Submitted by संजय४५ on 11 January, 2013 - 07:31
भावनेची
कुठलीही
ओळख नसतांना
मनात
कुठलीही
जाणीव नसतांना
तुझी उफाळलेली वासना
शांत करण्यासाठी
तू
माझ्यावर
झडप घालतोस
जे काही
घडतं
ते पाप
तुझ्या हातून
मग
कळत नाही मला
माझं शील
न पावित्र्य
कसं
भ्रष्ट होतं
नंतर मी
तळमळत रहाते
जगाच्या नजरा
झेलत रहाते
गुन्हेगार असल्यासारखी
न तू
मस्त मोकाट सुटतोस
पुन्हा
नवीन सावज
कुठे मिळेल
त्या मार्गावर
फक्त
कां तर
तू पुरुष आहे म्हणून .
संजय एम निकुंभ , वसई
दि . ६.१.१३ वेळ : ८.०० स.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा