मी मेल्यावरही ...................

Submitted by संजय४५ on 11 January, 2013 - 07:36

मी मेल्यावरही

तू एकही अश्रू ढळू नको देऊस

तो जसा अनमोल आहे आज तसाच राहील तेव्हाही

आजच ठीक आहे त्या अश्रूला झेलण्यासाठी

माझी ओंजळ तरी आहे पण तेव्हा तीही नसेल

तू येऊच नकोस तेव्हा मला भेटायला

नाहीतर मी तुझ्यावर केलेलं पण तुला कळूनही न उमजलेल

माझं प्रेम तुला आठवत बसेल

न तुझ्या डोळ्यातन पूर वाहील अश्रूंचा

कदाचित माझी चिता विझून जाईल

नाहीतर त्या स्पर्शान प्राण येईन पुन्हा शरीरात

मला तेच नकोय

मी मेल्यानंतर

तुझ्यावर केलेल्या साऱ्या कविता

ज्या तू कधी वाचल्याच नाही

त्याच्या शब्द न शब्दाची पारायण कर

मग तुला कळेल माझं खंर प्रेम

जेव्हा तुला एकट जगण असह्य होईल

न माझी गरज भासेल

तेव्हा आकाशात डोळे वर करून बघ

तुला मी दिसेल

कारण तुझी कुठलीही वेदना मला तेव्हाही

सहन होणार नाही

तेव्हा तुझा हात दे माझ्या हातात

मी घेऊन जाईन तुला एका नव्या विश्वात

जेथे असेल फक्त माझं प्रेम

फक्त माझं प्रेम .

संजय एम निकुंभ , वसई

दि. ९.१०.१२ वेळ : ६.५० संध्या .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे
जेव्हा तुला एकट जगण असह्य होईल
न माझी गरज भासेल>>>(न)आणि माझी गरज भासेल
अस अभिप्रेत आहे का?
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!