गँग्ज ऑफ गझलपूर : एपिसोड १

Submitted by भुंगा on 25 January, 2013 - 00:10

कथानकातील पात्र, संकल्पना आणि घटना याचे प्रत्यक्ष घटनांशी आणि पात्रांशी दुरान्वयाचाही संबंध नाही.
ओघात आलेली काही नावे ही त्या क्षेत्रातलं त्यांचं "दखलपात्र काँट्रिब्युशन" असल्याने आलेली आहेत. निर्मितीसंस्था, लेखक दिग्दर्शक यास जबाबदार नाही. जबाबदारी दिली गेल्यास पुन्हा पुढचे एपिसोड लिहिण्यात येतील Proud

विशेष आभारः बेफिकीर, रणजीत, कणखर, आणि प्रसादपंत.

मान्यवर गझलकारांच्या यादीत बरीच नावं राहून गेली आहेत ते लेखकाचे तोकडे ज्ञान समजून सोडून द्यावे.

***************************************************************************************************************

विक्रम और वेताल..... विक्रम और वेताल...... विक्रम और वेताल...... विक्रम और वेताल

कांजूरमार्गच्या राजेश बारबाहेर एक रिक्षा कचकन ब्रेक मारून थांबली.... ब्रेकचा आवाज इतका जबरदस्त होता की आजुबाजुच्या सगळ्यांच्या नजरा त्या रिक्षावर खिळल्या आणि क्षणाचाही विलंब न लावता लगबगीने त्या रिक्षातून विक्रमादित्य बाहेर पडला......

राजेश बार...!!!! वेताळाचा रोजचा बसायचा अडडा. विक्रमादित्याने मौन सोडले की वेताळ उडून थेट राजेशमध्ये येऊन बसायचा....... आता पुन्हा कोणते प्रश्न विचारून विक्रमादित्याला नामोहरम करू या विचारात बुडून गेलेला असायचा.... दारूत... ते थेट पुन्हा विक्रम त्याला न्यायला येईपर्यंत तिथेच........ !
नाही म्हणायला बार बंद असायच्या वेळेत बायकापोरांना तोंड दाखवून यायचा..... पण आपलं तोंडदेखलंच.

आज मनाचा निग्रह करून विक्रमादित्य तडक आत शिरला. वेताळाला शोधायचा प्रश्नच नव्हता. वेताळाचं टेबल ठरलेलं होतं. एका अंधार्‍या कोपर्‍यात मिणमिणत्या प्रकाशात बरोब्बर जिथे एसीचं पाणी ठिबकत असतं त्याखाली अभिषेक घेत वेताळ पसरलेला होता....... समोर एक बीअर आणि दोन ग्लास.

विक्रम थेट आत शिरला. "चल वेताळा, उगाच उशीर करू नकोस.... आपल्याला बरंच लांब जायचय. ही एकदाची लपाछपी मी यावेळी संपवून टाकणार आहे......
"बस रे... एक बीअर मार" वेताळ विक्रमाला म्हणाला...
"मी दारू सोडली वेताळा. यंदा संकल्प केलाय दारू न पिण्याचा"........
"ही अशी उत्तरं घरी बायकोला द्यायची विक्रमा...... इथे तू मला काय शेंड्या लावतोयेस" इति वेताळ.

"तू बर्‍या बोलाने नाही आलास तर तुझी गचांडी उचलून मला न्यावा लागेल..... आपले इतक्या वर्षाचे ऋणानुबंध आहेत म्हणून विनंती करतो आता चल पट्कन....." विक्रमाचा स्वर चढला....

"ओके विक्रमा..... चल. पण जाण्यापूर्वी तुला एक गोष्ट सांगायची आहे...... मला माहितेय की तू खरा विक्रम नाहियेस..... "

विक्रमाच्या चेहर्‍यावर छद्मी हास्य उमटलं...... "वेताळा मलाही कल्पना आहे की तू खरा वेताळ नाहीयेस ते... तू प्रसादपंतांचा ड्यूआयडी आहेस"

"हो आणि तू भुंग्याचा ड्युआयडी"...... वेताळ आणि विक्रम खदाखदा हसू लागले...

