आयुष्य गझल झाली

Submitted by उमेश वैद्य on 8 January, 2013 - 10:02

आयुष्य गझल झाली

आयुष्य गझल झाली मी आळवीत गेलो
मतला ठरीव होता मिसरे रचीत गेलो

जे घातलेस कोडे सुटलेच ना कधीही
तू शिकविले तसे मी ते सोडवीत गेलो

कोणीकडून आला पक्षी कुण्या दिशेचा
हासून क्षेम त्याचे तरिही पुशीत गेलो

आला असाच कोणी भेटीस आज माझ्या
म्हणतात काळ ज्याला, त्याच्या कुशीत गेलो

होते जिवंत त्यांनी मृत्यूस दान केले
यांच्या मुठीमधूनी त्या ओंजळीत गेलो

उ. म. वैद्य २०१२.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होते जिवंत त्यांनी मृत्यूस दान केले
यांच्या मुठीमधूनी त्या ओंजळीत गेलो
>> व्व्व्वा!!!!!!!!!

जे घातलेस कोडे सुटलेच ना कधीही
तू शिकविले तसे मी ते सोडवीत गेलो
>>> अजून नेमका हवा होता... (जे शेरात लिहिलंय तेच अभिप्रेत असल्यास मग नाही आवडला Happy )

वाह वाह उमेशजी
खूप खूप आवडला शेर-न् -शेर !! 'पक्षी' जरा कमी आवडला

वाह वाह मस्तच!!

अजून येवूद्यात

___________________________________

कोणीकडून आला पक्षी कुण्या दिशेचा
हासून क्षेम त्याचे तरिही पुशीत गेलो

दुसर्‍या ओळीत मला काहीतरी कमी पडले आहे असे वाटले पण जरासाच ! मुळात आपण असे का म्हणत आहात / नेमके काय म्हणत आहात हे मला समजले नसेल
तरिही पुशीत गेलो इतकाच भाग जरा खास नाही वाटला
आपण हा शेर खुलवून सांगाल का ? हा "पक्षी" काय सूचीत करतो आहे ? कोण आहे हा ?

वैभव आपल्या जिज्ञासेचे निर्वाण' झाले की नाही. काहीच कळले नाही. आपल्याला वि. पू. केली होती त्याची पोच मिळाली नाही.