नवा डेस्कटॉप खरेदी करायचा आहे.

Submitted by शर्मिला फडके on 18 January, 2013 - 00:17

डेस्कटॉप पीसी कोणता घ्यावा? पीसी करता किती जिबी, रॅम, कोणता मॉनिटर, असेम्बल की ब्रॅन्डेड, नवे सॉफ्टवेअर्स कोणते लोड करावे? किमती काय आहेत? एचपी की डेल? इत्यादी बर्‍याच शंका आहेत. काही सूचना मिळू शकतील का?
बरेच डाऊनलोड, सिनेमे पहाणे इत्यादी व्यतिरिक्त रेग्युलर पीसीसंबंधीत कामे, सर्फिंग असते. कामाकरता लॅपटॉप आहे. आधीचा डेस्कटॉप, मॉनिटर आता बरेच त्रास द्यायला लागला आहे. प्राचीन झाला आहे.

तसेच वायफाय सेटप घरी केला तर इंटरनेटच्या स्पीडवर/ बिलावर चांगला-वाईट काय परिणाम होतो? राउटर, सर्व्हिस कोणती घ्यावी? असेही काही प्रश्न आहेत.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Core i5 + 4 GB RAM + 500 GB or 1 TB HDD + DVD Writer + 20" LED monitor with Windows 7 + 1 or 2 gb graphic card. please tell me how much cost to be paid?

मूळ हेडरमधला प्रश्न आता दहा वर्षांनी परत विचारते आहे. डेस्क्टॉप कसा निवडायचा आता?
बेसिक होम युज. वडिलांना घ्यायचा आहे म्हणजे ज्ये नां साठी वापरायला सोपे असावे हे पहिले आहे. ते सध्या प्राचीन पिसी वापरतायत. विंडो ७ च आहे अजून त्यावर. तो पिसी असेंबल्ड आहे.
बेसिक ऑफिस, इमेल्स, मनीकंट्रोल व तत्सम वेबसाइटस इतकाच वापर असणार आहे. पिसीवर स्ट्रीमिंग वगैरेच्या भानगडीत ते पडत नाहीत.

आता असेंबल्ड वापरू नये असे ऐकीवात आहे.
ऑल इन वन किंवा अगदी थिन टॉवर दोन्हींबद्दल फीडबॅक हवा आहे. १० वर्षांपूर्वी ऑल इन वन नको म्हणले जाई. आता काय सिच्युएशन आहे?
असेंबल्ड वर पूर्वी फोटोशॉप टाकून घेता येत असे तर ब्रंडेडवर तसे शक्य असते का?
नेटवर बघतेय तर आता विंडो ११ आले आहे. ते स्टेबल आहे का?
ज्ये नांसाठी नव्याने सगळा विंडो ११ इंटरफेस शिकायला किती कटकटीचे आहे? विशेषतः विं १० वापरलेले नसेल तर?

बजेट असेल तर टच स्क्रीन घ्यावा (ऑल इन one) ज्ये नांना सोपा पडू शकेल असावं माझे मत आहे. नवीन पीसी घ्यायचा झालीस विंडोज 11 शिवाय पर्याय नाही, ते शिकून घ्यावेच लागेल.

AIO थोडा महाग असेल, टॉवर त्यामानाने स्वस्त. त्यांच्या करता कोअर i3 पुरेसा होईल. मॉनिटर 22 इंच असेल तर त्यांना थोडे सोयीचे पडेल

<< बेसिक ऑफिस, इमेल्स, मनीकंट्रोल व तत्सम वेबसाइटस इतकाच वापर असणार आहे. >>

डेस्कटॉप ऐवजी टॅबलेट चालेल का ते बघा. त्याच्यावर ब्राउझिंग आणि ईमेल वगैरे करता येईल.

टच स्क्रीन म्हणजे मोबाईल सारखा वापर

AIO जागा कमी व्यापेल, टॉवर ला अधिक लागेल.
AIO warranty नंतर त्रासदायक ठरू शकेल, टॉवरचे तसे होणार नाही.

Assembled का वापरू नये ह्याची काही कारणे ऐकली असतील तर वाचायला आवडतील Happy

छे खास काही कारणे नाहीयेत माझ्याकडे. हल्ली तसे करण्यात अर्थ नाही कारण हार्डवेअर चांगले येत नाही असे वसईत एकाने सांगितले. इतकेच आहे.
बाकी भ्रमा, मी तुला पिडेन लवकरच फोनवरून.

ते बारकं बारकं गिचमिड नको असं म्हणतात त्यामुळे लॅप्टॉप किंवा टॅब आउट. >>> हे भारी आहे, या बाबतीत मी तुझ्या बाबांच्या बोटीत.

