पालकत्वावरील पुस्तकं

Submitted by कपीला on 17 January, 2013 - 21:28

मराठीमधली तुमचि आवडती parenting पुस्तकं कुठली? का? पुस्तकाचे लेखक, वैशिष्ट्य आणि तुम्हाला झालेला उपयोग ह्याबद्दल देखिल सांगा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या भाच्यांच्या जन्माच्यावेळेस माझ्या बहिणीने जी पुस्तकं वाचली, ती सगळी मी पण वाचली. आणि मला ती सगळी आवडली. 'तोतोच्चान' पासून तांब्यांच्या ' गर्भसंस्कार' पर्यंत. शोभा डे चं 'स्पीड पोस्ट', हातवळणे यांचं ' यशवंत व्हा'.
'तोतोच्चान' मधली शाळा, तिथले शिक्षक मला फार आवडले.

-मुलं घडताना घडविताना - रेणू दांडेकर (उत्कृष्ट)
-घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती- ह वि सरदेसाई (मला तरी बंडल वाटले)
- लता काटदर्‍यांची पुस्तके- माझ्यामते ओके आहेत. जरा जुन्या वळणाचा अप्रोच आहे. पण चालायचेच.
- What to expect the first year- पहिले दोन महिने येड्यासारखे वाचले, बाळीच्या खाण्यात एक थेंब मधाचा/ साखरेचा पडु दिला नाही, माइलस्टोन्स बाबत धा प्रकारच्या फुकट काळज्या केल्या. मग ते पुस्तक जे आत ठेवून दिले ते जिने दिले तिला परत देतानाच खोक्यातून काढले.
- अनिल अवचटांचे लेख/ त्यांच्या मुलींच्या मुलाखती - असेच कुठे कुठे वाचलेले. अजूनी त्यांचा पेरंटिंगबाबतचा अप्रोच मला योग्य वाटतो.
- राजीव तांब्याचे सदर/ पुस्तके- कधीकधी बोर होते. कधी पटते.
- पालकनीती बाबत खूप ऐकुन आहे. प्रत्यक्षात माझ्या हातात दोन-तिन अंक पडले असतील तेवढेच.
- चीपर बाय द डझन
- अरविंदगुप्ताटॉईजवरील संग्रह उत्तम आहे.

मी सध्या हे पुस्तक वाचत आहे. उपयोगी आणि सहजशक्य टिप्स आहेत.
How to Talk So Kids Will Listen & Listen So Kids Will Talk
by Adele Faber, Elaine Mazlish

http://www.goodreads.com/book/show/769016.How_to_Talk_So_Kids_Will_Liste...

नुकतंच बाजारात लिना आशरचं Who Do You Think You're Kidding? हे पुस्तक आलं आहे. लिना आशर कांगारु किड्स प्लेस्कुल चेन चालवते. हे ही मी घेतलं आहे. पहिलं वाचून झालं की हे वाचणार आहे.

याव्यतिरीक्त How to Maximize Your Child's Learning Ability:
A Complete Guide to Choosing and Using the Best Computer Games, Activities, Learning Aids, Toys, and Tactics for Your Child हे ही पुस्तक घरी आणलंय. हे सध्या नवरा वाचतोय. चांगलं आहे म्हणालाय. http://books.google.co.in/books/about/How_to_Maximize_Your_Child_s_Learn...

१० लॉज ऑफ लर्निंग- लेखक स्टिव्हन रुडॉल्फ. अनुवाद- अश्विनी लाटकर. अमेय प्रकाशन.
छोट्टेसे पण खूप छान टिप्स आहेत यांत.

शोभा भागवतांची 'आपली मुलं' आणि 'गारांचा पाऊस'.
एक दृष्टीकोन (पर्स्पेक्टिव्ह) म्हणून वाचायला छान आहेत. रंजक आहेत. पण पालकत्व असं शिकून वाचून येतं का याबाबत मीच साशंक आहे. आपला आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांचा जसा स्वभाव, जसे नातेसंबंध, जशी जडणघडण, जशा तत्कालीन गरजा तसंच आपण वागत जातो आणि जावंही. त्यात काही 'वन साइझ फिट्स ऑल' असं नसतंच.

डॉ. मालती कारवारकरांचं 'वंशवेल'. हे आहारविहारासंबंधी शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चांगलं आहे.

तुम्ही मराठी पुस्तकांबद्दलच विचारलं आहात, तरीही :

वाढीचे आडाखे (माइलस्टोन्स) वगैरेबद्दलच्या माहितीचा आता इन्टरनेटवर सुकाळ आहे. बेबीसेन्टर आणि वेबएम्डी यांच्या साइट्स (आणि आयफोन अ‍ॅप्स) चांगल्या आहेत.
इथे बरीच वर्षं डॉ. स्पॉक यांचं बेबी अँड चाइल्ड केअर बायबलसारखं समजत असत.

>>क आहेत. पण पालकत्व असं शिकून वाचून येतं का याबाबत मीच साशंक आहे.>> प्रचंड सहमत. काल रात्री हे शिर्षक वाचून अगदी हेच वाटलं. पुस्तकं वाचून काही शिकण्यापेक्षा मुलंच आपल्याला शिकवत, घडवत असतात.

सध्या घरात "Parenting by love and logic" आणले आहे. सुरुवात तर छान आहे. विकत घ्यायचा विचार करते आहे.

तेव्ढाच वेळ मुलांना दिला तरी जास्त उपयोग होईल.>>>

मुलांना वेळ तर द्यायचाच. त्याला पर्याय नाही पण अशी पुस्तके वाचून द्रुष्टीकोन बदलतो. काही गोष्टींकडे hyper न होता पहाता येते.

Rama marathe yanch ase ghadawa mulanche vyaktimatva he pan chan pustak aahe

शिवराज गोर्लेंच्या सुजाण पालकत्व अशा काहितरी नावाच्या पुस्तकात विविध मराठी इंग्रजी पुस्तकावर आधारित संकलन आहे वर आलेल्या जवळ जवळ सर्व पुस्तकांचा आधार आहे शिवाय इतर्ही काही त्यांची संदर्भसुची पाहिल्यास खुप नाव मिळतील.
मि वाचल मला आवडल ककत्रएकत्र बरीच माहिती मिळाली
मला उपयोग झाला प्रेझेंट देण्यासाठी
ज्याना दील त्याना आवडल.

डॉ.ज्योत्स्ना पडळकरांचे "वाढू आनंदे" आणि "नवीन बाळ्गुटी पालकांसाठी" ही मला चांगली वाटली.>>>>> त्याचसोबत त्यांचे 'मैत्रिण - वयात येणार्‍या घरासाठी' हे ही छान आहे.