लग्नाआधीची खबरदारी

Submitted by नंदिनी on 7 January, 2013 - 04:57

गेल्या काही दिवसांमधे मायबोलीवर काही धागे वाचले, काही मित्र-मैत्रीणींचे किस्से ऐकले.

लग्नानंतर माझा कसा आणि किती अपेक्षाभंग झाला, हे या किश्शांमागचं सूत्र. मग त्यांना बरेच सल्ले मिळतात, असं कर, असं करू नकोस. किंवा अजून बरंच काही.

पण माझ्या मनात एक विचार राहून राहून येत राहतो तो म्हणजे "या सर्वांचा विचार लग्नाआधीच का केला नाही??" हा प्रश्न विचारता येत नाही, कारण लग्न ऑलरेडी झालेलं असतं. अशावेळेला काय करायला हवं त्याचा विचार इथे नको.

हा धागा लग्नाळू मुलामुलींसाठी. ज्यांची लग्ने अजून व्हायची आहेत अथवा ठरत आहेत अशा तरूणतरूणींना इथे काही मार्गदर्शनपर टिप्स देता आल्या तर उत्तम.

आपल्याकडे सर्वसामान्य घरांमधे एक वय उलटून गेलं की मुलींच्या लग्नाची घाई झालेली असते. अशावेळेला जुजबी इंटरव्ह्युज होऊन मग लग्न करायचे की नाही ते "ठरवले जाते". बर्‍याचदा मुलींचा होकार अथवा नकार विचारात घेतला जात नाही. ही परिस्थिती थोडीफार बदलत असली तरी अजून हे घडत आहेच. याउलट "लग्न हेच आयुश्याचे परमध्येय असल्याचे" काही मुलींचें मत असतं की "कधी एकदा लग्न होतय" अशी त्यांची अवस्था असते, अशा वेळेला मागचापुढचा काहीही विचार न करता लग्नाला होकार देऊन बसलेल्या आणि नंतर रडत असलेल्या मुली आजूबाजूला दिसतील.

मुलग्यांच्या बाबतीत तर परिस्थिती अजूनच बिकट. ठराविक वय झालं की लग्नाचा लकडा त्यांच्यामागे पण लागतोच. त्याचबरोबर "अपेक्षा" काय आहेत हे त्यांचं त्यांनाच माहित आहे की नाही हेहे लक्षात घेतलं जात नाही. मग "तुला काय समजतं? तू फक्त आवडली की नाही ते सांग" अशी दरडावणी!!! बरं हे आवडणं/नावडणं बर्‍याचदा असतं ते रंगरूपावर. विचार्/सामाजिक्/भावनिक्/मानसिक अशा कुठल्याच गोषटींचा यामधे विचार केला जात नाही. पत्रिका-ज्योतिश वगैरे बाबींवर जास्त खल करण्यापेक्षा एकमेकांची अनुरूपता पाहून निर्नय घेणे जास्त हितकर.

लग्नापूर्वीच आपल्या अपेक्षा काय आहेत? आपली वागणूक कशी आहे त्यावरून दुसर्‍या घरामधे आपण किती अ‍ॅडजस्ट होऊ शकू याचा लग्नाआधी विचार करणे खूप गरजेचे. मुलींना लग्न करून दुसर्या घरी जायचे असल्याने त्यांनी आपल्य मनातील शांका कुशंका नीट विचारून घ्याव्यात. आपण त्या घरात राहू शकतो का? सेपरेट बेडरूम, कमोड, वॉशबेसिन, चोवीस तास पाणी यांची सवय असलेल्या मुलीने चाळीमधे दिवस काढता येतील का हा र्पश्न स्वतःला विचारायला हवा. आपण कुठवर तडजोड करू शकतो याची चाचपणी करून घ्यावी, त्याचबरोबर नि:शंकपणे भावी नवर्‍याला "दुसरी रूम घेण्याच्या शक्याशक्यतेबद्दल" देखील बोलावे.

माय्बोलीकरांकडून अजून काही पोईंट्सची अपेक्षा आहेच

(कृपया: इथे स्त्री-पुरूष, लग्न करावे की नको?, हुंडा पद्धती, बायकोचा पगार अशा विषयांवर वादावादी करू नये. धन्यवाद!!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे, दोन व्यक्ती मधील प्रेमाच्या धाग्याविषयी कोणी काही बोलतच नाही इथे.

भाजी बाजारात आल्या सारख वाटतय.

<< दोन व्यक्ती मधील प्रेमाच्या धाग्याविषयी कोणी काही बोलतच नाही इथे. >> मलाही हें कांहीसं खटकलं. वर उल्लेखिलेल्या सर्वच बाबी महत्वाच्या असल्या तरीही संवाद साधून आपल्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून ही व्यक्ती आवडली आहे का हा मनाचा खराखुरा कौल घेणं याला आत्यंतिक महत्व असावं. तसं झाल्यास प्रत्येक विवाहात अपरिहार्य असणार्‍या तडजोडी जाचक ठरण्याची शक्यता खूपच कमी होत असावी, हा आपला माझाही बाळबोध विचार.
<<....म्हणजे मुलगी मुलाच्या घरी आणि मुलगा मुलीच्या घरी जाऊन राहील.>> एका आठवड्याच्या वास्तव्याने घरचं खरं वातावरण कळणं कठीणच. [चंद्रपूरच्या माडिया जमातीत मुलाने लग्नापूर्वीं जवळ जवळ एक वर्ष मुलीच्या घरीं राहून आपण श्रम करून संसार चालवायला योग्य आहोत हें सिद्ध करावं लागतं व मगच पंचायत त्या लग्नाला संमति देते ! ]

सुखदा तुमची पोस्ट आवडली आणि हेवाही वाटला. आयुष्याबद्दल निर्णय घेताना असा सांगोपांग विचार व्हायला हवा. असं वाटतं की मलाही हे जमायला हवं होतं. पण जेंव्हा हे वाटतं तेंव्हा वेळ निघून गेलेली असते.>> +१११

नंदिनी,दक्षिणा,मुग्धमानसी,प्रकाश घाटपांडे, dreamgirl, स्वाती२ धन्यवाद.

@प्रकाश घाटपांडे :- आम्ही लग्नाच्या वेळी पत्रिका पाहिली नव्हती.रादर ती कधिच पाहिली गेली नाही.

लग्ना आधि वा नन्तर आपल पुर्विचे प्रेम प्रकरण होनार्या/झालेल्या बायकोला सान्गावे का?

फेबु,
या गोष्ति तुमचा जोडीदार किती समन्जस आहे. ़ किण्वा तुमचा नाते मैत्रिपूर्ण आहे का यावर अवलम्बून आहे.

चांगला धागा आहे.
दोन्ही बाजूंची मेडिकल हिस्टरी, अनुवांशिक आजार याची माहिती मिळवणे आवश्यक आहे. आजार लपवून फसवणुक होऊ शकते.

Pages