लग्नाआधीची खबरदारी

Submitted by नंदिनी on 7 January, 2013 - 04:57

गेल्या काही दिवसांमधे मायबोलीवर काही धागे वाचले, काही मित्र-मैत्रीणींचे किस्से ऐकले.

लग्नानंतर माझा कसा आणि किती अपेक्षाभंग झाला, हे या किश्शांमागचं सूत्र. मग त्यांना बरेच सल्ले मिळतात, असं कर, असं करू नकोस. किंवा अजून बरंच काही.

पण माझ्या मनात एक विचार राहून राहून येत राहतो तो म्हणजे "या सर्वांचा विचार लग्नाआधीच का केला नाही??" हा प्रश्न विचारता येत नाही, कारण लग्न ऑलरेडी झालेलं असतं. अशावेळेला काय करायला हवं त्याचा विचार इथे नको.

हा धागा लग्नाळू मुलामुलींसाठी. ज्यांची लग्ने अजून व्हायची आहेत अथवा ठरत आहेत अशा तरूणतरूणींना इथे काही मार्गदर्शनपर टिप्स देता आल्या तर उत्तम.

आपल्याकडे सर्वसामान्य घरांमधे एक वय उलटून गेलं की मुलींच्या लग्नाची घाई झालेली असते. अशावेळेला जुजबी इंटरव्ह्युज होऊन मग लग्न करायचे की नाही ते "ठरवले जाते". बर्‍याचदा मुलींचा होकार अथवा नकार विचारात घेतला जात नाही. ही परिस्थिती थोडीफार बदलत असली तरी अजून हे घडत आहेच. याउलट "लग्न हेच आयुश्याचे परमध्येय असल्याचे" काही मुलींचें मत असतं की "कधी एकदा लग्न होतय" अशी त्यांची अवस्था असते, अशा वेळेला मागचापुढचा काहीही विचार न करता लग्नाला होकार देऊन बसलेल्या आणि नंतर रडत असलेल्या मुली आजूबाजूला दिसतील.

मुलग्यांच्या बाबतीत तर परिस्थिती अजूनच बिकट. ठराविक वय झालं की लग्नाचा लकडा त्यांच्यामागे पण लागतोच. त्याचबरोबर "अपेक्षा" काय आहेत हे त्यांचं त्यांनाच माहित आहे की नाही हेहे लक्षात घेतलं जात नाही. मग "तुला काय समजतं? तू फक्त आवडली की नाही ते सांग" अशी दरडावणी!!! बरं हे आवडणं/नावडणं बर्‍याचदा असतं ते रंगरूपावर. विचार्/सामाजिक्/भावनिक्/मानसिक अशा कुठल्याच गोषटींचा यामधे विचार केला जात नाही. पत्रिका-ज्योतिश वगैरे बाबींवर जास्त खल करण्यापेक्षा एकमेकांची अनुरूपता पाहून निर्नय घेणे जास्त हितकर.

लग्नापूर्वीच आपल्या अपेक्षा काय आहेत? आपली वागणूक कशी आहे त्यावरून दुसर्‍या घरामधे आपण किती अ‍ॅडजस्ट होऊ शकू याचा लग्नाआधी विचार करणे खूप गरजेचे. मुलींना लग्न करून दुसर्या घरी जायचे असल्याने त्यांनी आपल्य मनातील शांका कुशंका नीट विचारून घ्याव्यात. आपण त्या घरात राहू शकतो का? सेपरेट बेडरूम, कमोड, वॉशबेसिन, चोवीस तास पाणी यांची सवय असलेल्या मुलीने चाळीमधे दिवस काढता येतील का हा र्पश्न स्वतःला विचारायला हवा. आपण कुठवर तडजोड करू शकतो याची चाचपणी करून घ्यावी, त्याचबरोबर नि:शंकपणे भावी नवर्‍याला "दुसरी रूम घेण्याच्या शक्याशक्यतेबद्दल" देखील बोलावे.

