लीव्ह & लायसन्स अ‍ॅग्रीमेंट वाढविताना एजंटला कमिशन द्यावे लागते का?

Submitted by शिप्रा२००८ on 16 January, 2013 - 08:11

आम्ही २ वर्षापुर्वी ठाणे येथे राहण्यास आलो. त्यावेळी एजंटमार्फत भाड्याने घर घेतले जे फक्त ६ महीन्यांकरिता होते. तरीही एजंटने आमच्याकडुन १ महीन्याचे भाडे कमिशनपोटी घेतले. कमिशन कमी करण्यासंदर्भात त्याचे म्हणणे होते कि घर ११ महिन्यांकरिता दिले काय किंवा ६ महिन्यांकरिता माझे कष्ट सारखेच होते. ते ६ महीने संपल्यानंतर घरमालकांच्या संमतीने २ महीने त्याच घरात वाढवुन घेतले. त्याचीही कल्पना त्या एजंटला दिली होती. त्यानंतर त्याच एजंटमार्फत त्याला रितसर कमिशन देउन दुसरे घर ११ महिन्यांकरिता भाड्याने घेतले. आता त्या कराराची मुदत संपली आहे. आमचे व घरमालकांचे संबंध सामंजस्याचे असल्याने त्यांना करार वाढविण्यासाठी काहीच हरकत नाही. पण आता एजंट परत कमिशन साठी मागे लागला आहे. त्याचे म्हणणे आहे की प्रत्येक वेळी (करार वाढविताना) असे कमिशन द्यावेच लागेल व असा ठाणे इस्टेट असोसिएशनचा नियम आहे. घरमालकांचाही कमिशन देण्याला विरोध आहे. पण ते कोणाच्याही बाजुने मध्ये पडु इच्छीत नाहीत.

खरोखर असा काही नियम आहे का? असलाच तर तो नियम कायदेशीररित्या वैध आहे का? त्याला कमिशन द्यावे का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एजंट तुमच्या बरोबर आला होता का अ‍ॅग्रीमेंट करताना? आलेला असेल तर त्याला अ‍ॅग्रीमेंटची शेवटची तारीख माहिती असणार त्यामुळे तो मागे लागेलच... कारण आता तुम्ही नवीन अ‍ॅग्रीमेंट डायरेक्ट करणार म्हणजे त्याचे कमिशन गेले..

एक पर्याय आहे.. घरमालकांना घर भाड्याने द्यायचे नाही असे एजंटला सांगायला सांगा.. आणि तुम्ही त्याच्या नकळत पुढचे अ‍ॅग्रीमेंट करा.. जर सहज शक्य असेल तर हे जमू शकेल.. परत जर अ‍ॅग्रीमेंट रिन्यू करायला लागले तर तेव्हा सुद्धा त्याला काही कळणार नाही...

शिप्रा, हे एजंट्स कायदेशीर नाहीतच मुळी... मलातरी असं वाटतं... कारण घर आपणच शोधतो, ते मात्र दाखवलेल्या घराच्या एक महीन्याच्या भाड्यापेक्शा जास्त कमिशन खाणार... मी सुद्धा भाड्याच्याच घरात आहे, आणि हा त्रास आहेच!

मला स्वतः ला तरी हे पटत नाही...!

कुणी यावर जास्त माहीती देऊ शकेल का?

अधिकृत एजंट असतात का? त्यांच्याकडे काय प्रूफ मागावं?
मी मागे हा घाट घातला होता, पण या सर्व लोकांची साखळीच असते... ते मग ठरवून तुम्हाला भिकार घरे दाखवतात, अडवतात प्रत्येकवेळी... Sad

खरं म्हणजे हे चुकिचेच वाटते.मला याविषयी कायदा काय ते माहित नाही. पहिल्या वेळेला ठिक आहे(कारण त्याने घर शोधुन दिले) पण दर वेळेला असा अट्टाहास करणे चुकिचे आहे. घर हे त्या घरमालकाचे,राहणार आपण आणि एजंट प्रत्येक वेळी कसे कमीशन मागु शकतो.