डेस्क टॉप घ्यायचा असेल तर

खूप कमी काम असेल तर तुम्हाला इंटेल सेलेरॉन चालेल. स्वस्त पडेल.

नेटसर्फिंग, थोडेफार ग्राफिक्स, संगीत आणि इतर कामे असतील तर आय ३ प्रोसेसर किमान ७ जनरेशनवाला घ्या.
आय ३ प्रोसेसर मधे ड्युएल कोअर असतात. म्हणजे एकातच दोन प्रोसेसर्स. त्यामुळे एकाच वेळी एकापेक्षा जास्त कामे करताना एका प्रोसेसर वर ताण येत नाही. जितका लेटेस्ट जनरेशनचा घ्यावा तितके फिन्स (ट्रान्झिस्टर्स कमी नॅनो मीटरचे होत जातात. म्हणजेच तेव्हढ्याच जागेत जास्त ट्रान्झिस्टर्स येतात. यामुळे प्रोसेसरची क्षमता वाढते.

यापेक्षा जास्त हेवी काम असेल तर आय ५ प्रोसेसर घ्या. यात चार कोअर असतात. एमडी रायझन ५ सुद्धा चालेल.

आय ७ हा हेवी ड्युटी गेमिंग, अ‍ॅनिमेशन साठी उपयुक्त आहे. म्युझिक, व्हिडीओ एडीटिंगला योग्य आहे. एमडी रायझन ७ हा पर्यायी प्रोसेसर पण घेऊ शकता.

याही पेक्षा हेवी ग्राफिक्स म्हणजे सिलिकॉन ग्राफिक्स प्रमाणे एडिटिंग असेल, हाय एंड म्युझिक + व्हिडीओ + गेमिंग अ‍ॅप्स वापरत असाल तर मग सरळ आय ९ घ्या.

सध्या जनरेशन १३ चालू आहे. हे महाग असतात.

सेकंड हँड लॅपटॉप किंवा मग सरळच पार्ट्स आणून जाणकाराकडून अ‍ॅसेंबल केले तर बेस्ट.
लॅपटॉप शक्यतो ब्रँडेड घ्या. डेस्कटॉप शक्यतो असेंबल्ड घ्या.

एकदा प्रोसेसर ठरला कि मग त्याला मॅचिंग मदरबोर्ड तुम्हाला नेटवर सापडेल. ग्राफिक कार्डची गरज असेल तर ते ही घ्या.

बेसिक ऑफिस, इमेल्स, मनीकंट्रोल व तत्सम वेबसाइटस इतकाच वापर असणार आहे. पिसीवर स्ट्रीमिंग वगैरेच्या भानगडीत ते पडत नाहीत. >>> एव्हढ्यासाठी आय ३ , जनरेशन ७ चालेल.
ड्युएल कोअर पेंटीयम किंवा सेलेरॉन प्रोसेसर पुरेसा आहे. १५ हजाराच्या आत बसेल. टच स्क्रीनची गरज नाही.

फोटोशॉप साठी पेंटीयम, सेलेरॉन ठीक आहे.
ऑडासिटी सारखी हार्डवेअर हंग्री सॉफ्टवेअर्स वापरत नसाल तर लो एंड कॉन्फिगरेशन ठेवा. पुण्यात डीसीसी कडून स्पेअर्स घेतले तर वॉरंटी सहीत येतील. उरला डब्बा. ते पण आता चांगल्या क्वालिटीचे असतात.

Celeron आता डीलर ठेवत नाहीत.

फोटोशॉप बेसिक असेल तर l3 चालेल पण रॅम किमान 8 जीबी घ्यावी. आणि ssd घ्यावी

सध्या यांचे संशोधन करीत आहे.
१)Mini pc/assembled/branded हे प्रकार
२)गरज -कोणते हार्डवेअर कशासाठी?
*विडिओ एडिटिंग?
*नेहमीची कामे करणे -छोट्या शीटस बनवणे,पाहाणे वगैरे?
३)फ्युचर प्रुफ?
४) Microsoft office 2021 preloaded for life असणे . वर्शन तेच राहाते अपडेट होत नाही.
५)स्टोरेज - SSD sata?/ SSD NVME,M2,PCIe?
६)हाई एंड गेमींग नको?/हवे?
यावर यूट्यूबवर बरेच चांगले विडिओ सापडले.
Venom'tech
Sai tech vision
-------
Pc आणि tabs एकमेकांना पूरक असतात. वेगळे आहेत. एक घेतला की काम झाले असे नाही.
__________
तरी सगळा विचार करून एक tab घेतला. ९५% काम होतंय - (स्टाईलमध्ये. म्हणजे pen वाला नाही.हं)२३०००/-

Pages