माय्बोलीकरांकडून अजून काही पोईंट्सची अपेक्षा आहेच

(कृपया: इथे स्त्री-पुरूष, लग्न करावे की नको?, हुंडा पद्धती, बायकोचा पगार अशा विषयांवर वादावादी करू नये. धन्यवाद!!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती, मास्लोव्हचा त्रिकोण तपास Happy

<<मी कुठे म्हणलय की ती यादी परिपुर्ण आहे<<>>
मग मी काय वरती हिब्रूत लिहिलय का मित्रा ? Happy माझा मुद्दाच तो आहे. पूर्ण लिस्ट बनणं शक्य नाही कारण आपण स्वतःच स्वतःबाबत पुरेसे अनभिज्ञ असतो.

अरे कमाल आहे, मला तरी नाही वाटत की आपण स्वतःच स्वतःबाबत पुरेसे अनभिज्ञ असतो. निदान मी तरी नव्हतो.

अनभिज्ञ असतो ते असतोच पण किती लेव्हलची तडजोड आपण करू शकतो याची फ्लेक्सिबिलिटी पण वयोमान आणि अनुभव यानुसार बदलते.

लिस्ट कधीही न संपणारी आहे. >> अनुमोदन. पण आंधळेपणाने एखाद्या नात्यात प्रवेश करण्यापेक्षा, समजून - उमजून व संवादाचे दार खुले ठेवून त्या नात्यात शिरणे कधीही चांगले हे मा वै म
त्या निमित्ताने एकमेकांशी चर्चा करून, संवाद साधून आलेल्या प्रश्नावर उपाय शोधण्याचा संस्कार घडतो ते वेगळेच!
परिस्थिती, माणसे कालानुरूप बदलतात. त्यांची नातीही बदलतात.
पण जिथे बाकी सर्व गोष्टी (रंग, रूप, उंची, पत्रिका, पगार, शिक्षण इ.) गोष्टी ''मॅचिंग'' किंवा अपेक्षेनुरूप आहेत / नाहीत हे पाहून लग्न ठरविले जाते तिथे वर मी लिहिलेल्या गोष्टी पडताळून त्या नात्यात शिरणे कधीही श्रेयस्कर असे वाटते.

<<अरे कमाल आहे, मला तरी नाही वाटत की आपण स्वतःच स्वतःबाबत पुरेसे अनभिज्ञ असतो. निदान मी तरी नव्हतो. >>

म्हणूनच वरती तसं म्हंटलय मित्रा. आपल्या नेणीवेची जाणीव होणं हिच पहिली पायरी आहे.

>>म्हणूनच वरती तसं म्हंटलय मित्रा. आपल्या नेणीवेची जाणीव होणं हिच पहिली पायरी आहे.
ओके, असेल कदाचित, पण मला कधी नेणीव होती असे नाही जाणवले, आणि याला कोणी चॅलेन्ज नाही करू शकत. Happy

अरुंधतीजी, माझा लिस्ट बनवायला कुठलाही विरोध नाही. मला असं सांगावसं वाटतं कि डोळे उघडे ठेवून कुठलीही नवीन गोष्ट करताना आपण स्वतःला तपासून बघत असतो. आयुष्य हा शेवटी स्वतःचा घेतलेला शोधच की

(हायला, भुंग्या; हे लिहिल्यावर मलाही वाटलं क्षणभर की खरच मी हिमालयात बर्फ विकायला जाणार)

राहता राहिलं ते संवाद, चर्चा वगैरे, मुळात 'दुसर्‍याला' समजून घ्यायचे संस्कार असल्याखेरीज काहीच खरं नाही, नाही का ?

हे तुला कोणी चॅलेन्ज करण्याविषयी नाहीये रे मित्रा. हे स्वतःलाच चॅलेन्ज करण्याविषयी आहे.

नंदिनी, सॉरी चर्चा भरकटवल्याबद्दल. वाटल्यास उद्या उडवून टाकतो.

स्वत:ला पूर्ण ओळखणे, प्रेफरन्सेस बदलत जाणे ही व्हेरिएबल्स लक्षात घेऊनही काही गोष्टी उरतात ज्या आपल्याला आपले आयुष्य कश्या पद्धतीने घालवायचे आहे? काय करायचे आहे? याच्याशी संबंधित असतात त्यामुळे अर्थातच (लग्नाचा निर्णय घेतल्यास) जोडीदाराच्या निवडीशीही संबंधित असतात.

