नवा डेस्कटॉप खरेदी करायचा आहे.

Submitted by शर्मिला फडके on 18 January, 2013 - 00:17

डेस्कटॉप पीसी कोणता घ्यावा? पीसी करता किती जिबी, रॅम, कोणता मॉनिटर, असेम्बल की ब्रॅन्डेड, नवे सॉफ्टवेअर्स कोणते लोड करावे? किमती काय आहेत? एचपी की डेल? इत्यादी बर्‍याच शंका आहेत. काही सूचना मिळू शकतील का?
बरेच डाऊनलोड, सिनेमे पहाणे इत्यादी व्यतिरिक्त रेग्युलर पीसीसंबंधीत कामे, सर्फिंग असते. कामाकरता लॅपटॉप आहे. आधीचा डेस्कटॉप, मॉनिटर आता बरेच त्रास द्यायला लागला आहे. प्राचीन झाला आहे.

तसेच वायफाय सेटप घरी केला तर इंटरनेटच्या स्पीडवर/ बिलावर चांगला-वाईट काय परिणाम होतो? राउटर, सर्व्हिस कोणती घ्यावी? असेही काही प्रश्न आहेत.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेनोवो मॉनिटर प्लस सिस्टिम एकात आणि कीबोर्ड/ माउस असा एक येतो त्याला टीव्ही टयुनर् कार्ड लावता येते. तो छान आहे. हौस असेल तर अ‍ॅपल पीसीज मस्त आहेत पण फार महाग आहेत.
बरोबर मस्त छोटी स्पीकर सिस्टिम घ्या. उपयोग होतो.

वाय फाय मस्ट आहे. हॅथवे आहे आमच्या कडे. बिल्डिन्ग मध्ये एक सप्ल्यायर ची मोनोपली असते. असे माहीत पडले आहे.

धन्यवाद अश्विनी. माझे नोटपॅड लेनोव्होचे आहे. मस्त चाललेय. डेस्कटॉप पाहिलेला नाही. जाऊन बघीन.
शक्यतो सीपियू आणि मॉनिटर एकात असलेला घेऊ नका असे कळले होते. कदाचित बिघडला तर प्रॉब्लेम होतील म्हणून असावे. खरेतर जागाही वाचेल. कोणी वापरला आहे का असा प्रकार?
अ‍ॅपल नको. महाग आहे आणि इतर सॉफ्टवेअर्स करता प्रॉब्लेम येतो नंतर.
वायफाय सर्व्हिस एमटीएनेल चे घ्यावे, राउटर वेगळ्या कंपनीचा घ्यावा असे काहींचे मत आहे. आमची सध्याची इंटरनेट सर्विस ऑरबिट केबलची आहे. स्पीड कमी जास्त होत असतो. कधी कधी खूपच मंदावतो.

शर्मिला धन्यवाद. अशाच स्वरूपाचा एक धागा उघडायचे माझ्या मनात होते.

मला घरी कामासाठी डेस्कटॉप घ्यायचा आहे. शिवाय तो डेस्कटॉप ठेवायला फर्निचर देखील सुचवा. सलग सात ते आठ तास बसता येण्यासाठी चांगली चेअर वगैरे.
Happy

शर्मिला, अमा म्हणतात तसं

शर्मिला, अमा म्हणतात तसं All-in-one घेतल्यास जागा फार व्यापत नाही. Lenovo चे बघा, शक्यतो ३ वर्षाची वॉरंटीवाले. त्यात तुम्हाला Licensed Windows मिळेल. मॉनिटर २०" किंवा २१" घ्या जेणेकरुन सिनेमा पाहु शकाल. TV Tuner सध्या चालणार्‍या set top box सोबत compatible असावे. wi-fi ने speed चांगला मिळेल जर PC आणि wi-fi router range मधे असतील. त्याने बिलावर काही परीणाम होत नाही. MTNL चा ४५० unlimited plan घ्या. त्यांच्याकडे router नसेल तर belkin/tp-link/d-link असे बरेच उपलब्ध आहेत. साधारण १८००-२२०० यामध्ये मिळेल.

असेंबल्ड घ्यायचा असल्यास Core i5 + 4 GB RAM + 500 GB or 1 TB HDD + DVD Writer + 20" LED monitor with Windows 7 home premium -64 bit घ्या.