पण या सर्व लोकांची साखळीच असते... > बरोबर. आणि त्याच जोरावर ते भाडेकरुंना त्रास किंवा धमकी देतात.

खरोखर असा काही नियम आहे का? असलाच तर तो नियम कायदेशीररित्या वैध आहे का? त्याला कमिशन द्यावे का? > एजंट कडे लायसनची मागणी करा. जर तो लायसन धारक नसेल तर तुम्ही बिनधास्त घरमालकाच्या परवानगी नुसार अ‍ॅग्रीमेंट वाढवू शकता.

सर्वांना धन्यवाद
एजंट तुमच्या बरोबर आला होता का अ‍ॅग्रीमेंट करताना?>>> अ‍ॅग्रीमेंट त्यानेच करुन दिले होते. एजंट याच सोसायटीत राहत आहे. त्यामुळे त्याला खोटे सांगुन येथेच अ‍ॅग्रीमेंट वाढविले तरी त्याला कळेलच.

शिप्रा, हे एजंट्स कायदेशीर नाहीतच मुळी... मलातरी असं वाटतं... >>> मलाही हेच वाटते पण खात्री करण्याकरीता येथे प्रश्न विचारला.

एजंट कडे लायसनची मागणी करा. जर तो लायसन धारक नसेल तर तुम्ही बिनधास्त घरमालकाच्या परवानगी नुसार अ‍ॅग्रीमेंट वाढवू शकता.>>>> पण जर तो लायसन्स धारक असेल तर कमिशन द्यावे का? कारण त्याने असे सांगितले आहे की तो ठाणे इस्टेट एजंट असोसिएशनचा सदस्य आहे.

मला असे वाटते कायद्याप्रमाणे ज्या व्यक्तींमध्ये करार होतो त्या व्यक्तींवर बांधील असतो. करार माझ्यात व घरमालकांमध्ये होता. एजंट मध्ये व माझ्यात कोणत्याही प्रकारचा करार नाही. मी त्याला एका व्यवहारासाठी नेमले होते तो व्यवहार झाला त्याला मी त्याचे कमिशन दिले. संबंध संपला. आता मला त्याला नेमणे आवश्यकच वाटत नाही.
ठाणे इस्टेट एजंट असोसिएशनचा जो काही नियम आहे तो माझ्यावर बांधील असण्याचा प्रश्न नाही कारण मी त्याची मेंबर नाही. कोणताही करार करताना जर काही नियम असतीलच तर ते सुरुवातीलाच स्पष्ट करावे लागतात. त्याप्रमाणे एजंटने आम्हाला नियमांची कल्पना आधी द्यायला हवी होती.
त्याने शनिवारी आम्हाला बोलावले आहे. त्यावेळी हे असे बोलणे योग्य होइल का? किंवा त्यांचे नियम लेखी स्वरुपात मागावेत का? कारण मला तरी असे वाटते की हे नियम कायदेशीर नसणार.

मला असे वाटते कायद्याप्रमाणे ज्या व्यक्तींमध्ये करार होतो त्या व्यक्तींवर बांधील असतो. करार माझ्यात व घरमालकांमध्ये होता. एजंट मध्ये व माझ्यात कोणत्याही प्रकारचा करार नाही. मी त्याला एका व्यवहारासाठी नेमले होते तो व्यवहार झाला त्याला मी त्याचे कमिशन दिले. संबंध संपला. आता मला त्याला नेमणे आवश्यकच वाटत नाही.
ठाणे इस्टेट एजंट असोसिएशनचा जो काही नियम आहे तो माझ्यावर बांधील असण्याचा प्रश्न नाही कारण मी त्याची मेंबर नाही. कोणताही करार करताना जर काही नियम असतीलच तर ते सुरुवातीलाच स्पष्ट करावे लागतात. त्याप्रमाणे एजंटने आम्हाला नियमांची कल्पना आधी द्यायला हवी होती.
त्याने शनिवारी आम्हाला बोलावले आहे. त्यावेळी हे असे बोलणे योग्य होइल का? किंवा त्यांचे नियम लेखी स्वरुपात मागावेत का? कारण मला तरी असे वाटते की हे नियम कायदेशीर नसणार.