त्यामुळे प्रेफरन्सेसची यादी करण्यात चूक काहीच नाही, यादीबरहुकूम समोरच्याला मार्क देणे यातही काही चुकीचे नाही. त्याचवेळेला समोरच्याकडेही अशी यादी असेल आणि त्या यादीप्रमाणे आपल्याला शून्य मार्क मिळू शकतात याची तयारी मात्र ठेवायला हवी. त्यावेळेला "तिच्या/त्याच्या खूप अपेक्षा आहेत. आता अमुक तमुक नाही हे काय कारण आहे का नकार द्यायला?" असे म्हणले जाता कामा नये.

अर्थात या अपेक्षांमधे हुंडा मिळालाच पाहिजे, बायकोला कधीमधी मारणार ते चालवून घेतले पाहिजे असल्या अपेक्षा असतील तर मात्र चुकीचे आहे.

अरुंधती तुझ्या यादीतले बरेचसे कायदेशीर बाबींबद्दलचे मुद्दे पटले.

बाकी लग्नाआधी मेडिकली काय बाबी तपासाव्या असे कुणी म्हतले तर 'लग्न' या गोष्टीपासून तुम्हाला काय अपेक्षा आहेत ते आधी ठरवता आले पाहिजे.
मुले हवीतच का, सेक्स हवाच का, जोडिदार कमवताच हवा का, आईवडिलांची सेवा अपेक्षित आहे का? असे अनेक.

आता यातल्या काही गोष्टींसाठी तपासणी सद्य परिस्थितीत शक्य आहे पण काही साठी नाही.
विचार करा उद्या तुम्हाला पहायला आलेल्या मुलाकडे तुम्ही पोटंट असल्याचे सर्टिफिकेट मागितलेत किंवा तुमच्याकडे त्याने सर्टिफाईड मेंस्ट्रुअल हिस्टरी आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट मागितला तर कसे वाटेल?
हेल्थ चेकअप म्हणजे नक्की किती गोष्टी तपासणार?
माझ्याकडे पेशंटांचे लग्नानंतर थोड्याच दिवसात अमुक डिटेक्ट झाले याचे इतके बहुविध अनुभव आहेत की यातले किती मी रूटिनली हेल्थ चेक अप मध्ये डायग्नोज केले असते असं मलाच वाटतं.

आणि या अपेक्षा मान्य असलेली / असलेला (किंबहुना हव्याच असलेला) जोडीदार मिळाला तर ?

धिस ईज नॉट अ जोक. वरच्या दोन्ही गोष्टी उभय पक्षांना मान्य असलेले मी पाहिलेले आहे.

कल्पना आहे बाब्या पण ते बेकायदेशीर आहे. आणि मानवतेला धरूनही नाहीये.
हे माहित असून पचवणारे महाभाग असतात पण याची कल्पनाच नसलेले काही असू शकतात.
हे इथे अधोरेखित करून सांगितल्याने चुकून कोणाला तरी उजाडलं तर काय हरकत आहे?

आंबा३ | 7 January, 2013 - 15:56
लग्न करताना घ्यावयाची काळजी असा अतीविशाल धागा आधीच झालेला आहे. आता या धाग्यावर आणखी वेगळं काय अपेक्षित आहे?

नंदिनी | 7 January, 2013 - 16:02
आंबा३, तुम्हाला काही वेगळं अपेक्षित नसेल तर इथे लिहिलं नाहीत तरी चालेल.
>>>

आंबा३ ह्यांना उडवून लावले आहे खरे. पण लग्न ठरवताना घ्यायची सावधगिरी
हा धागा (शुभमंगल सावधान ग्रूप) आधीच अ‍ॅक्टिव्ह असताना ह्या नव्या धाग्याचे प्रयोजन मलाही समजले नाहीये. हीच चर्चा तिथेही कंटिन्यु करता आली असतीच की!

एका विषयाशी संबंधित गोष्टी, चर्चा इ. एकाच धाग्यावर रहावी व माहितीचे नीट वर्गीकरण व्हावे म्हणून योग्य धागा योग्य ग्रूप मध्ये असावा तसेच एकाच विषयावर २ धागे नकोत म्हणून वेबमास्तर प्रयत्नशील असतात असे कित्यकेदा पाहिले आहे. अनुभवले आहे.

