बाबत खरोखरीच डावेउजवे झालेय का कसे हे कळायला मार्ग नाही. पण असे झाले असल्यास भावना दुखावणे समजू शकते. अशा वेळी पुरस्कार नाकारणे हा निषेधाचा मार्ग असू शकतो. पण वैयक्तिक कारणासाठी इतका मोठा पुरस्कार नाकारला गेला असल्यास खेदाची बाब आहे हे मान्य करावे लागेल.
<<
भावना दुखावल्या गेल्यावर म्हणा कि आणखी काही कारणाने म्हणा, सर्वांना हवा हवासा असणारा गौरव एखादा कलाकार नाकारतो त्यावेळी स्वताच्या त्या निर्णयाचे ग्लोरिफिकेशन करण्यात तो [त्याच्या कलेत कितीही उच्च कोटीचा असला तरी] तरबेज असेलच असे नाही. त्यामुळे त्याने दिलेल्या कारणांवरूनच केवळ निष्कर्ष काढणे आणि दुषणे देणे हे त्याच्यावर नकळत अन्याय करणारे होऊ शकते असे मला वाटते.
"दाक्षिणात्य कलाकारांच्या बाबत पक्षपात केला जातो म्हणून मी ....." हे शब्द वापरून तेच कृत्य केले असते तर पहा चर्चा कशी व्यापक पातळीवर गेली असती. वैयक्तिक आरोपांऐवजी खरेच असे होते आहे का याचा जमाखर्च मांडून चर्चा झाली असती. पण बहुतेक कलाकार [राजकीय नेत्यांसारखे] या बाबतीत तरबेज थोडेच असणार?

पद्म पुरस्कारांबाबत, ही पदवी नावामागे सरसहा लावून मिरवता येत नाही असे ऐकले आहे.. कुणी जाणकार खुलासा करेल काय?

मनीषा....

अगदी योग्य ऐकले आहे तुम्ही.

"पद्म" पुरस्काराच्या संदर्भातील मार्गदर्शकपर तत्वे सरळसरळ उल्लेख करतात की, ज्या व्यक्तीला कोणत्याही दर्जाचा पद्म पुरस्कार मिळाला असला तरी ती व्यक्ती
(१) लेटर पॅड,
(२) उद्योगाची प्रोप्रायटरशिप,
(३) नावाचा रबरी स्टॅम्प,
(४) व्हिजिटिंग कार्डस
(५) सी.व्ही.
(६) जाहिरात.....

... या कारणासाठी आपल्या नावामागे किंवा नावानंतर [ इंग्रजी तर्जुम्यात Prefix and Suffix या संज्ञा वापरल्या गेल्या आहेत] मिळालेले 'पद्म' पुरस्कार उल्लेख करू शकत नाही.

.... इतकेच काय पण स्वतःच्या घराच्या/बंगल्याच्या बाहेर नावाची जी पाटी लावली जाते तिथेही 'पद्म' चा उल्लेख करता येत नाही.

असे कुणी केल्याचे आढळल्यास आणि ते संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात योग्य त्या अर्जाद्वारे कळविल्यास जिल्हाधिकारी त्या संदर्भात केन्द्र सरकारच्या योग्य त्या अधिकार्‍याला कळवतील आणि मग तक्रारीत तथ्य आढळल्यास प्रथम त्या 'पद्म' पुरस्कार सन्मानित व्यक्तीस २१ दिवसांची मुदत देवून उल्लेखित कागदपत्रे नष्ट करण्यास सांगेल. तसे न झाल्यास पुन्हा एक सूचना देवून तो पद्म पुरस्कार सरकारकडून काढून घेण्यात येईल.....अशा सूचना आहेत.

अशोक पाटील

अशोक,

... या कारणासाठी आपल्या नावामागे किंवा नावानंतर [ इंग्रजी तर्जुम्यात Prefix and Suffix या संज्ञा वापरल्या गेल्या आहेत] मिळालेले 'पद्म' पुरस्कार उल्लेख करू शकत नाही.

पण ह्याचे कारण काय?

यंदा डॉ. अजय सूद, प्रा. फाटक, कल्पना सरोज ही तीन नावं पद्म पुरस्कारविजेत्यांच्या यादीत वाचून अतिशय आनंद झाला. दरवर्षी विज्ञानतंत्रज्ञानक्षेत्रातली काही नावं वाचून आश्चर्य वाटतं. यंदाची यादी एकदम चोख. डॉ. अनिल काकोडकर निवडसमितीत असल्याचा परिणाम असावा.
कल्पना सरोज या उद्योजिकेचा प्रवासही थक्क करणारा आहे. त्यांना पद्मश्री मिळाली, हे अतिशय योग्य.

ज्या व्यक्ती 'पद्म' सन्मानाचा वापर आपल्या नावामागे करतात त्यासंबंधी वर काही प्रतिसादात विचारणा करण्यात आली आहे.