चल मग आता आपण एकमेकांना ईतके ओळखून आहोत तर आज एक नियम आपण शिथील करू...... आज जी कथा मी तुला सांगणार आहे ती ऐकतान तुला मौन बाळगायची गरज नाही.... तू बोलू शकतोस, आपली मतं मांडू शकतोस...... शेवटी मी तुला एक प्रश्न विचारेन त्यावर तुला योग्य आणि न्याय्य उत्तर द्यावं लागेल.....
जर तू उत्तर बरोबर दिलंस तर मी तुझ्या तावडीतून सुटून पुन्हा इथेच येईन आणि जर तुझं उत्तर चुकलं तर तुलाही माझ्याबरोबर राजेशमध्ये येऊन तुझा संकल्प तोडावा लागेल.

ओके वेताळा डन..... आता निघूया.

विक्रमाने वेताळाला खांद्यावर घेतलं आणि हळूहळू मर्गक्रमण सुरू केलं.

***************************************************************************************************************

पाठुंगळीवर बसलेल्या वेताळाने बोलायला सुरुवात केली.
"विक्रमा, आज मी तुला एक कथा सांगणार आहे एका गावाची. तिथल्या रसिकजनांची आणि तिथे ओढवलेल्या संकटाची..... ठरल्याप्रमाणे तुला शेवटी मी एक प्रश्न विचारेन... त्याचे योग्य उत्तर तुला द्यायचं आहे हे लक्षात ठेव.
आज फक्त मी तुला कथा नाही सांगणार तर तुला थेट त्या गावातच घेऊन जाणार आहे फेरफटका मारायला....
फार पूर्वी आपणही या गावात फिरलो आहोत..... बघ तुला सगळं आठवतेय का ते...."

"ह्म्म्म्म ..... वेताळा . तुझं नमनाला घडाभर तेल नकोय...... काय ते सुरू कर लवकर"

वेताळाच्या सांगण्यावरून विक्रमाने डोळे मिटले आणि ते थेट एका गावाच्या चावडीवर जाऊन पोचले. गावातले सर्व लोक आज इथे जमले होते... काहीतरी महत्वाच्या विषयावर इथे चर्चा चालू असावी.... लगबगीने बायका पुरुष जमा होत होते..... मुख्य पारावर काही मातब्बर मंडळी खूर्चीवर बसलेली होती, इतरही मंडळी इतरत्र विखुरलेली दिसत होती.

"विक्रमा, हे गझलपूर. इथे कणाकणात गझल पिकते. इथल्या वार्‍यात गझल आहे, खळाळत्या पाण्यात गझल आहे, झाडामाडात गझल आहे, लहानथोरात गझल आहे. फुटणार्‍या एका कोंबापासून ते वठणार्‍या जीर्ण वृक्षापर्यंत इथे गझलच गझल आहे.... असं हे गझलपूर."

"वेताळा, पूर्वी इथे गल्लीबोळात आपण दोघे हिंडल्याफिरल्याचं आठवतेय मला.... हल्लीच जरा येणं कमी झालय.
त्यामुळे बहुधा आता आपल्याला इथे कोणीही ओळखणार नाही. आणि मलाही कोणाला ओळखणं कठीणच आहे"
विक्रम काहीसा भावूक झाला.

"फिकर नॉट बडे.... ये छोटा किस काम आयेगा फिर... मै हूं ना... ये तुला सगळ्यांची आज ओळखच करून देतो." वेताळाच्या अंगात जणू स्फूर्ती संचारली.... त्याने खांद्यावरून टूणकन खाली उडी मारली.

"हे बघ विक्रमा, हे आज जे इथे जमलेत ते सगळेच मान्यवर, दिग्गज, नवशिके असे गझलकार आहेत. अगदी अजयरावांपासून ते ज्ञानेश, अनंत, कैलास, समीर, कणखर, श्याम, निशिकांत अशी भली मोठी लिस्ट आहे.... त्यांच्यामागोमाग नावारुपाला येणारे इतरही बरेच गझलकार आहेतच........

