प्रवेशिका - ३७ ( ADNYAT - मी न वेडा मानसी... )

Submitted by kaaryashaaLaa on 12 October, 2008 - 23:52

मी न वेडा मानसी मज धार नाही
आजवर केला कुणावर वार नाही

शोधला संसार हा संवेदनांचा
हाय! दिसले एकही पण दार नाही

पाहिले जन्मातले उपचार सारे
वेदनेने पाळला व्यवहार नाही

देत गेलो जे हवे ज्या ज्यास ते पण
मी कुण्या कर्णापरी दातार नाही

या कुणीही, वेस आता जागलेली
ह्या दिशेला तामसी अंधार नाही

रंग वेडा मानवी हळवेपणाचा
मी कुणी परमेश्वरी अवतार नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोधला संसार हा संवेदनांचा
हाय! दिसले एकही पण दार नाही

रंग वेडा मानवी हळवेपणाचा
मी कुणी परमेश्वरी अवतार नाही

सुरेख! 'मानवी हळवेपणा' आवडले.

मतला छान...आवडला

माझे गुण ४
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

खासच जमल्ये

फक्त
मी न वेडा मानसी मज धार नाही
जरा खटकत्ये, वेडा आणि धार यांचा संबंध लागत नाही.

७ गुण

जरा अवघड वाटली समजायला
५ गुण
--------------------------------
आली दिवाळी! Happy

ठीक आहे. मतल्याबद्दल सुधीरशी सहमत.

माझ्या मते ५ गुण.
-सतीश

"रंग वेडा मानवी हळवेपणाचा
मी कुणी परमेश्वरी अवतार नाही"

क्या बात है....:)

९ गुण...