त्याच्या अनुषंगाने ~~

आपण सर्वांनी एक बाब लक्षात घेणे फार गरजेचे आहे ती म्हणजे कायद्याच्या भाषेत Rules आणि Guidelines यांच्यात खूप अंतर आहे. पहिली बाब पाळली नाही तर तो कायद्याचा अवमान होतो आणि तसा तो करणार्‍या व्यक्तीला/व्यक्तींना/संस्थेला योग्य त्या कलमांच्या आधारे जाब विचारता येतो. दुसर्‍या बाबीत कायदा लक्ष घालत नाही [किंबहुना तशी तरतूदही नाही] कारण 'मार्गदर्शनपर तत्वे' म्हणजे नागरिकांनी स्वतः होऊन काही 'सामाजिक संकेत' पाळले पाहिजेत असा सूर असतो. उदा. पादचार्‍यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. हा एक संकेत आहे, पण तो पाळला {च} जातो असे कधीकधी घडत नाही. पान खाऊन रस्त्यावर थुंकू नये, हेल्मेट घालून टू व्हीलर चालवावी....अशी अनेक उदाहरणे या संदर्भात देता येतील. पाळले तर ठीक, नाही पाळले तर कायदा काही करत नसल्याने त्रयस्थाने त्या घटनांकडे मुकाट पाहाणे इतपतच सर्वसामान्य नागरिकाच्या हाती असते.

'पद्म' पुरस्काराबाबतचे संकेत 'मार्गदर्शनपर तत्व प्रणाली' त येत असल्याने जे ते पाळतात त्यांच्याविषयी आदराने बोलले पाहिजे, पण जे बिनदिक्कत 'पद्म' चा वापर आपल्या नावामागे करतात, त्यांच्या संदर्भात कारवाई करायची झाल्यास ती कोण करणार हा प्रश्न नसून, केल्यानंतर त्यांच्याकडून असाही खुलासा होऊ शकतो की 'मी तो सन्मान पत्रिकेत छापण्याची सूचना दिली नव्हती. संयोजकानीच प्रमुख पाहुणे पद्मश्री अबक असे छापले, त्याला माझा नाईलाज आहे....' असा खुलासा केला जातो.....[कोल्हापूरातील हे उदाहरण प्रत्यक्षातील आहे. एका स्वातंत्र्यसैनिकाने गावातील शाळेच्या स्नेहसंमलेनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविलेल्या व्यक्तीचे नाव पत्रिकेत 'पद्मश्री डॉ.....' असे का छापले? अशी विचारणा शाळेच्या मुख्याध्यापिकेला आणि संचालक मंडळाला लेखी केली होती.... ती मंडळी यातील काहीच संकेत माहीत नसल्याने गोंधळून गेली. पुढे ते प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर त्या 'पद्म' व्यक्तीने लेखी खुलासा जिल्हाधिकार्‍यांना दिला....अर्थात तो मान्य झाला. काहीही निष्पण्ण झाले नाही. मधल्यामध्ये त्या स्वातंत्र्यसैनिकाचीच दोनतीन कार्यालयाच्या चकरा मारताना फरफट झाली.]

मी नताशा विचारतात "...पण याचे कारण काय ?"

याचे एकच कारण म्हणजे 'पद्म' पुरस्कार याचा अर्थ समाजाने तुमच्या कार्याची नोंद घेतली आणि त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. बस्स इतपतच. त्या सन्मानाच्या आधारे तुम्ही कसलीही सवलत मागू शकत नाही, किंबहुना लेटर पॅडवर 'तो' उल्लेख करून तुम्ही शासकीय कार्यालयात 'इमोशनल प्रेशर' आणू शकत नाही. 'माझ्या कॉलनीत गेला आठवडा पाणी पुरवठा योग्यरितीने झालेला नाही...' अशी तक्रार जर एखाद्या 'पद्मश्री' व्यक्तीने तसा उल्लेख असलेल्या लेटरपॅडवरून कार्पोरेशनला केली तर ती यंत्रणा नक्कीच जागी होईल. पण मग शहरातील अन्य भागाच्या अपुर्‍या पाणीपुरवठ्याचा प्रश्न तसाच राहील. एवढ्यासाठी सर्व नागरिकांना अशा सिव्हिल प्रॉब्लेम्सबाबत समान न्याय असला पाहिजे म्हणून पुरस्काराचा उल्लेख असलेली कागदपत्रे वापरता येत नाहीत.

बाकी पद्म पात्रांना एक रुपयाचाही आर्थिक लाभ दिला जात नाही, हे वर आले आहेच.

अशोक पाटील

अशोक जी धन्यवाद, सविस्तर माहितीबद्दल.

महेश - ते बहुधा विठ्ठलराव विखे पाटील व "ओरिजिनल" विखे पाटील यांच्यात फरक करण्यासाठी त्यांना पद्मश्री असे म्हणताना मी बर्‍याच जणांकडून ऐकले आहे :). त्यांचे एक पुस्तक वाचले होते साखर कारखान्याबद्दल, तेव्हा आवडले होते. नाव आठवत नाही.

Pages