अशातच एचपीचे काही डेस्कटॉप घेतले आहेत. डेस्कटॉप (स्पेसिफिकेशन आठवत नाहिये, आठवून लिहिन.) २५ हजाराच्या आत मिळाले होते. डेलचे डेस्कटॉप /लॅपटॉप माझे सगळ्यात जास्त आवडते आहेत. Happy त्यानंतर एचपी. (अ‍ॅपल वैगरे परवडत नाहि)

एमटीएनएलची इंटरनेटसेवा खरंच चांगली आहे. वायफायने स्पीडमध्ये फरक पडतो असं ऐकलं होतं, पण उलटा अनुभव आला मला तरी. भरपूर वायर्स असल्याने पूर्वी बर्‍याचदा नेट बंद पडणं, चालू होणं असं सतत व्हायचं. वायफाय मध्ये हा त्रास बंद झाला. वापफाय सेटअपचा बिलावर काही परिणाम होत नाही.

शर्मिला.. गजालीवर भ्रमर (मिलिंद माईणकर) म्हणून एक आयडी आहे, त्याला विचार. त्याचं फिल्डच हे आहे. कदाचित असेम्बल्ड सुद्धा चांगला मिळू शकेल. बोलून बघ त्याच्याबरोबर. Happy

नंदिनी हो. मलाही खूर्ची कोणती असावी हा प्रश्न आहे. सध्या माझ्याकडे रिव्हॉल्व्हिंग आहे त्याने फारच जागा व्यापतेय.

भ्रमर खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद. आता निदान डीलरशी बोलताना काय हवेय नक्की ते सांगता येईल Proud टीव्ही ट्यूनर काय प्रकार आहे? माझ्याकडे सध्या नाहीय तो नक्की.

दक्षे Happy
शर्मिला, तुला पार्ल्यातल्या माणसाचा नंबर पाठवलाय.
भ्रमरने सांगितलेल्या स्पेसिफिकेशन्सचा विचार कर सिरीयसली. त्याच्या टिप्स उपयोगी पडतात.

हो मिळाला नीरजा. थॅन्क्स. खरंच तुझे पुन्हा आभार भ्रमर. लेनोव्होच्या नोटपॅडमधे वर्ड आणि एक्सेल वापरताना प्रॉडक्ट की एन्टर करा वगैरे प्रकार सुरु व्हायचे त्यानी फार त्रास दिला. मी ते वेळेत केलं नाही आणि आता टाइमबार झालं बहुतेक. नोटपॅडमधे बरहापॅड आहे त्यामुळे मला मराठीतून काम करताना चालून जातय पण बाकी काही वर्डवर करता येत नाहीय. नोटपॅड घेताना मी पुरेशी माहिती विचारुन घेतली नव्हती त्याचा हा परिणाम.

तुमचे काम रोजचे असेल तर एम एस ऑफिस २०१० विकत घेऊन इन्स्टोल केले तर बरे पडेल. म्हणजे पुढे कंपॅटिबिलिटी इश्यूज येत नाहीत.

वर्ड आणि एक्सेल मायक्रोसॉफ्ट ऑफिसची प्रॉडक्ट्स आहेत.. त्यांचा आणि विंडोज ऑपरेटींग सिस्टीमशी काहीही संबंध नाही... ती वेगळीच इन्स्टॉल करावी लागतात आणि त्यांचे लायसेन्स पण वेगळेच असते..

शर्मिला, मी काही महिन्यांपुर्वीच HP चा TouchSmart 610 घेतला. टचस्क्रीन, वायर्स नाहीत. 4gb and 500gb hard drive. किंमत साधारण रु. ५३,०००/-.

फोटू आणि डिटेल्स इथे बघता येतील: http://gestureworks.com/features/supported-hardware/hp-touchsmart-610-pc/

वापरायला एकदम भारी आहे. Happy

अ‍ॅपलची आफ्टर सेल्स सर्विस गंडलेली आहे हे एका मैत्रिणीच्या अनुभवावरून कळलं. रिपेअरींगकरता अतिशय पैसे मोजावे लागतात. घरी येऊन करत नाहीत. आपल्याला पीसी घेऊन त्यांच्या सर्विस सेंटरला जावं लागतं वगैरे वगैरे.