>>>>> बरोबर आहे

तुम्ही भाड्याने रहाताय म्हणजे तुम्ही लोकल नाही... मालक लोकल आणि एजंटही लोकल... त्यामुळे मालक तुम्हाला साथ देणार नाही, हे नक्की.. शिवाय मालकाचे नुकसान हे नफ़्यातील नुकसान आहे, त्यामुळे तो त्याला पैसे आनंदाने देईलच , शिवाय तुम्ही कधीही जागा सोडू शकता... त्याला एजंटवर्च अवलंबून रहावे लागणार, तुमच्यावर नाही...

तसेही , परप्रांतीय म्हणता म्हणता आता इतर मराठी लोकानाही हाकलणे सुरु ज़ालेले आहेच...

तेंव्हा जे चार पैसे मिळवायची संधी आहे, ती दोन चार हजारासाठी वाया घालवू नका.. सहा महिने सिनेमे बघू नका.

--- मराठी असूनही लोकल नसल्याने हाकलला गेलेला आंबा.

शिप्रा, सानपाड्याला आमच्याकडे पण एजंट असेच पैसे मागत आला होता. त्याला आम्ही अ‍ॅग्रीमेंट केलेले नाही. नविन घर शोधतोय मिळाले की हे सोडणार. अप्रेझलची वाट बघतोय, तोपर्यंत थांबलोय अशा काहीबाही शेंड्या लावल्या होत्या दोन तीन महिने. कागदोपत्री अ‍ॅग्रीमेंट वाढवून घेतले नव्हते. नंतर त्या एजंटने घरमालकाकडे तगादा लावला होता, घरमालक भायखळ्याला इन्स्पेक्टर!! त्याने बरोबर सुनावले होते. मग नंतर काही तो फिरकला नाही. नंतर दुसर्‍या वर्षाचे अ‍ॅग्रीमेंट संपत आल्याबरोबर लगेच येऊन गेला होता. तेव्हा आम्ही मुंबईच सोडून निघत असल्याने त्याला काही इंटरेस्ट उरला नाही.

तुमच्यात आणि घरमालकाकडे सामंजसपणा असेल तर तो एजंट काय करणार.. तुम्ही तुमची कागदपत्र बनवून घेतली तर माझ्यामते तरी कमिशन पुन्हा द्यायला नकोय... तरीसुद्धा महेश यांनी सुचवल्याप्रमाणे एका ओळखीच्या वकीलाकडून अधिक माहिती मिळवावी..

त्याने शनिवारी आम्हाला बोलावले आहे. त्यावेळी हे असे बोलणे योग्य होइल का? किंवा त्यांचे नियम लेखी स्वरुपात मागावेत का? कारण मला तरी असे वाटते की हे नियम कायदेशीर नसणार. >> पण जायलाच पाहिजे असे आहे का.. हे तुम्ही आणि घरमालकांनी ठरवा नि तुम्हीच कायदेशीर कागदेपत्रे बनवून घ्या.. बाकी पुन्हा त्याच परिसरात भाडयाने घर बघण्याची गरज पडणार नसेल तर सरळ त्या एजंटकडे दुर्लक्ष करा..

बेन्गलोर मधे बरे आहे बाबा, माझ्या तरी ऐकण्यात असे आले नाही की एजंट पुन्हा कमिशन मागतात.

सरळ वकील आणि पोलिस यांच्या ओळखी काढा आणि जमले तर त्यांनाही बरोबर घेऊन जा.
बिन ओळखीचे वकील आणि पोलिसांकडे जाऊ नका, नाहीतर एजंटला द्यायचे कमिशन यांना द्यावे लागेल.

