आता काय शिकवावे?

Submitted by विजय देशमुख on 6 January, 2013 - 21:49

गेल्या वर्षात काय शिकलो याचा मागील २-३ दिवस लेखाजोखा घेणं चालु होतं. नविन पुस्तकं वाचली (तीही इंग्रजी- त्यामुळे समजायला जरा वेळच लागला). मायबोलीवरचे चांगले लेख वाचले. आता बरच शिकुन (म्हणजे degree च्या भाषेत) झालय, पण अजुनही असं वाटतं, की महत्त्वाचं असं आपण काही शिकलोच नाही की जे रोजच्या जीवनात कामात पडेल.

अजुनही कोणी घर घेणं म्हणजे investment म्हटलं की Rich Dad poor Dad आठवते आणि घर घेणे liability वाटते. अर्थशास्त्राचा अजुनही अर्थ कळत नाही. stress management, time management कितीही वाचलं तरी कळत नाही, आणि ते वाचुन करण्यासारखं नसावं, ते करावं लागतं, हे महत्त्वाचं. असो.

एकुण काय, हे शाळेत/ कॉलेजमध्ये शिकवलं असतं, आनि करवुन घेतलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं.{माणूस मूळात आळशी आहे,असं कुठतरी वाचलं होतं, ते माझ्यावरच लिहिलय की काय म्हणुन चपापलो होतो} म्हणजे पालक स्वस्त आणि ताजा कसा आणायचा हे अजुनही जमत नाही. सोन्यात (म्हणजे दागिण्यात - इति सौ.) गुंतवणुक करावी तर सोनं घ्यावं का नाही हेच कळत नाही. पुन्हा Rich Dad Poor Dad मधली रॅट रेस आठवते, अन मीच तो उंदीर असल्याचा भास होतो.

मुलांचं संगोपन करणे हे अतिकठीण काम. ते कुठे शिकवल्या जात नाही का हो? मग मुलं मोठी होतील, पुढे त्यांना या रेसमध्ये न दौडवता जगण्याचा आनम्द कसा घ्यायचा हे ही शिकवायला हवं, पण जे स्वत:लाच जमत नाहि ते इतरांना कसं सांगणार.....अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या न शिकल्याने प्रचंड त्रास झाला, तो वाचवता आला असता.

शाळा कॉलेजात इतर विषयांसोबत हेही शिकवलं असतं तर बर झालं असतं नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकझॅक्टली...!!!

......................आणि म्हणूनच अंड्याने बारावी पास झाल्यावर केवळ एक आणि एकच वर्षच उच्च शिक्षण घेतले (आता कुठल्या शाखेत ते विचारू नका) आणि ओळखले की कॉलेजच्या वर्गाच्या चार भिंतीत चार प्रोफेसर मिळून आपल्याला शिकवून शिकवून चार सब्जेक्ट काय ते कसाबसा पोर्शन कम्प्लीट करण्यासाठी म्हणून शिकवणार जे येऊन येऊन फक्त उदरनिर्वाहाच्या कामी येणार.

मग मुलं मोठी होतील, पुढे त्यांना या रेसमध्ये न दौडवता जगण्याचा आनम्द कसा घ्यायचा हे ही शिकवायला हवं..>>> मान्य! ह्यावर ऊपाय शोधणे चालू आहे.

अहो आम्हाला साडेपाच वर्षं वैद्यकी शिकवली त्यात १५-२० लेक्चर तरी स्वतःची प्रॅक्टिस कशी करावि, अर्थ नियोजन कसे करावे, हॉस्पिटल मॅनेजमेंट कसे करावे ते शिकवायला हवे होते असे नंतर वाटले.
तसेच सर्वांसाठीच
१.पाश्चात्य देशात काही ठिकाणी पौगंडावस्थेतील मुलाना एक डमी बाळ सांभाळायला देतात तसं काहि शिकवायला हवं होतं असे वाटते.
२.अर्थशास्त्राची बेसिक माहिती द्यायला हवी असे वाटते. टॅक्स पॅनकार्ड बेसिक सरकारी कामे यांची ओळख व्हायला हवी असे वाटते.
३.जुजबी स्वयंपाक /गृहव्यवस्थापन जे पूर्वी घरी आवर्जून मुलींना शिकवले जायचे ते सगळ्यानाच घरात/शाळेत कंपल्सरि शिकवले जावे असे वाटते.

माझ्यामते आर्ट, सायन्स, कला या तीन शाखांच्या विद्यार्थ्यांच्या एकमेकांच्या शाखांमध्ये दर महिन्याला एक शैक्षणिक भेट ठेवायला हवी... तसेच मेडीकल, ईंजिनीअरींग आणि मॅनेजमेंट या कॉलेजेसचेही असे केले पाहिजे..
फक्त ज्या कॉलेजमध्ये विजिट आहे तेथील मुलींना त्या दिवशी सुट्टी द्यायची काळजी घेऊन..