नंदे, मस्तं धागा.
आपण स्वत: नक्की कशाचे घडलेले आहोत ह्याची स्वत:शी पृच्छा करण्याची नक्की गरज असते... विशेषत: दुसरी व्यक्ती तिचं-आपलं आयुष्यं वाटून घेण्यासाठी येणार असते तेव्हा.
लिस्ट... का नाही?
कोणत्या गोष्टींच्या बाबतीत आपण तडजोड करू शकू ह्याचीतरी चाचपणी स्वत:शी करणं आवश्यक नाही का?. मी कशाच्याही बाबतीत कधीही कितीही तडजोड करू शकतो/ते असा स्वत:वर पूर्णं विश्वास असणार्‍यांना अशा यादीची नक्कीच गरज नाही.
उदा. मी स्वत: पुजा-अर्चा वगैरे कर्मकांडातली नाही. त्यामुळे ह्यात खूप काळ घालवणार्‍याबरोबर माझे सदा खटके उडाले असते. तसंच, ’काय सारखं गाणं-गाणं? ते आ-ऊ (शास्त्रीय संगीत) लावत जाऊ नकोस घरात... ’असलं म्हटलं असतं तर माझं खरच कठीण होतं.
माझ्या एका चष्मिष्टं मित्राने "चष्मा असलेली मुलगी नको" असं म्हटल्यावरून खूप भांडले होते त्याच्याशी. पण त्याचा युक्तिवाद वेगळाच होता... आम्हा दोघांनाही चष्मा असेल तर होणार्‍या मुलांना चष्मा लागण्याची शक्यता जास्तं आहे.
त्यावरून मला गोरा नवरा हवा असं मी म्हटलं होतं. (आणि मिळाला). म्हणजे मुलं सावळी(तरी) होण्याची शक्यता... Happy
विशलिस्ट आणि बॉटमलाईन लिस्ट ह्या दोन वेगळ्या आहेत. यादीत आपल्या अपेक्षांचं वजनही लिहायला हवं. आपलं आपल्याला माहीत असतं की, कालांतराने परिस्थिती, जोडीदार बदलणार आहेत (स्वभाव इत्यादी)... तसेच आपणही बदलणार आहोतच. पण माझ्या आत्ताच्या आयुष्याच्या जडण-घडणीनुसार, माझ्या स्वभावानुसार... मला अमुक गोष्टी चालू शकतिल... पण नसल्या तर अधिक बरं, अमुक गोष्टी असल्या तर बरं, अमुक हव्यातच, अन अमुक गोष्टी चालणारच नाहीत... (वजन!)
तुमच्या यादीतल्या सगळ्यात जास्तं वजन असलेल्या अपेक्षेला/घडणुकीला तुम्ही प्रिन्सिपल/तत्वं म्हणू शकता. ती बॉटमलाईन असेल. त्याच्याशी तडजोड तुम्हाला शक्यं नाही (हे तुमचं आत्ताचं मत आहे) हे तुमचं तुम्हाला तरी माहीत हवं, असं मला वाटतं.
काय हरकत आहे आपल्या अपेक्षा अन त्यांचं वजन ह्यांची खातरजमा स्वत:शी करायला? आपल्या अपेक्षांनुसार जगात जोडीदारच नाहीये हा सुद्धा साक्षात्कार होऊ शकतोच की.
आपण जसे बदलू, जोडीदार जसा बदलेल तशी ही लिस्टही बदलणार आहेच. मग कशाला लिस्टं नं फिस्टं ची थेरं?
तर ह्यानुसार जोडीदार मिळाला तर, सुरुवातीच्या काळात कमी तडजोडी कराव्या लागतिल... आपुलकी, जिव्हाळा, प्रेम (जोडीदाराशीच नाही, तर सगळ्या कुटुंबाशीच) हे झपाट्याने वाढीला लागेल. पुढल्याकाळात कराव्या लागणार्‍या मोठ्या तडजोडींना हे आधार असतिल.