एजंट ला कमीशन हे घर शोधण्या साठी दिलेले असते त्याने मध्यस्ती केलेली असते म्हणून तेच घर शोधण्यासाठी त्याला परत कमीशन देण्याची गरज नाही

,

सशा, अनुमोदन.
शिवाय,
यातिल कोणताच व्यवहार, लिखित करार एजण्टबरोबर केलेला नसेल, तर कायदेशीर नाही.
नॉर्मली घरमालक एजण्ट्स ना जागेच्या उपलब्धतेबाबत सान्गुन ठेवतात. पण घरमालक सहसा पाच पैशेही एजण्टला देत नाहीत. एजण्ट त्याने सुचविलेल्या भाडेकरुलाच मालकाने घर भाड्याने दिले तर भाडेकर्‍याकडून एक महिन्याचे भाडे कमिशन म्हणून घेतो.
वर सशाने सान्गितल्याप्रमाणे, तोच करार वाढवुन्/वा नविन करुन तिथेच मुक्काम वाढवला, तर एजण्टला पाच पैशेही देण्याचि गरज नाही.
पण, यात मालकाचे हितसंबंध (तुमच्या नन्तर नविन भाडेकरू मिलण्याकरता) गुन्तलेले असल्याने तो कदाचित आग्रह करू शकतो. मालकाचे दृष्टीने एखादा भाडेकरू 'टाकाऊ' लायकीचा निघाल्यास त्यास वेळेआधी हुसकावुन लावण्यास 'एजण्टान्चाच' उपयोग होऊ शकतो जर मालक व त्यात तोन्डी/लिखित करार असेल.
शिवाय एजण्टान्च्या मान्दियाळीत तुमचे नाव काळ्या यादीत टाकले जाऊन नन्तर तुम्हाला वाळीत टाकले जाण्याचा धोका असतो. तेव्हा जो काय निर्णय करायचा तो स्वतःच्या सहनशक्ती व दुसर्‍याला धडा शिकविण्याची तुमची 'तयारी' यास अनुसरुन घ्यावा.
हे एजण्ट (व एकन्दरीतच दलाली करणारे सर्वच) म्हणजे मढ्याच्या ताळवेवरचे लोणी खाणारे असे माझे मत.

माझ्या अनुभवावरुन सांगते . मी नुकतेच एक घर भाड्याने दिले आहे . आधीच्याच भाडेकरुला. त्यावेळी रजिस्टर केले होते . आणि आत्ताही रजिस्टरच करायचे होते. पण तुम्ही जेव्हा रजिस्टर करायला जाता हवेली ऑफीस्मधे तेव्हा आजिबात कॉपरेट करत नाहीत. कारण त्यांना काही मिळणार नसते. एजंट वकिल गाठुन देतो आणि मग पुढची कामे खुप पट्पट होतात. फाईट करण वगैरे गोष्टी म्हणायला ठीक आहेत पण खरच एवढा वेळ आणि एनर्जी आहे का ? यावर खुप काही अवलंबुन राहील. हे मा वै म.

नंदिनींप्रमाणेच आमचाही घरमालक पो.इन्स्पेक्टरच आहे. फक्त तो आताच इन्स्पेक्टर झालेला असल्याने फार अरेरावी करणारा नाही. त्याने आम्हाला सांगितले आहे कि मला ही हे पटत नाही पण तुम्ही आणि तुमचा एजंट बघुन घ्या.
एजंटने घरमालकांना फोन केला तेव्हा ही त्यांनी एजंटला स्पष्ट सांगितले आहे कि मी तुला नेमले नाही तुम्ही आणि भाडेकरु बघुन घ्या.
त्यामुळे सद्ध्या ११ महिने तरी आम्ही येथे कमिशन न देता राहु शकतो. पण
>>शिवाय एजण्टान्च्या मान्दियाळीत तुमचे नाव काळ्या यादीत टाकले जाऊन नन्तर तुम्हाला वाळीत टाकले जाण्याचा धोका असतो>>>> हिच भीती वाटत आहे.