MS Office Home & Student 2010 edition घ्या. स्वस्तात license आणि ३ PCs वर टाकु शकता. Happy
MS Office शी साधर्म्य असणारं Kingsoft suite dowanload करुन वापरु शकता. ते चकटफु आहे.
आणि कृपया आभार वगैरे मानु नका हो. Happy

हो. हे मला नंतर कळले होते की विंडोजसोबत मायक्रोसॉफ्ट ऑफिस इन्स्टॉल करुन येत नाही.

ओके. भ्रमर.

मामी, डेस्क्टॉपमधे टचस्क्रीन? पाहीलं नाहीये अजून. इंटरेस्टींग.

कोणकोणती नवी, उपयोगी सॉफ्टवेअर्स आहेत? जी घेतानाच घालता येतील?

असेंबल्ड घ्यायचा असल्यास Core i5 + 4 GB RAM + 500 GB or 1 TB HDD + DVD Writer + 20" LED monitor with Windows 7 home premium -64 bit घ्या>>> भ्रमा ह्याची किमंत अंदाजे किती जाइल रे?

वायफाय सेटप घरी केला तर इंटरनेटच्या स्पीडवर/ बिलावर चांगला-वाईट काय परिणाम होतो? राउटर, सर्व्हिस कोणती घ्यावी? >>> आम्ही आधी वायफाय लावून घेतलं होतं. पण शेवटी वायफाय पूर्णवेळ घरात सुरू ठेवणं आरोग्याच्या दृष्टीकोनातून कठीण वाटू लागलं.

आता, MTNL चं डायरेक्ट कनेक्शन घेतलं आहे.

मुख्य म्हणजे हार्ड्वेअर सर्व फ्लिप कार्ट वर किंवा तत्सम ऑनलाइन अवेलेबल आहे होम डिलेवरी येइल. मी एक मॉनिटर तसाच घेतलेला मध्ये. सामान गाडीत टाकून आणायचे झंझट नाही.
पण खरे तर तुम्ही एक लॅप्टॉप का नाही घेत. डेस्क टॉप्स आर प्रिटी मच हिस्ट्री.

वायफाय पूर्णवेळ घरात सुरू ठेवणं आरोग्याच्या दृष्टीकोनातून कठीण वाटू लागलं. <<
वायफायचा आरोग्यावर काय परिणाम होतो?

गोदरेजकडे कॉप्यु फर्निचरची खूप मोठी रेंज आहे. माझ्याकडे त्यांचं Target 108 मॉडेल आहे. आणि गोदरेजचीच एक रोव्हॉल्विंग, स्प्रिंगबॅक वाली चेअर आहे.

गोदरेज कॉम्प्यु फर्निचर इथे बघा : http://www.godrejinterio.com/godrej/GodrejInterio/products.aspx?id=29&me...

अश्विनी लॅपटॉप, नोटपॅड दोन्ही आहे. पण घरात तरीही डेस्कटॉपला पर्याय नाही.

मामी, वाय-फाय आणि आरोग्यावर परिणाम.. होय की. हा एक मुद्दा फार महत्वाचा आहे. विचार करायलाच हवा. अजून माहिती देशील का?

वायफायच्या आरोग्यावर परिणामाबद्दल नेटवर नक्की कुठे काही ठोस माहिती मिळत नाही. कारण घराघरातून वायफाय हे प्रकरण नुकतं नुकतंच सुरु झालंय. पण तरीही दीर्घकाळ वायफाय वापरल्याने मोबाईलच्या अतिवापराने जे नुकसान होतं ते होऊ शकतं. निदान तशी शक्यता असते.

जाणकार अधिक माहिती सांगतीलच.

मामी, आमच्याइथे पार्ल्यात अरविंद फर्निचरवाला आहे. त्याच्याकडचे रेडिमेड डेस्क मी गेले साडेतीन वर्ष वापरतेय. तीन शिफ्टींग्ज झाली तेवढ्यात. व्यवस्थित आहे. किंमत २००० फक्त Happy
हा पिसी काढेन तेव्हाच ते ही काढेन Happy

Core i5 with Gigabyte H61M-DS2 Motherboard+ 4 GB Kingston DDR3 RAM + Seagate 500 GB or 1 TB HDD + Samsung DVD Writer + 20" Acer LED monitor + Logitech MK 200 kbd/mouse --->> साधारणपणे २९००० पर्यंत. 1 TB साठी १००० रु. अधिक . यामध्ये एका वर्षाची सर्विस फुकट (अगदी format करावा लागला तरीही!) Windows License साधारण ५०००. Pirated घेतलंत तर चकटफु. MS Office 2010 home & student 3000 पर्यंत. MS Office 2010 home & business (outlook included) 8500 पर्यंत.