आता वेताळाने या सगळ्यांपासून थोडं अंतर ठेवून दूर झाडाखाली उभ्या असलेल्या एका उंचापुर्‍या गॉगल लावलेल्या व्यक्तीकडे बोट दाखवत विचारलं.. "विक्रमा, ओळख पाहू ती व्यक्ती कोण???"
विक्रम इकडेतिकडे पाहू लागला. त्याला काही शोधता येईना.....
"विक्रमा, लेका म्हातारा झालास की रे. तो बघ उंचापुरा गॉगल लावलेला आणि टीशर्टवर हृदयाच्या बाजुला २४ चा आकडा कोरलेला उमदा गझलकार...... "
"हां बेफिकीर..... " विक्रम जोरात ओरडला.

"पण हे असे सर्वांपासू फटकून दूर का उभे आहेत वेताळा......"
"अरे, त्यांची स्वतंत्र कार्यशाळा चालते" वेताळाने हळूच पंच मारला..... !!!

"आपण चावडीवर काय चाललय त्याकडे नंतर येऊया..... आधी तुला सगळा गाव फिरवून आणतो चल."

इतक्यात घाईघाईने एक मोटरसायकलस्वार विक्रमाला ऑलमोस्ट धक्का देत निघून गेला...... घाईघाईत आपली बाईक पार्क करून तो गोरागोमटा तरूण गझलकार सगळ्या लोकांमध्ये सामील झाला.

"हम्म्म. आला जीतू आला." वेताळ म्हणाला.
"तू कसा ओळखतोस रे वेताळ ह्याला. आपण कधी पाहिल्याचं आठवत नाही."

"अरे विक्रमा, घाईघाईत नो पार्किंग मध्ये बाईक लावून कार्यक्रमांना जाणारा एकच गझलकार आहे गावात. आणि आज शुक्रवार आहे ना..... ही चावडीवरची मिटिंग संपली की जीतू लगेच थिएटरमध्ये जाईल बघ....
उद्या पिक्चरचा ताजाताजा रिव्ह्यू"

हळूहळू चावडीवर गाव जमा होत होतं आणि वेताळ विक्रमाला गाव दाखवत फिरायला पुढे निघाला.

आज जरा सगळीकडेच लगबग दिसत होती. आपापली हातातली कामं आवरत सगळेच जण सभेला जायच्या तयारीत दिसत होते. पण गावाची पार दुर्दशा झाली होती. नाक्या-नाक्यावर कागदांचा धीग पडला होता. कोपर्‍यात, झाडाखाली, विहीरीजवळ सर्वत्र कागदाचे बोळे पडले होते. आणि एरवी टापटीपपणे वावरणारे गावकरी अजिबात एकही कागद उचलायला तयार दिसत नव्हते. विक्रमाला या प्रकाराचं आश्चर्य वाटलं.

"अरे, वेताळा पूर्वी आपण इथे फेरफटका मारायचो तेंव्हा इथे काय बहार होती, चैतन्य होतं. वाक्या वाक्यात गझल बोलायची. गझलेचे चाहते इथे ठाण मांडून असायचे. इतकंच काय, पण गझल आणि गझलकारांना खाजगीत शिव्या घालणारे "टूरिस्ट व्हिसा" वरती इथे फिरून जायचे......
पण आज इथे परमनंट व्हिसावाले पण कातावलेले दिसतायत...... काय झालं काय वेताळा????
अरे, इथले बागबगिचे, घरं, अंगण सगळी एक से एक सौंदर्यस्थळं होती रे.... पण आज या सौंदर्यस्थळांचा या कागदी बोळ्यांनी पार कचरा करून टाकलाय. काय आहे काय हे???? "

वेताळाने खूण करून एक एक कागद उचलायची खूण विक्रमाला केली. विक्रमाने पहिला कागद उचलला, त्यात एक शेर आणि बाकी शब्दांचे ढेर होते..... दुसरा कागद उचलला त्यातही तीच गत. मग तिसरा कागद उचलला तर त्यात भल्या मोठ्या स्माईलीज होत्या..... चौथ्या कागदातही अश्याच भारंभार स्माईलीज.....

विक्रम वैतागला. त्याने हातांच्या दोन्ही मूठी आवळल्या आणि एकमेकांवर मूठी आपटत तो जोरात ओरडला, "डॅम ईट"........
त्याच्या तोंडून हा शब्द ऐकला मात्र आणि वेताळ त्याच्यावर खवळला. डोळे लालबूंद करत वेताळ म्हणाला, "ह्या कथेचा लेखक कोण आहे?? "
"भुंगा"
"एपिसोड दिग्दर्शक कोण आहे???"
"भुंगा"
"मग महेश कोठारेचा कॉपीराईट असलेला "डॅम ईट" तु कसा वापरलास विक्रमा"... वेताळ आधीकच लालबुंद झाला.