>>> हिच भीती वाटत आहे. <<<<
'भित्यापाठी ब्रह्मराक्षस!' अहो सोडा ती भिती अन येत्या अकरा महिन्यात असले छपन्ना एजण्टस्शी सम्पर्क करा... धन्दा प्रत्येकाला हवाय, फक्त तुमच्या जीभेवर सरस्वती अन साखर हवी! Happy
तुम्हाला शुभेच्छा !
सायली, अनुमोदन.
मी आयुष्यातला बराच काळ विविध शहरातून भाडेकरू म्हणूनही जगलोय, व आता बापाचे घरात मालक म्हणूनही जगतोय. तर्‍हतर्‍हेचे अनुभव भाडेकरू व मालक म्हणून आहेत.
मात्र मी कधीही कुणाहीबरोबर लिखित करार केलेला नाही.
विश्वास असेल, तर ठेवा! हे मालकान्ना, किन्वा विश्वास असेल तर रहा - त्यातुन उपटसुम्भपणा केलात तर साम-दाम-दण्ड वापरून निपटून काढायला मी समर्थ आहे ही सूचना भाडेकरुन्ना!. भाडेकरुन्चे तर एकेक किस्से आहेत माझ्याकडे, आजही आठवले तरी अन्गावर काटा उभारतो! पण त्याचा तपशील असा लिखित स्वरुपात कधीच मान्डता येणार नाही.

खरतर एजन्ट्ला, अग्रीमेन्ट पुन्हा रिन्यु करताना कमिशन देण्याची काहीच गरज नाही
एक मालक म्हणून मलाही हे खटकल.
पण आज्काल पोलिस वेरिफिकेशन आणी त्याना (पोलिसाना) हव्या असलेल्या नोटराईज्ड अथवा रजिस्टर अग्रीमेन्ट साठीच एजंट लागतो. कारण तो हे सगळ हातात आणून देतो.
हे मालकाला सोयीचे असते कारण ही गरज मालकाची आहे आणी त्यासाठी मालकाला काही पैसे द्यावे लागत नाहीत,
आणी त्यामुळे मालक मधे पडत नाही
मला असे वाटते की फक्त करार वाढविताना मात्र पूर्ण एक भाडे इतके कमिशन असू नये
पण वर म्हटल्याप्रमाणे एजन्ट ही सुद्धा एक लॉबी आहे आणी त्यान्ची अरेरावी असू शकते
अलीकडेच वाचलेल्या एका नियमाप्रमाणे एजन्ट्ला सर्विस टॅक्स भरावा लागतो मग कमिशनबाबत काही कायदा आहे का?

करार वढवताना एजंटची मदत घेतली तर कमिशन द्यावे लागते,
तुम्ही आणि मालक परस्पर नोंदणी करणार असाल तर कमिशन देण्याचा प्रश्नच येते नाहि

१. एजंट खोटे बोलत आहे
२. त्याला ठाणे इस्टेट एजंट आसो. चा लेखी पुरावा मागा
३. तो बोलावणारा कोण?
४. कशाला जाताय भेटायला?
५. त्याच्या सारखे छप्पन्न एजंट आहेत आणि ठाण्यात भाड्याने द्यायचे फ्लॅट्स उदंड आहेत
६. असा कुठेही कायदा नाही
७. माझे ऑफिस ही अंशतः हा बिझनेस करते. आज पर्यंत आम्हाला तरी कोणी करार वाढवला तर कमिशन दिलेले नाही
८. मालकाची ना नाही ना... मग तुम्हाला तिकडे जाणे गरजेचे नाही.
९. आता जर तो गुंड असेल किंवा तसे काही न्युसन्स वॅल्यु असेल, तर मात्र नीट विचार करा
१०. असे कोणी कोणा कस्ट्मर ला बॅन करत नाही.
११. कुठ्ल्या भागात रहाता तुम्ही....
१२. ठाणे इस्टेट एजंट असो. चा कॉन्टॅक्ट घ्या....
http://www.justdial.com/Mumbai/Thane-Estate-Agents-Association-%3Cnear%3...

त्यांना फोन करा. नीनावी फोन करुन वा मित्रा करवी फोन करुन आधी माहिती काढा. तसा काही ठराव नसेल तर त्या एजंट बद्दल तक्रार करा. ठराव / नियम असेल तर त्यांना त्या नियमाची कायदेशीर बाजु प्रुव्ह करायला सांगा.