पिसी मधे speakers धरलेले नाहीत. ते ४५०-१५०० या मध्ये येतील.

पण खरे तर तुम्ही एक लॅप्टॉप का नाही घेत. डेस्क टॉप्स आर प्रिटी मच हिस्ट्री. >>> जर एकाच जागी बसून काम करायचं असेल आणि बरंच लिखाणाचं काम असेल तर डॅस्कटॉप हा लॅपटॉपपेक्षा जास्त सोईचा ठरतो. डेस्कटॉपचा कीबोर्ड हा मला जास्त युजर फ्रेंडली वाटतो.

मामी, आमच्याइथे पार्ल्यात अरविंद फर्निचरवाला आहे. त्याच्याकडचे रेडिमेड डेस्क मी गेले साडेतीन वर्ष वापरतेय. तीन शिफ्टींग्ज झाली तेवढ्यात. व्यवस्थित आहे. किंमत २००० फक्त
हा पिसी काढेन तेव्हाच ते ही काढेन >>>> Happy

जर एकाच जागी बसून काम करायचं असेल आणि बरंच लिखाणाचं काम असेल तर डॅस्कटॉप हा लॅपटॉपपेक्षा जास्त सोईचा ठरतो. डेस्कटॉपचा कीबोर्ड हा मला जास्त युजर फ्रेंडली वाटतो. <<
+१०००

मला तरी बैठक मारून काम करताना (स्केचिंग किंवा लेखन) डेस्कटॉपच बरा पडतो. मोठा स्क्रीन, किबोर्डची पोझिशन हाताच्या लेव्हलला... बरे पडते.
लॅपी फक्त ऑन द रन पुरता उपयोगी आहे.

शर्मिला, सध्यातरी टेबल,खुर्चीमधे खर्च करू नकोस पैसे. आहे ते चालूदेत. री-डेव्ह पूर्ण झाल्यानंतर मग काय नि कसं ते ठरव. Happy

भ्रमर यांना अनुमोदन.

२१ इन्ची स्क्रीनचा लेनोव्हो ऑल इन वन माझ्याकडे गेली ३ वर्षे आहे. तेव्हा फक्त २२-२३ हजारात पडला होता. इनबिल्ट वायफाय अन वायर्ड लॅन आहे. ६ यूसबी पोर्ट्स आहेत. डीव्हीडी रायटर, ६-१ कार्ड रीडर. अ‍ॅटम प्रोसेसर असला, तरी त्याचा काहीच त्रास नाही, सगळं व्यवस्थीत चालतं. अगदी माझे सर्जरीचे व्हिडीओ ग्रॅबिंग + एडिटिंग देखिल. अजूनही व्यवस्थीत सुरू आहे.
सॉफ्टवेअर : विंडोज एक्स पी लीगल आहे. काँप्युटरसोबत फुकट. अँटीव्हायरस एव्हीजी फ्री. बाकी सगळी फ्री/ओपन वर्जन्स आहेत.
एक्स्टर्नल टीव्ही ट्यूनर चिनी आहे. फक्त १२शे रुपयांचा यू एस बी डॉंगल सारखा. काय तरी गॅडमेई असली कंपनी आहे.
***
बराहा ९ ची इन्स्टॉलेबल फाईल जपून ठेवा. नव्या काम्पूटरात ते बराहा १० ची ट्रायल इन्स्टॉल करून देतील फुकट, आधीच स्पेसिफिकली नाही सांगा. नंतर वाट लागेल नाहीतर.

इब्लिस होय. खरं तर या बरहा करताच मी इतके दिवस आधीची सिस्टीम चालवून घेतेय. इन्स्टॉलेबल फाईल जपून कशी ठेवायची? पेनड्राइव्ह मधेच ना?

डाऊनलोडींग, सिनेमे पहाणे, रेग्युलर पीसीसंबंधीत कामे, सर्फिंग इत्यादी गोष्टींसाठी i5 प्रोसेसर खूप जास्त झाला.

२५ हजारालासुद्धा तुम्हाला मस्त कन्फिगरेशन असलेला पी.सी. मिळून जाईल.