कुठेतरी वाचलेली पण एक गोष्ट मला फार आवडली होती.
लग्न ठरवायचं असेल (म्हणजे पहिली पसंती वगैरे झाल्यानंतर) पण Final करण्यापूर्वी मुलाने मुलीच्या घरी आणि मुलीने मुलाच्या घरी आठ दिवस जाऊन घरच्या सारखं रहावं (एकाच वेळी). म्हणजे मुलगी मुलाच्या घरी आणि मुलगा मुलीच्या घरी जाऊन राहील.

भा.ल. महाबळ ह्यांची 'मधुपरीक्षा' Happy खूप वर्षांपूर्वी जत्रा किंवा आवाज ह्यापैकी एका दिवाळी अंकात आली होती. मस्त होती ती गोष्ट.

पुण्यात pre marriage counseling & medical checkup centers....
नीलायम थिअेटर समोर डॉ. वैजयंती खानविलकर यांच्याकडे.

नंदिनी छान धागा आहे.खरं तर हा विषय असा आहे ज्या कडे कधि कधि समंजस पणे / नाईलाजास्त्व डोळेझाक केली जाते, आणि मग हे आपण आधिच का पाहीले नाही म्हणुन रडायची वेळ येते.

माझ लग्न हे प्रेम विवाह असुनही मी आणि नवर्यानी स्वःताच्या गुण -दोषांची आणि जोडीदारा बद्द्लच्या अपेक्षांची यादी बनवली होती.आपापल्या घरच्यांना लग्नाच्या डिसीजन बद्द्ल सांगण्या आधी बेसीकली तो डिसीजन घेण्या आधि त्यावर सांगोपांग चर्चा केली. नवरा एअर फोर्स मध्ये अधिकारी होता त्यानी त्याच्या नोकरी लागल्या पासुन च्या पे स्लिप्स दाखवल्या.पायलट असल्या मुळे त्याच्या इंशुरंस चे पेपर्स दाखवले.एकमेकांच्या नोकर्यां मधले प्रोब्लेम्स सांगितले. घरातल्या पद्धति ,घरच्यांचे स्वभाव ,तडजोडी ची ताकद सगळं काही बोललो.तो दिल्ली चा राजपुत आणि मी ठाण्याची सि के पी. दोन्ही कडच्या पद्धतिं मध्ये, जेवणा मध्ये ,घरच्या वातावरणा मध्ये प्रचंड फरक!! त्यातुन घरी सांगितल्या वर दोन्ही कडून शक्य नाही ची घोषणा!! बस तलवारी निघायच्या बाकी होत्या. मग दोघेही एकमेकांच्या आयांना भेटलो त्यांना जात बाजुला ठेवायची विनंती करत ,त्यांच्या अपेक्षा जाणुन घेतल्या , माझ्या सासरी चार पिढ्यांचे २२ माणसांचे एकत्र कुटुंब होते .सक्खे - चुलत सगळे एकत्र रहातो.नवरा सर्वात मोठा मुलगा,त्यामुळे तो हे लग्न करुन घरा पासुन तुटेल हि भिती होती .ही भिती दुर केल्या वर आणि अपेक्षा पुर्ती चा विश्वास जागवल्या वर सगळे तयार झाले.दोन्ही घरचे एक मेकांना भेटल्या वर बाकी गैर समज दुर झाले.

थोड्क्यात प्रत्येक गोष्ट आधि माहीत असल्या मुळे त्रास झाला नाही ,तडजोडी करण सोप गेलं आणी सगळ्या कुटुंबा कडुन हक्काचे आपुलकी, जिव्हाळा, प्रेम मिळत गेले. आज लग्ना नंतर १५ वर्षांनी देखिल आम्ही ४ पिढ्या एकत्र आहोत [आता एकुण ३२ माणसे] आणि एक मेकांवर जिव टाकत आनंदात जगतोय!!

अवांतरा बद्द्ल क्षमस्व!!

सुखदा तुमची पोस्ट आवडली आणि हेवाही वाटला. आयुष्याबद्दल निर्णय घेताना असा सांगोपांग विचार व्हायला हवा. असं वाटतं की मलाही हे जमायला हवं होतं. पण जेंव्हा हे वाटतं तेंव्हा वेळ निघून गेलेली असते.

Pages