"हॅ...... हॅ... हॅ...... इतकंच ना.... अरे वेताळा, कोठारे एका हाताची मूठ दुसर्‍या तळव्यावर मारतो.... पण मी दोन्ही मूठी एकमेकांवर मारतो....... हा माझा "पर्यायी डॅम ईट" आहे.

पर्यायी शब्द ऐकल्यावर वेताळाचा ताबा सुटला........

"अरे विक्रमा हा आजुबाजुला आता जो कचरा तू पाहतोयेस ना, तो असाच "पर्यायी कचरा" आहे.......
लिहिलेल्या कुठल्याही शेराला पर्यायी शेर देऊन केलेला कचरा आहे हा...... आणि ह्याच त्रासाने गावाची पार वाताहात झालीये........ अरे सफाई कामगारही इतके कंटाळले की या पर्यायी कचर्‍याला उचलायला त्यांच्या "संत गाडगेबाबा सफाई कामगार युनियन"ने मनाई केलीये आता....... म्हणून हा पर्यायी कचर्‍याचा खच दिवसेंदिवस वाढतच चाललाय...."

"तेंव्हा तू आधी बर्‍या बोलाने तुझा "पर्यायी डॅम ईट" मागे घे..... नाहीतर हा मी चाललो."

उडण्याच्या बेतात असलेल्या वेताळाला विक्रमाने अडवलं. "चल रे, तुझ्या मनासारखं होऊ दे. घेतो मी माझे शब्द मागे. पण आता मला सांग... हा सगळा काय प्रकार आहे... आणि याला जबाबदार कोण????"

शांत होऊन वेताळाने मुद्याला हात घातला.

"अरे विक्रमा, प्रगतीच्या हव्यासापायी कधीकधी पायावर कुर्‍हाड पडते ती अशी. बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नसलेल्या गावात अचानक कोळश्याच्या खाणी सापडल्या... जवळच्या समुद्रात म्हणे खनिजतेलाचे साठे सापडले" वेताळ हताश होऊन सांगू लागला.

"चांगलं आहे की मग. अरे गावाची प्रगती अश्यानेच होणार ना, गावाला रोजगार मिळेल. बाहेरचे लोक येतील देवाघेवाण होईल विचारांची आणि क्रांती घडेल ना."

"वाटलं तसेच होतं विक्रमा, पण झालं भलतंच....... आधी खाणींचा शोध लागला आणि मागोमाग त्या विषयातले तज्ञ गावात येजा करू लागले.... त्यातलेच एक होते "प्रोफेसर".

"साऊंड्स इंटरेस्टिंग" विक्रमाचं कुतुहल चाळवलं.
"प्रोफेसर" म्हटल्यावर विक्रमाच्या डोळ्यासमोर उमदा अक्षय कुमार आणि प्रिती झिंटाच आले.
"पहली पेहली बार बलिये, दिल गया हार बलिये"...... विक्रम प्रितीच्या गालावरच्या खळीत हरवणार इतक्यात वेताळ खेकसला.

"डोंबलाचं इंटरेस्टिंग......... अरे, "ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी संपवलं."

कैलासरावांचा एक पडिक वाडा होता गवकुसाबाहेर "मुशायरा" नावाचा. कैलासरावांना मुळापासूनच समाजकार्याची हौस. त्यांनी तो वाडा गावात आलेल्या कंपनीला फुकट वापरायला दिला. त्यामुळे "प्रोफेसर" त्या वाड्यात राहायला आले. आणि त्यानंतर गझलपूरचं जे काही झालं ते तू उघड्या डोळ्यांनी पाहिलेलंच आहेस विक्रमा.

जिथे तिथे प्रोफेसरचा हस्तक्षेप वाढतच गेला. कामं सोडून प्रोफेसर यातच रमू लागला.

एक शेर त्याला पर्यायी शेर.... एक गझल त्याला पर्यायी गझल........
अरे गझलपूरवासीयांकडे एक "पर्याय" शिल्लक नाही ठेवला त्यांनी..........