AMD FX8120 <--- क्वाड कोअर ऎकले आहे ना ? हे ८ कोअर असलेले प्रोसेसर आहे.
किंमत १०,००० फक्त.
AMD नको वाटत असेल तर Intel I3 घ्या. (२-३ हजार कमी)
AMD ग्राफिक्ससाठी चांगला असतो.

यासाठीचा मदरबोर्ड ४ ते ५ हजार.
४ जी.बी. रॅम १२०० ते १५०० रू.
कोणतेही कॅबिनेट + पॉवर सप्लाय १५०० रू.
DVD Writer १००० रू..
१ टी.बी. हार्ड डिस्क ४३०० ते ४५०० रू.
साधा माऊस + किबोर्ड ६०० रू.
पूर्ण गल्लीला आवाज ऎकवायचा नसेल तर ६००-७०० रू.चे स्पिकर्स.

माझी एक काडी - कुणी काँपवाला मित्र जर ओळखीचा असेल तर तुम्ही लॅमिंग्टन रोड वरून बर्‍यापैकी स्वस्तात पीसी असेंबल करू शकता. फक्त सगळे पार्टस घेतांना नीट निरखून / पारखून घ्यावेत. २५के पर्यंत चांगला पीसी बसवता येईल...

माझ्याकडे मी लोकल केबलनेट बेल्कीन एन १५० (एकदम बेसीक राऊटर) वर वापरतोय गेली २ वर्षे... आतापर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही. हे राऊटर मी वाशी मार्केटातनं घेतलं होत, फक्त ११५०/- ला, सोबत ३ वर्षांची वॉरंटी पण आहे. आताची किंमत नाही माहीती.

माझ्या माहीतीप्रमाणे तरी राऊटर नी इंटरनेटच्या स्पीडवर फरक पडत नाही मात्र जेवढी लाईन ची बँडविडथ असते ती तो राऊटर पूर्ण खेचतो.

अजून एक फायदा - एकच कनेक्शन १० लोक शेअर करू शकतात. मो.फोन, टॅब्स, लॅपटॉप्सच्या बॅटर्‍या जास्त चालतात: कारण त्यांना रेडी अव्हेलेबल नेटवर्क मिळते!

वायफाय चे शरीरावर परीणाम - नो ईन्फो...

क्लाऊड सर्व्हीसेस ईफेक्टीवली वापरता येतात... मो. फोन वर काढलेला फोटो, आपोआप टॅब, पीसीवर अपडेट होतो, पीसी वा टॅबवर केलेलं अर्धवट डॉक जीथे सोडलं असेल तिथून पुन्हा सुरू करता येते, दुसर्या डिवाईसवर सुद्धा!

जर जागेचा प्रॉब्लेम आहे तर ऑल ईन वन चा जरूर विचार करा.

मी केलेला अ‍ॅपल आयमॅक चा हिशोब -
आयमॅक ची बेस प्राईस - ६५के
मिळालेला स्टूडंट डिस्काऊंट - १२के
जूना लॅटॉ चे विकून आलेले पैसे - १९के
=========================
एकूणात पडलेला २१.५ ईंच वाला आयमॅक - ४००००/- च्या आत

यावर सगळं सगळं चालत... काहीही प्रॉब्लेम नाही... अगदी पायरेटेड सॉफ्टस सुद्धा चालतात...

दुसरी काडी - जरी पॉवर कट होत नसला, घरी ईंन्वरटर असला तरीही २०००-२५००/- जास्तीचे खर्च करून यूपीएस मात्र घ्याच...! तो तुमच्या पीसी च्या कंपोनंटस ला पॉवर फ्लक्चुएशन्स पासून वाचवतो...

हॅपी शॉपिंग! Happy

@ शर्मिला.
हो. पेनड्राईव्हवर चालेल. सीडी राईट करूण ठेवा, वाटल्यास स्वतःलाच एक कॉपी मेल करून ठेवा. हरवली असेल तर सांगा, माझ्याकडे आहे. देईन पाठवून.
मात्र पुढची व्हर्जन इस्टॉल केली रे केली, की जुनी चालत नाही. फॉर्म्याट करावा लागेल काम्प्युटर. म्हणून सुरुवातीलाच जुनीच टाकायची.

दुसरी गोष्ट. प्रिंटर कोणता आहे? त्याची कॉम्पॅटिबिलिटी पाहून मग घ्या नवे मशीन. प्रिंटरची सीडी ठेवली आहे ना जपून? नाहीतर ते देखिल बोलून घ्या कॉम्प्युटरवाल्याशी.

