७ व्या भारतीय डिजिटल अधिवेशनात मायबोलीचा समावेश.

Submitted by Admin-team on 15 January, 2013 - 17:08

मायबोली आणि मायबोलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट. ७ व्या भारतीय डिजिटल अधिवेशनात मायबोलीचा समावेश असणार आहे. मायबोलीचे संस्थापक अजय गल्लेवाले (webmaster) यांना तिथे "Local language a game changer" या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रीत केले आहे.

हे अधिवेशन १६/१७ जानेवारीला दिल्लीत भरत आहे. अधीक माहीतीसाठी हा दुवा पहा.
http://www.iamai.in/events/ids/speaker.aspx

IAMAI.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीचा उचित सन्मान आता होऊ लागलेला दिसत आहे.

त्याकरता अजय ह्यांचे हार्दिक अभिनंदन!

मायबोलीचा प्रयोग, सामाजिक-अनुबंध-सुदृढतेच्या महाजालीय प्रयासांतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो यशस्वी करून दाखविण्यात अजय ह्यांची भूमिका सूत्रधाराची राहिलेली आहे. ह्या अद्भूत प्रयोगाचा सूत्रधार म्हणून माझ्या आणि समस्त मायबोलीकरांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा!

मायबोली प्रतिपश्चंद्रलेखेव सदोदित वर्धिष्णू राहो, हीच सदिच्छा!

अभिनंदन व शुभेच्छा.
सॅम पिट्रोडाने भारतात लावलेल्या रोपट्याला आतां आलेल्या सुंदर फुलांपैकी एक - 'मायबोली' !!!

अभिनंदन अजय !
मित्तल आणि मित्तल यांच्या रांगेत बसल्याबद्दल. Happy
भाषण ऐकायला मिळावे असे फार फार वाटते आहे.

अजय, अभिनंदन आणि शुभेच्छा!
भाषणातील विचार वाचायला/ऐकायला/पहायला आवडेल.

मन:पूर्वक अभिनंदन. मायबोलीचा झेंडा दिल्लीपर्यंत गेला Happy

भाषण कधी आहे? आज की उद्या? भाषणातील विचार इथे ऐकायला/वाचायला आवडतील.

वा वा वा वा, मनापासून अभिनंदन....
अजय, तुम्ही तयारी काय आणि कशी करताय ह्याबद्दल वाचायलाही आवडेल. >>>> +१००....
भाषणातील विचार वाचायला/ऐकायला/पहायला आवडेल. >>>>> +१००...

Pages