आजचीही मिटिंग त्यासाठीच.लावलीये. सुरुवातीला सगळं खेळीमेळीने चाललं होतं, आता मात्र गावकरी मेटाकुटीला आलेत..... टूरिस्ट व्हिसावर हळूच डोकावून जाणारेही आपल्या हळदीकु़कू समारंभात पर्यायी शेरांवर बोलणं टाळतात हल्ली..... आता बोल.

आता हे डोक्यावरून तेल गेलेय पार..... आणि मेंदूत कोळसा झालाय पार.

म्हणून यावर उपाय काय यासाठी आज सगळी मंडळी एकत्र जमलीयेत.......

अणि विक्रमा आता माझा सवाल तुला हाच आहे की, आता सर्व परिस्थिती पाहता आज गावकर्‍यांनी काय निर्णय घ्यायला हवा. हाच आजचा तुझा प्रश्न............!!!

जर तू योग्य उत्तर दिलेस तर मी पुन्हा राजेशमध्ये आणि तुझं उत्तर चुकलं तर तू तुझा संकल्प मोडायचास.
बोल आता काय करावं गावकर्‍यांनी???"

"वेताळा, ग्रो अप नाऊ. अरे असे फुटकळ प्रश्न विचारून मला नेहमी बोलतं करतोस आणि गुमान जाऊन पुन्हा राजेशमध्ये बसतोस. अरे, या प्रश्नाचं उत्तर खरंतर गावकर्‍यांकडेच आहे. आणि मला खात्री आहे की सगळे जण मिळून आज एकमुखी हाच निर्णय घेऊन गझलपूर पुन्हा पूर्वीसारखं करायचा चंग बांधतील.

आज गावकर्‍यांची अवस्था "प्रोफेसर आले चावडीत आणि गावकरी सापडले तावडीत" अशी झालेली आहे वेताळा.

गावात यायला जायला राहायला तर कोणी कुणाला मज्जाव करू शकत नाही ना. एखाद्याचा त्रास व्हायला लागला तर नेहमीच आपल्याकडे "साम दाम दंड भेद" निती वापरली जाते. पण कधी कधी या सगळ्याचाच वापर करता येतो असं नाही. साम समोरच्याला समजत नसेल आणि दंड, दाम हे उपाय वापरण्यासारखी परिस्थिती नसेल तर सरळ "भेद" करावा.

पर्यायी कचरा आवरायचा असेल तर गावकर्‍यांनी एकमुखाने "अनुल्लेख" करावा. हाच यावरचा साधा सरळ सोपा आणि सामोपचाराचा उपाय आहे. इतके केले तरी पुरेसं आहे वेताळा. गझलपूर पुन्हा पूर्वीसारखं होईल. पुन्हा आपण इथे येत जाऊ अधूनमधून. सर्वकाही "जैसे थे" होईल.

आता वेताळ उडणार याचा अंदाज येताच विक्रम त्याच्याकडे झेपावला पण तोपर्यंत वेताळाने हवेत भरारी घेतलेली होती.

"वा विक्रमा वा. तुझ्याकडे प्रत्येक प्रशाची उत्तरं तयार असतात. आणि म्हणूनच आपलं जमतं. पण आता तू बोललास आणि हा मी चाललो. तू प्रश्नाचं योग्य उत्तर दिलंस आणि मी तुझ्या तावडीतून पुन्हा एकदा सुटलो. आता आपली पुढच्यावेळी. नवा प्रश्न आणि नवी कथा घेऊनच.

पण विक्रमा, या कथेतला तिढा जर वरच्या उपायांनी सुटला नाही तर??? "

"काळजी करू नकोस वेताळा. हा तिढा सुटला नाही तर मग "एपिसोड २" "एपिसोड ३" येतच राहतील.
त्यानिमित्ताने आपल्या भेटीगाठी वाढतील."

खळखळून हसत वेताळ उडत उडत पुन्हा राजेश बारकडे वळला आणि विक्रमादित्य मनोनिग्रह करून पुन्हा वेताळाला पकडायच्या इराद्याने परतीच्या वाटेला लागला.

विक्रम और वेताल..... विक्रम और वेताल...... विक्रम और वेताल...... विक्रम और वेताल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यावाद सर्वांना मनमोकळे प्रतिसाद दिल्याबद्दल..