मोकिमी.....+ १००००००००००००००००००००.
जबर्दस्त प्रतिसाद. माझ्या डोळ्यासमोरच उभ्या राहिलात तुम्ही, असे ठणकावुन सांगताना

मुग्धानंद....

तुम्ही म्हणालात म्हणजे कायदेशीर रित्या माझे म्हणणे बरोबर असणारच... ( मुग्धानंद लॉयर आहेत)

आत्ताच माहितीतल्या दुसर्‍या एजंटशी आणि ऑफिस मधे हे डेस्क जो सांभाळतो त्याच्याशी बोलणे झाले. दोघेही म्हणाले असले काहीही नाही... उगाचच त्या माणसाच्या जाळ्यात फसु नका... तुम्ही भेटायला गेलात तर अजुन घाबरवेल तो....

अजून एक प्रश्न - एजंटला पहील्या वेळेस तरी पैसे का द्यावे लागतात? तेपण १ भाडं मिनिमम...! बरेच ठीकाणी दीड वा दोन भाडीसुद्धा घेतात... त्यांच काम तर फक्त घर दाखवायचं असतं ना? अ‍ॅग्रीमेंट वगैरे करून देणार असेल तो तर ठीक आहे पण तरी सुद्धा १ भाडंही मलातरी जास्तच वाटतयं...

दुसरा काही ऑप्शन नसल्यानी मी आता याच महिन्यात भाडेकरार नवीन केला + त्याच रजिस्ट्रेशन + एजंटला १ भाडं दिल! Sad

मी माझा ठाणे येथील एक फ्लॅट गेल्या ६ वर्षांपासून भाड्याने दिला आहे (आजवर ३ भाडेकरू झाले). शेवटचा भाडेकरू मे २०१० पासून एका स्थानिक एजंटाकडून मिळाला. पहिल्या ११ महिन्याच्या लीजचे एक महिन्याच्या भाड्याइतके कमिशन त्याला दिले.

त्यानंतर एकदा ११ महिन्यांकरीता लीज रेन्यू केले - एजंटाला वगळून!

त्या भागात जाणे-येणे होते. कधी-मधी तो भेटतो. हसतो आणि निघून जातो. कमिशनचे नाव काढत नाही!

आता दुसरे लीज ह्या महिन्याअखेर होईल - अर्थात एजंटाला वगळून!!

शेवटी करार तुम्ही आणि घरमालक यांच्यात आहे. ठाण्यात कोर्ट नाक्यावर अनेक स्टेंप्-पेपर वेंडर आहेत. त्यांच्याकडे घरमालकाला जायला सांगा (त्याला माहितदेखिल असेल). सगळे काम अगदी व्यवस्थित होते.

मोकीमी.... कस्ली दणदणीत फैर झाडलीत! Lol
अन शिवाय, "ठाणे इस्टेट एजंट असो." अशासारख्या गल्लोगल्ली उगविणार्‍या/स्थापलेल्या संस्थान्चे बागुलबुवा बाळगण्याची गरज नाही, कारण या संस्था, संबंधित घटकान्नी एकत्र येऊन आपल्या हितसंबन्धापुरत्या मर्यादित ठेवलेल्या अस्तात, त्यान्चे ठराव/निर्णय वगैरे बाकी जनतेवर ते कायदेशीररित्या लादूच शकत नाहीत. हां, पण त्यान्चि ब्रिगेडी झुन्डशाहीच असेल, तर मग काय बोलावे? तरीही, कायदेशीररित्या त्यान्चे निर्णय, त्यान्चे सभासदान्पुरते मर्यादित असतात.

हं... आता लग्नाचा वाढदिवस आला की गुरुजीही पुन्हा दक्षिणा मागतील असं दिसतयं..

( गुरुजी हा शब्द लग्न लावणार्‍या सर्व धर्मगुरुना , सरकारी नोंदणी अधिकार्‍यांना उद्देशून आहे. यात जातपात आणू नये. )