.. नेमका शुद्धीत मी (तरही)

Submitted by वैवकु on 12 January, 2013 - 11:52

___________________
दिलेला तरह जसाच्या तस पाळण्याचे अनेक प्रयत्न केले पण मला हवे तसे जमलेच नाही मग जरासा बदल केला आहे .....आणि आलो नेमका शुद्धीत मी
क्षमस्व!
__________________

एवढासा राहिलो शिलकीत मी
आणि आलो नेमका शुद्धीत मी

मी असा अन् मी तसा.... म्हणतेस तू
तो कसा नाही मला माहीत 'मी'

हे तुझे आकाशही सामावते
त्या, मनाच्या सानुल्या खिडकीत मी

भार स्वप्नांचा उरी ...झुकलो पुढे
वाकलो नाही तसा पाठीत मी

उफ् ! मला पोचायचे होते जिथे
तेथुनी चढलोय ह्या गाडीत मी

नाहतो घामात विठ्ठल माझिया
राबतो त्या 'सावळ्या माती'त मी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे तुझे आकाशही सामावते
त्या, मनाच्या सानुल्या खिडकीत मी

शेर आवडला.
शब्द पुरेसं बोललात तेव्हा चिन्हांचा कमी वापर शक्य असावा.

उफ् ! मला पोचायचे होते जिथे
तेथुनी चढलोय ह्या गाडीत मी.. हा शेर आवडला. बाकी ठीकठाक.

भारतीताई ,मुटे सर ,समीरजी ,अरविंदजी ,प्राजू मनःपूर्वक आभार

समीरजी आपले म्हणणे पटले

मुटे सर खूप दिवसानी तुम्हाला गझल विभागात पाहून खूप खूप आनंद झाला

पुनश्च धन्स सर्वाना