पुढच्या एपिसोडमध्ये नक्की लक्षात ठेवेन...... इथे कैलासराव म्हणाले तसं "पंचेसवर भर न देता मूळ मुद्दा राखायचा होता..... पुढच्या वेळी तेही सांभाळायचा प्रयत्न करू.

धन्यवाद.

लै भारी
२-४ प्रसंग वाढवून रंगवून सांगीतले असते तर अजून मजा आली असती काही पात्रे अधिक योजून त्यांच्यामुखी संवाद वगैरे पेरायला हवे होते

असो

अजून येवुद्यात आपणास वाटते आहे आपण जितकी कथन केलीत त्यापेक्षा 'बात बहुत आगे बढ गई है' . वस्तुस्थीती अजूनच दारुण भयाण आहे आपण पुढील भाग आताच प्रकाशित करू शकता

प्रतिक्षेत .....

भुंग्या, मस्तय.
पण खरच अजून तंगड्या खेचता आल्या असत्या तुला... (एखादी हातातच आली असती म्हणून का काय?)
पुढल्या भागात हौन जौद्या

भुंगा, एका मायबोलीकराने खाजगीत मला असे सांगितले आहे कि या गझलगँगमागे परकिय शक्तीचा हात आहे.
खरेच, एका प्रतिस्पर्धी संकेतस्थळाचे कारनामे आहेत म्हणे हे.
(तिथनं हितं आल्यालं है !)

सगळ्यांचे आभार....

दिनेशदा (आणि इतरही सगळेच) म्हणताय तसं हातचे राखून लिहिलं खरं...... शिवाय बेफी म्हणाले तसं स्त्री गझलकारांचे उल्लेख असलेले प्रसंग कापले, रिअ‍ॅक्शनची कल्पना नव्हती....

आता दुसर्‍या भागात सगळी कसर भरून काढण्यात येईल.....

क्लायमॅक्सला "भूवरी रावण वध झाला" हेच गाणं वाजवतो बॅग्राऊंडला....... हा.का.ना.का. Happy

दुसर्‍या भागासाठी शुभेच्छा.....डेली सोपमध्ये वापरतात तसा कृत्रिम हशा वापरू नका बर्का Proud
रच्याकने किती विचार करुन एसटीची पोस्ट टाकलीत? Wink आम्ही ठाण्याच्या मर्सिडीजमधे बसून प्रतिसाद देतो राव Biggrin Lol Rofl

मला अशी खात्री वाटतेय की पुढील भाग अधिक मनोरंजक असेल.

हा भाग एक 'पार्श्वभूमी' तयार करण्यात पूर्णतः यशस्वी...... लेकिन, 'पिक्चर अभी बाकी हैं' (हो ना ?)

वेटिंग फॉर एपिसोड २ - ३ - ४ - ...... (विथ अ‍ॅडेड कॅरेक्टर्स !! ) Wink

बेष्टवाला लक !!

विशेष आभारः बेफिकीर, रणजीत, कणखर, आणि प्रसादपंत.<<<

कारण यांची नाचक्की करण्याची यांनी परवानगी दिलेली आहे Lol

Light 1

भुंगा, समर्पक लेख आहे. विनोद आवडले. आशय महत्त्वाचा असून अभिव्यक्ती हातचं राखून केलेली आहे असं जाणवतं! पु.भा.प्र.
आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद सर्वांना......

बेफी, काळजी नसावी पुढच्या भागात इतरांना संधी दिली जाईल विशेष आभार मानून घ्यायची (तुमच्या भाषेत नाचक्की Proud )

कामाचा कंटाळा आला की मी मायबोलीवर विनोद(PJ) व 'या विशेष गझलांवरील प्रतिक्रिया' वाचते. 'अनुल्लेख' हा उपाय ठरत असेल तर 'पर्यायी' पाने शोधायला लागणार stress buster म्हणून Sad
लेख समर्पक, आवडला ..

फुटकळ / फुटकळ प्रासंगिक लिहिणार का आता ? ती सध्याची ट्रेंड आहे. दोघातिघांनी मिळून लिहिलेत, तर "आम्ही", "आम्हाला" असे शब्दपण वापरता येतील.. Happy

Pages