अंदमान आयलंड

Submitted by जिवेश on 13 January, 2013 - 08:50

मायबोली परिवारास माझा नमस्कार. माझ नाव जीवेश म्हात्रे. मी Mech Engg आहे. ट्रेकिंग , छायाचित्रण हा माझा छंद आहे. माझ्या अंदमान सफरीतील निवडक प्रचिंचा संच तुमच्या समोर सादर करताना मला फार आनंद होत आहे.

पहिल्या भागात मी काही निवडक प्रचि तुमच्या समोर आणत आहे. हे सर्व फोटो " motion blur photography OR long exposure photography " ह्या माझ्या आवडत्या पद्धतीने काढले आहेत. हि पध्धत मी पहिल्यांदाच वापरली आहे. अंदमान सफरीचे वर्णन मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहे., तोपर्यंत हि झलक.

सदर फोटो प्रदाशित करण्यासाठी आमचा मित्र मायबोलीकर "जिप्सी" याने केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद.

camera used : canon 550D
lens used : canon ef-s 10-22mm.
ND 400mm neutral density filter 77mm & tripod.
exfi data : 30sec shutter speed, ISO 100, f/8, 10mm focal length
.
.
.
.
.

प्रचि १.

प्रचि २.

प्रचि ३.

प्रचि ४.

प्रचि ५.

प्रचि ६.

प्रचि ७.

प्रचि ८.

प्रचि ९.

प्रचि १०.

प्रचि ११.

प्रचि १२.

प्रचि १३.

"long exposure photography " संबंधी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक तपासा.

http://www.photographyoffice.com/2011/08/gorgeous-long-exposure-night-se...

http://jimworrall.wordpress.com/2012/10/19/how-to-use-the-nd400-for-dayt...

http://caroline1photography.wordpress.com/2011/02/06/long-exposure-with-...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बोलावं. एकसे एक निसर्गचित्रं मांडली आहेत.

जिवेश, आपलं मायबोलीवर स्वागत. Happy जिप्सीला धन्यवाद. Happy

अप्रतिम सुंदर फोटो. सगळेच फार सुरेख काढलेत.
खडकांचे मस्त ! मला आठवा सर्वात जास्ती आवडला.
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद Happy

ये तो सिर्फ झांकी है, पुरी पिक्चर अभी बाकी है Happy

जिप्सीला आता एक स्पर्धक आलाय>>>>धनश्री, स्पर्धक नाही अजुन एक "मित्र" आलाय. Happy Happy

जिवेश, माबोवर सुस्वागत!!!
काय फोटो आहेत एकेक.. डोळे आणी मन भरतच नाहीये.. कितीदा पाहिले!!
जिप्स्या.. जिवेश ला इथे इन्ट्रोड्यूस केल्याबद्दल धन्स रे.. त्या चौथ्या प्रचि ला तुझाही टच आहेसा वाटलं.. Happy

लोकहो.. आता जिप्सी आणी जिवेश करता कौतुकाची , तारीफेची वेगवेगळी विशेषणे शोधण्याच्या कामावर लागा...

सुंदर फोटो.. अगदी अप्रतिम आलेत सगळे फोटो.. फॉरवर्डॅड मेल्स मध्ये असतात अगदी तस्सेच.. अंदमान इतके सुंदर दिसते हे माहितच नव्हते.

खल्लास !
ओपनिंग मध्ये एक्दम सेंचुरी मारली तुम्ही..>> +१००००
एक से एक सुंदर फोटो. पुढच्या भागाची वाट पाहतेय.

धन्यवाद जिवेश , इतक्या छान फोटोमधील अंदमान सफरीसाठी !
अप्रतिम फोटोग्राफी ! Happy

जिप्स्या, तुच आणलस ना या मित्राला इथे ... आता तुझेच मार्केट डाउन होणार बघ ! Wink

मायबोलीवर स्वागत... मस्त आहेत सगळेच फोटोज...

@ योगेश - मस्त अ‍ॅडिशन आहे मायबोलीत जिवेशची... Happy

@ जिवेश - 'जीवेश' असं हवं होतं का? आधीच Light 1 घ्या... उगाच नको तिथे नको तो प्रश्न विचारल्याबद्द्ल...

वाह!!! सगळेच फोटो अप्रतिम. जणू काही आपण तिकडे प्रत्यक्ष आहोत अस वाटतय. मस्तच

एक सुचना: वॉटरमार्क जमलेत तर टाका नाहीतर दुसरा कोणीतरी चोरी करेल

खरंय रे बाबा सगळ्यांचं - एकदम कातिल, जीवघेणे असेच फोटो आहेत सगळे....

लोकहो.. आता जिप्सी आणी जिवेश करता कौतुकाची , तारीफेची वेगवेगळी विशेषणे शोधण्याच्या कामावर लागा... >>>> वर्षुतै ला +१०००.... माझ्याकडील सगळी विशेषणे पहिल्या सेंच्युरीलाच सलाम करताना संपली रे......

प्र.चि. ४ सर्वात जास्त आवडले. ND filter शिवाय अ‍ॅपर्चर अजुन जास्त क्लोज करुन (f/11 वगैरे) व exposure 30 sec. च्या ऐवजी २ / ५ से. पर्यंत डिटेल्स जास्त उठुन दिसतील (असे माझे वैयक्तिक मत). स्टेशनरी लँडस्केपमध्ये मोशन ब्लर करायची गरज तुम्हाला का भासली? उलट वाईड अँगलमध्ये शटर स्पीड वाढवून जास्त clarity येऊ शकेल. तुमचा प्रयत्न एक वेगळा प्रयोग म्हणून ठीक आहे. अन्यथा इतके long exposure star trail साठीच योग्य होईल. Happy

जिवेश, फारच सुंदर आलेत फोटोज्. तिथले प्रवास वर्णन वाचायला अजुन मजा येईल. प्रतिक्षेत...

Pages