सौरभ- असं कोणी ओळखीचं नाहीये म्हणून तर इथे प्रश्न विचारला.

मोगॅम्बो- राउटर नक्कीच घेणार. ऑल इन वन बद्दल अजूनही शंका आहेत.

इब्लिस- प्रिंटरचे लक्षात ठेवते. धन्यवाद. बरहा ९ आता पेनड्राइव्ह आणि मेल दोन्ही करुन ठेवते. मात्र आता तुमच्याकडूनही ती घेता येईल हे कळल्याने आधी इतके टेन्शन वाटत नाहीये Proud

विंडोच हवी का? फुकटात आणि विंडोपेक्षा १००० पटींनी चांगलि आणि आता वापरायला अगदी सोपी उबुंटू किंवा मिंट माझ्या मते बेस्ट.... आणि वाचलेल्या पैशातुन अधिक काही घेता येइल.

असेंबल मध्ये अधिक पैसे वाचतील आणि जसं पाहिजे तसं कोन्फिगर करता येइल.

डेस्क्टॉप खरेदी झाली मागच्या आठवड्यात. असेम्बल्ड घेतला. स्पेसिफिकेशन्स खालील प्रमाणे.

Intel Core 13 2nd Generation/ Gigabyte H61 Intel Chipset Motherboard/Kingston 4 Gb DDR 3 Ram / Seagate 500 GB Sata Hard disc /Logitech Keyboard mouse set/18.5” Led Monitor /Atx cabinet /creative A35 speakers /1 year onsite warranty

एकुण किंमत- Rs. 27,700/-

धन्यवाद सर्वांना.

शर्मिला. धन्यवाद.

माझे पीसी घेण्याचे नुसते स्वप्नरंजनच चालू आहे. आहे तो लॅपटॉप डोसे भाजण्याइतका तापतोय. त्याला सर्व्हिसिंगला घरी कुणी येत नाही. मी सर्व्हिससेंटरला जायचं तर ८० किमी येऊन जाऊन. Sad

अभिनंदन शर्मिला Happy बिल जपुन ठेवा. त्यावर Monitor चा Serial No. टाकुन ठेवा, कारण मॉनिटरला ३ yrs onsite warranty असते,

नंदिनी, मी सांगितलेला उपाय करुन पाहिलास कां??

आहे तो लॅपटॉप डोसे भाजण्याइतका तापतोय>> Lol
सॉरी, तुझ्या होणार्‍या त्रासाला हसत नाहिये. पण वाक्यच भारी आहे. Happy

आम्ही पीसी असेंबल्ड करुन देतो. असेंबल मध्ये अधिक पैसे वाचतील फक्त सगळे पार्टस घेतांना नीट निरखून / पारखून बसवतो. सोबत २ वर्षांची वॉरंटी पण आहे रिपेअरींगकरता अतिशय पैसे मोजावे लागत नाहि, घरी येऊन रिपेअरींग करतो. आपल्याला पीसी घेऊन त्यांच्या सर्विस सेंटरला जावं लागतं नाहि वगैरे वगैरे.
मोबाइल नंब्रर- ७२०८६४३४६४

आम्ही पीसी असेंबल्ड करुन देतो. असेंबल मध्ये अधिक पैसे वाचतील फक्त सगळे पार्टस घेतांना नीट निरखून / पारखून बसवतो. सोबत २ वर्षांची वॉरंटी पण आहे रिपेअरींगकरता अतिशय पैसे मोजावे लागत नाहि, घरी येऊन रिपेअरींग करतो. आपल्याला पीसी घेऊन त्यांच्या सर्विस सेंटरला जावं लागतं नाहि वगैरे वगैरे.
मोबाइल नंब्रर- ७२०८६४३४६४

आम्ही पीसी असेंबल्ड करुन देतो. असेंबल मध्ये अधिक पैसे वाचतील फक्त सगळे पार्टस घेतांना नीट निरखून / पारखून बसवतो. सोबत २ वर्षांची वॉरंटी पण आहे रिपेअरींगकरता अतिशय पैसे मोजावे लागत नाहि, घरी येऊन रिपेअरींग करतो. आपल्याला पीसी घेऊन त्यांच्या सर्विस सेंटरला जावं लागतं नाहि वगैरे वगैरे.
santosh karande.
मोबाइल नंब्रर- ७२०८६४३४६४
mumbai.

Pages