कविता आणि कवी

Submitted by मंदार खरे on 8 January, 2013 - 04:31

कविता म्हणजे घट कवी गोरा कुंभार
कल्पनांची माती तिंबून देतो त्यास आकार

कविता जर अभंग कवी साक्षात किर्तनकार
भावनांचे करुन निरुपण घडवतो जणु साक्षात्कार

कविता जणु पाउस कवी बनतो मेघ
चिंब करते अनुभुती कवितेतील प्रत्येक रेघ

मनाच्या खोल जखमा, कवि शल्य विशारद
टाके घालतो कवितेचे, फुंकर मारुनी अलगद

कविता असावी प्रकाश कवी काजव्यासम हवा
जगी अंधार दाटता स्वयंस्फुर्तीने दिपावा

©मंदार खरे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< कविता उघड्या जखमा कवी शल्य विशारद
टाके घालतो सहज फुंकर मारुन अलगद >>

हे बरोबर वाटत नाहीये. कवि कविता करतो ( खरे तर पाडतो ), पन शल्य विशारद जखमा करत नाही.
हे असे बरोबर वाटले असते.

मनाच्या खोल जखमा, कवि शल्य विशारद
टाके घालतो कवितेचे, फुंकर मारुनी अलगद

कविता उघड्या जखमा म्हणजे कळले असेलच

कवी शल्य विशारद म्हणजे जो जखमा बरा करतो आपल्या शब्दरुपी उपचारांनी (Master of Surgeon)

.........म्हणूनच पुढची ओळ.......टाके घालतो सहज, फुंकर मारुन अलगद

तरी सुचनेचे स्वागतच आहे!

धन्यवाद!